साईमत लाईव्ह जळगांव प्रतिनिधी वैज्ञानिक चमत्काराने वैद्यकीय क्षेत्रात कमालीची प्रगती झाली असली तरी मुंबई पुणे सारख्या शहराबाहेर या प्रगतीचा प्रवाह कधी आणि कसा पोहचेल हे सांगणे कठीण असले तरी रूग्णसेवा हीच इश्वर सेवा मानून कर्तव्य पार पाडणाऱ्या देवदूतांची प्रामाणिक इच्छाशक्ती शाबूत असेल तर असे चमत्कार जळगाव सारख्या शहरातही घडू शकतात, याचे जीवंत उदाहरण शिल्प हॉस्पीटलमध्ये यशस्वीपणे पार पडलेल्या अत्यंत किचकट शस्रक्रीयेद्वारे प्लॅस्टीक सर्जन डॉ. श्रीराज महाजन यांनी आपल्यासमोर ठेवले आहे. शरातील शिल्प हॉस्पीटलमधील प्रमुख प्लॅस्टीक सर्जन तज्ज्ञ म्हणून कर्तव्य बजावत असलेले डॉ. श्रीराज महाजन यांनी काही दिवसांपुर्वीच अत्यंत किचकट आणि अवघड प्रक्रियेतून जाणारी शस्रक्रीया अगदी लिलया पार पाडून जळगाव…
Author: Saimat
साईमत लाईव्ह मलकापूर प्रतिनिधी दि . मलकापूर अर्बन को . ऑप बँक लि . मलकापूरची आर्थिक स्थिती ढासळल्याचे लक्षात आल्याने रिझर्व्ह बँकेने २४ नोव्हेंबर २०२१ रोजी एका आदेशान्वये ६ महिन्यांसाठी निर्बंध जारी करीत ग्राहकांना त्यांच्या खात्यातून १० हजार रूपये काढता येणार असल्याचे रिझर्व्ह बँकेने काढलेल्या आदेशात व प्रसिध्दी पत्रकात नमूद करण्यात आले होते . ६ महिन्याचा कालावधी झाल्यानंतर जून २०२२ मध्ये पुन्हा रिझर्व्ह बँकेने सदरचे निर्बंध ३ महिन्यांकरीता वाढविले होते . या सर्व प्रक्रियेत मात्र त्याठिकाणी असलेले ठेवीदार नाहक भरडले जात आहे . त्यांच्या हक्काचा पैसा त्यांना वेळेवर उपलब्ध होत नसल्याने अशा ठेवीदारांना न्याय मिळावा यासाठी आपण रिझर्व्ह बँकेकडे पाठपुरावा…
साईमत लाईव्ह सोयगाव तालुका प्रतिनिधी कवली ग्रामसेवकावर अनेक तक्रारी दाखल असुन सुद्धा कोणतीही कार्यवाही न केल्याने ग्रामस्थांसह अर्जदार भ्रमात पडले आहे. गटविकास अधिकारी यांनी ग्रामसेवक पी.एस ढोले यांना आदेशित करुन प्रस्तावाची सत्य प्रत अर्जदाराला देण्याचे कळवले असता संबंधित ग्रामसेवक याने केराची पाटी दाखवून अर्जदाराला उडवा ऊडवीचे उतर दिले आहे. तसेच मला ज्याने रक्कम दिली त्याचेच मी ठराव दाखल केले आहे व ज्याने पैसे दिले त्याचेच ड यादीत मी ठरावामध्ये वर नाव घेतलेले आहे. तुम्ही मला रक्कम दिलेले नाही तुम्हाला जिथे जायचे तिथे जा. माझे कोणीही बरेवाईट करु शकत नाही. अशी उद्धट भाषा वापरुन सदर ग्रामसेवकने अर्जदाराचे मनःस्थिती दुखावली. तरी गटविकास…
साईमत लाईव्ह कजगाव ता भडगाव प्रतिनिधी कजगाव ता भडगाव येथील रहिवासी व पत्रकार तथा सुवर्णकार समाजाचे माजी सचिव नितीन दिलीप सोनार यांची संत नरहरी सोनार युवा फाउंडेशन च्या भडगाव तालुका अध्यक्ष पदी निवड करण्यात आली समाज हिताच्या कार्यात अग्रेसर असल्याने त्यांच्या कामाची दखल घेऊन फाउंडेशनने त्यांच्यावर तालुका अध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवली आहे. त्याबद्दल त्यांचे फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष शामकांत दाभाडे नागपूरचे सतीश हिंगोलीकर नाशिकचे राकेश दुसाने मुंबईचे सचिन घोडके संगीता कुलथे तेजश्री विसपुते निलेश भामरे लोटन भामरे विनोद भामरे कजगाव सुवर्णकार समाजाचे अध्यक्ष विजय पोतदार उपाध्यक्ष सुरेंद्र बागुल सचिव रत्नाकर सोनार रमेश देवरे पंढरीनाथ सोनार विजय अहिरराव भगवान घोडके विठ्ठल बागुल…
