Author: Saimat

साईमत लाईव्ह सोयगाव तालुका प्रतिनिधी रोजगार हमी योजनेच्या अंतर्गत चालू असलेल्या विहिरीवरील काम करणाऱ्या मजुरांचे हजेरीपटावरील सही करण्यासाठी लाच घेतांना वरठाण ता.सोयगाव येथील ग्रामसेवकाला लाचलुचपतविरोधी पथकाने गुरुवारी वरठाण-पाचोरा रस्त्यावर पाच हजार रु ची लाच घेतांना रंगेहात पकडल्याची घटना उघडकीस आली आहे मजुरांच्या हजेरी पटावरील स्वाक्षरी साठी मागितलेली दहा हजार रु पैकी तडजोडी अंती पाच हजाराची लाच घेतांना ग्रामसेवक चतुर्भुज झाला आहे.या घटनेमुळे पंचायत विभागात खळबळ उडाली आहे.     विजय पिराजीराव जोंधळे(वय ४७) असे रंगेहात पकडलेल्या ग्रामसेवकाचे नाव आहे.यातील तक्रारदार यांचे आईच्या व इतर तिघांच्या शेतात रोजगार हमी योजनेच्या विहिरीचे खोदकाम सुरु होते या कामाच्या हजेरी पटावर स्वाक्षरी साठी ग्रामसेवकाने…

Read More

नांदगाव : साईमत लाईव्ह प्रतिनिधी शिवसेनेशी (Shiv Sena) बंडखोरी करत एकनाथ शिंदे (Eknath Shinde)यांच्या गटात सामील झालेले आमदार सुहास कांदे (Suhas Kande) यांनी शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह आम्हालाच मिळेल, असा दावा केला आहे. कांदे हे काल आपल्या निवास्थानी नांदगावला (Nandgaon)दाखल झाले. यावेळी कांदे यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांचे जल्लोषात स्वागत केले. यानंतर त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. सत्ताबदल हे निमित्त असले व त्यात सुख असले तरी त्यात एक दर्द आहे, अशी भावना कांदे यांनीं व्यक्त केली. एकनाथ शिंदे यांची मुख्यमंत्रीपदी निवड व्हावी, यासाठी आमदार कांदे यांनी शिर्डीच्या साईबाबा (shirdi Saibaba)चरणी साकडे घातले होते. हा नवस फेडण्यासाठी शिर्डीला गेलेले आमदार कांदे बुधवारी रात्री त्यांच्या…

Read More

साईमत लाइव्ह मुंबई प्रतिनिधी :- शिवसेनेचे एक पर्व गाजवणारे धडाडीचे नेते म्हणून आनंद दिघे (Anand Dighe) यांना ओळखले जायचे. १३ मे रोजी दिघेसाहेबांच्या जीवनावर आधारित चित्रपट प्रदर्शित करण्यात आला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला . इतकेच नाही तर ‘धर्मवीर’ चित्रपटाला ‘कै. शाहीर दादा कोंडके स्मृती गौरव सन्मान’ मिळाला आहे. अभिनेता प्रसाद ओक यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचे आभार मानत सोशल मीडियावर एक पोस्ट शेयर केली. प्रसाद ओक (Prasad Oak) यांनी चित्रपटात आनंद दिघे यांची भूमिका साकारली आहे. प्रसाद ओक यांनी पोस्टमध्ये म्हटले की, ‘धर्मवीरसाठी या वर्षीचा ‘दादा कोंडके स्मृती गौरव सन्मान’ मला मिळाला. हा सन्मान मी मा.…

Read More

साईमत लाइव्ह जळगाव प्रतिनिधी शिवसेनेसोबत बंडखोरी करत एकनाथ शिंदे यांनी पक्षाचे ४० आमदार गळाला लावले. त्यामुळे उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. नंतर शिंदे गटाने भाजपसोबत नवीन सरकार स्थापन केले. यानंतर शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी बंडखोर आमदारांवर अत्यंत खालच्या पातळीवर टीका केली. यावर शिंदे गटाचे नेते गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी संजय राऊतांवर टीकेची तोफ डागली. आम्ही शिवसेनेतच आहोत, पण नासक्या भाजीबद्दल काही बोलणार नाही, अशा शब्दात पाटील यांनी राऊतांवर हल्लाबोल केला. बंडखोरांनी काय ते एक कारण सांगावं, असा टोला संजय राऊत यांनी लगावला होता. त्याला पाटील यांनी प्रत्युत्तर दिले. ते जळगावमध्ये पत्रकारांशी बोलत होते. आम्ही शिवसेना…

Read More

जळगाव : साईमत लाईव्ह प्रतिनिधी दोन दिवसांपासून पावसाने लावलेल्या दमदार हजेरीमुळे हतनूर धरणाचे पाणलोट क्षेत्र भरले आहे. त्यामुळे आज सकाळी धरणाचे ३० दरवाजे उघडण्यात आले आहेत. यामुळे तापी नदीला पूर आल्‍याने नदी काठच्‍या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. मध्य प्रदेशातल्या तापी नदीच्या उगम स्थानाच्या परिसरात बुधवार झालेल्या पावसामुळे हतनूर धरणातील पाणीसाठी वाढला आहे. उमगस्थानाजवळच्या पावसाचे पाणीही धरणात वाहून आल्याने हतनूर धरण भरले आहे. त्यामुळे आता धरणाचे ३० दरवाजे उघडण्यात आले आहेत. सकाळी ११ वाजेपर्यंत धरणाचे 3० दरवाजे उघडण्यात आले होते. जळगाव जिल्ह्यातील हतनुर धरणाचे 30 दरवाजे एक मीटरने उघडण्यात आले असून हतनुर धरणातून तापी नदी पात्रात 42 हजार 378 क्युसेक…