जळगाव : विशेष प्रतिनिधी जळगाव जिल्हा परिषदेतील बांधकाम विभागातील शासकीय कामे वाटप आणि कागद पत्रे अफरातफर प्रकरणाचा मागील आठवड्यापासून जिल्हाभर गाजावाजा सुरु असून लेखा सहाय्यक पी. एम. पाटील अद्यापही समोर आलेले नाहीत. दरम्यान जि.प.तील अधिकाऱ्यांसमोर कोणाचीही दाळ शिजत नसल्याचे चित्र समोर येऊ लागले आहे. पी.एम.पाटील यांच्यावर कडक कार्यवाहीची बडतर्फी वा फौजदारी गुन्हे नोंद झाल्यास तपासात वरिष्ठ कार्यकारी अधिकारी श्री.धिवरे तसेच उप मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.मोहन ह्यांची पूर्ण पोल खुलेल म्हणून ताबडतोब तत्वावर पी.एम.पाटील ह्यांची दुसऱ्या विभागात बदली देण्यात आली आहे.मुद्दाम पी.एम.पाटील यांना सावलीत ठेवून, वरिष्ठ अधिकारी आपआपली कातडी वाचवण्यासाठी धडपडत आहेत. आज सूचक सुत्रांकडून प्राप्त झालेल्या माहितीअन्वये, सदर प्रकरणाची दखल…
साईमत लाईव्ह फैजपूर प्रतिनिधी येथिल धनाजी नाना महाविद्यालय येथे लोकसेवक बाळासाहेब मधुकरराव चौधरी यांची पुण्यतिथी निमित्त अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.पी.आर. चौधरी यांनी स्वर्गीय बाळासाहेब मधुकरराव चौधरी यांच्या सामजिक आणि राजकिय जीवनातील यशस्वी कार्याबद्दल माहिती दिली. ज्या प्रमाणे धनाजी नाना चौधरी यांनी देशासाठी प्राण पणाला लावून पोलिस अधिकारी पदाचा त्याग करून ब्रिटिशांशी लढा दिला तोच आदर्श घेत बाळासाहेब मधुकरराव चौधरी यांनी जनतेच्या हितासाठी कार्य केले. त्याची प्रचिती रावेर यावल परिसरातील दुर्गम आणि डोंगराळ भागात झालेल्या विकासातून दिसून येते. त्यांच्या कार्याप्रती आज पुण्यतिथी निमित्त पूर्ण परिसरात विवीध ठिकाणी आदरांजली वाहण्यास जन समुदाय एकत्र येत असतो हीच…
मुंबई ः साईमत लाईव्ह प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी आज विधानपरिषद सदस्यत्वाची शपथ घेतली. दरम्यान, सुमारे पावणे तीन वर्षाच्या कालखंडानंतर नाथाभाऊंचे राजकीय पुर्नवसन झाल्याचे यातून पुढे आले आहे. भोसरी येथील कथित भूखंड गैरव्यवहार प्रकरणी माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी जून 2016 मध्ये राजीनामा दिला होता. यानंतर 2019 च्या विधानसभा निवडणूकीत भाजपातर्फे त्यांना उमेदवारी नाकारण्यात आली होत. त्यांच्याजागी त्यांच्या कन्येस उमेदवारी देण्यात आली होती. यावेळी त्यांच्या कन्येचा पराभव झाला होता. यानंतर झालेल्या राजकीय उलथापालथीत माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला. एकनाथराव खडसे यांच्या राजकीय पुर्नवसनसाठी राष्ट्रवादीकडून त्यांच्या कोट्यातून राज्यपाल नियुक्त विधानपरिषद सदस्यत्वासाठी…
जपानचे ( Shinzo Abe ) यांच्यावर शुक्रवारी सकाळी जपानच्या(Japan) नारा शहरात हल्ला झाला. निवडणूक प्रचाराच्या भाषणावेळी त्यांच्यावर अज्ञातांनी दोनदा गोळ्या झाडल्या. या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी आबे यांच्यावर गोळीबार झाडणाऱ्या व्यक्तीला घटनास्थळावरून अटक केली आहे. ४२ वर्षीय हल्लेखोराकडून बंदूक जप्त केली. पोलीस आरोपीची चौकशी करत असून त्याने गोळी का मारली याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. (Former Japanese Prime Minister Shinzo Abe ) एका इंग्रजी वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, शिंजो आबे वरिष्ठ सभागृहाच्या निवडणुकीचा प्रचार करत होते. जपानमध्ये रविवारी (१० जुलै) वरिष्ठ सभागृहाच्या निवडणुका होणार आहेत. त्यासाठी शिंजो आबे तेथे प्रचारासाठी गेले होते. सभेला संबोधित करताना आबे यांच्यावर गोळीबार करण्यात…
मुंबई : साईमत लाईव्ह प्रतिनिधी एकनाथ शिंदे यांनी आमदारांपाठोपाठ शिवसेनेचे महापालिकेतील नगरसेवक फोडायला सुरुवात केल्यानंतर आता ही गळती रोखण्यासाठी युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे हे मैदानात उतरले आहेत. बंडखोरांना धडा शिकवण्यासाठी आदित्य ठाकरे हे आता स्वत: राज्यभरात फिरून शिवसैनिकांशी संवाद साधणार आहेत. या माध्यमातून शिवसेनेची संघटना पुन्हा बळकट करण्याचा प्रयत्न आदित्य ठाकरे (Aaditya Thakceray) यांच्याकडून केला जाईल. आदित्य ठाकरे यांच्या या दौऱ्याला ‘निष्ठा यात्रा’असे नाव देण्यात आले आहे. या ‘निष्ठा यात्रेत’ आदित्य ठाकरे हे बंडखोर आमदारांच्या मतदारसंघाचा दौरा करतील. याशिवाय, आदित्य ठाकरे यांचे मुख्य लक्ष्य हे मुंबई महानगरपालिका असेल. आदित्य ठाकरे मुंबईतील २३६ शाखांना भेटी देणार आहेत. प्रत्येक शाखेत जाऊन आदित्य ठाकरे…
जामनेर : साईमत लाईव्ह प्रतिनिधी जामनेर तालुक्यातील शेळगाव येथे ठरल्याप्रमाणे उपसरपंच हरीश पायघोण यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या उपसरपंच पदांची निवडणूक मा. सरपंच यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होऊन उपसरपंच पदांसाठी निळकंठ पाटील यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्याची बिनविरोध निवड घोषित करण्यात आली.सभेचे कामकाज ग्रामसेवक भगवान बोरसे यांनी पाहीले. हरीश पायघोण यांनी ठरल्याप्रमाणे उपसरपंच पदा राजीनामा एक महीण्यापुर्वच दिला असल्याने गावात त्याचे कौतुक होत आहे.नवनियुक्त उपसरपंच तथा शिवसेना जामनेर विधानसभा क्षेत्र प्रमुख निळकंठ पाटील यांची बिनविरोध निवड झाली असून ग्रामपंचायत कार्यालयात ही निवडणूक प्रक्रिया पार पडली याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य दीपक पाडोळसे. विकास सोसायटीचे चेअरमन सुधाकर पाटील हरीश पायघोण निलेश घुगे…