Read More

जळगाव ः प्रतिनिधी शहरातील हरिविठ्ठल नगरमध्ये दुचाकी चोरट्यांनी लांबविली. याप्रकरणी रामानंद नगर पोलिस स्थानकात अज्ञात चोरट्याविरुध्द चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत माहिती अशी की, हरिविठ्ठल नगरमधील रेल्वे नजीक महादेव मंदिराशेजारील रहिवासी रविंद्र सुभाष दांडगे (वय 39) यांनी आपल्या मालकीची दुचाकी क्र.एम.एच.19.सी.के.2412 ही गाडी नेहमीप्रमाणे दि.5 जुलै रोजी रात्री आपल्या घराशेजारी लावली होती. सकाळी 7 वाजेच्या सुमारास दांडगे कुटूंबिय जागे झाले तेव्हा त्यांना आपली दुचाकी गायब झालेली दिसली. दांडगे परिवाराने संपूर्ण परिसरात दुचाकीचा शोध घेतला असता कुठेही मिळून आली नाही. यावरुन त्यांनी रामानंद नगर पोलिस स्थानक गाठत अज्ञात चोरट्यांविरुध्द चोरीचा गुन्हा दाखल केला. त्याबाबत पुढील तपास पोलिस नाईक रेवानंद…

Read More

जळगाव : नुकतीच जळगाव शहर शिंपी समाज श्री क्षत्रीय अहिर शिंपी समाज  हितवर्धक संस्थेच्या श्रीमती मनोरमाबाई जगताप सामाजिक व सांस्कृतिक सभागृह पांझरापोळ टाकी जवळ कार्यकारणी सदस्य व समाज बांधवांची सभा झाली त्यात ६७२ वा राष्ट्रसंत नामदेव महाराज संजीवन समाधी सोहळा भक्ती मार्गाने तसेच देशाच्या व समाज संस्थेच्या ७५ व्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून एक समाज, एक संस्था, एक संजीवन समाधी सोहळा, (पुण्यतिथी) साजरा करण्याचा व व्यावसायिकांनी अर्धा दिवस दुकान बंद ठेवण्याचा सर्वानुमते निर्णय झाला. मागील दोन वर्षाच्या कोरोना काळात संजीवन समाधी सोहळा साजरा करता आलं नव्हता घरोघरी समाज बांधवांनी संत नामदेव महाराजांच्या प्रतिमेचे पूजन केले होते परंतु कोरोनाचा संसर्ग कमी…

Read More

जळगाव ः साईमत लाईव्ह प्रतिनिधी एमआयडीसीतील अग्रवाल पॉलिटेक व एसएस प्लास्टो या कंपन्यामधून प्रतिबधित 51 मेक्रोनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टीकच्या पिशव्या जप्त करून दंडात्मक कारवाई करण्यात आली. एमआयडीसीतील एस 11 मधील धिरज अग्रवाल यांची अग्रवाल पॉलिटेक या चटई बनविणाऱ्या कंपनीत 51 मायक्रोन पेक्षा कमी जाडीच्या पिशव्या तयार होत असल्याची माहिती मनपाच्या पथकाला मिळाली होती. या माहितीवरुन मनपा पथकाने कंपनीची तपासणी केली असता. कंपनीत साधारणत 200 किलो वजनाची पिशव्या आढळून आल्या त्यामुळे त्यंच्याकडून पाच हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. तसेच एमआयडीसीतील के-12 सेक्टरमधील यु.बी.बऱ्हाटे यांची मे.एस.एस.प्लास्टो या कंपनीत तपासणी केली असता. 51 मायक्रोनपेक्षा कमी जाडीच्या जवळपास 500 किलो वजनाच्या पिशव्या जप्त…

Read More

मुंबई : साईमत लाईव्ह प्रतिनिधी एकनाथ शिंदे यांनी आज मंत्रालयात जाऊन मुख्यमंत्रिपदाचा पदभार स्वीकारला. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासोबत गेलेले शिवसेनेचे (Shivsena)काही बंडखोर आमदारही मंत्रालयात उपस्थित होते. आमदार यामिनी जाधव, सदा सरवणकर आणि दीपक केसरकर यावेळी उपस्थित होते. यावेळी शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांना भाजप-शिवसेना युती झाल्यानंतर आता मातोश्रीवर (Matoshri) जाणार का, असा प्रश्न माध्यमांच्या प्रतिनिधींनी विचारला. त्यावर केसरकर यांनी खोचक पद्धतीनं उत्तर दिलं . रिक्षावाला म्हणून मुख्यमंत्र्यांना हिणवलं गेलं; पण आता रिक्षावाल्यांसाठी स्टँड तयार करणार आहोत. असा टोला लगावत जर मुख्यमंत्र्यांनी आम्हाला बोलवलं तर आम्ही सर्व मातोश्रीवर जाणार असल्याचे सूचक विधानही केले. मी काही वेळापूर्वीच एकनाथ शिंदे यांच्याशी…

Read More