शेळगाव ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी निळकंठ पाटील याची बिनविरोध निवड

0
38

जामनेर : साईमत लाईव्ह प्रतिनिधी

 

जामनेर तालुक्यातील शेळगाव येथे ठरल्याप्रमाणे उपसरपंच हरीश पायघोण यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या उपसरपंच पदांची निवडणूक मा. सरपंच यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होऊन उपसरपंच पदांसाठी निळकंठ पाटील यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्याची बिनविरोध निवड घोषित करण्यात आली.सभेचे कामकाज ग्रामसेवक भगवान बोरसे यांनी पाहीले.

हरीश पायघोण यांनी ठरल्याप्रमाणे उपसरपंच पदा राजीनामा एक महीण्यापुर्वच दिला असल्याने गावात त्याचे कौतुक होत आहे.नवनियुक्त उपसरपंच तथा शिवसेना जामनेर विधानसभा क्षेत्र प्रमुख निळकंठ पाटील यांची बिनविरोध निवड झाली असून ग्रामपंचायत कार्यालयात ही निवडणूक प्रक्रिया पार पडली याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य दीपक पाडोळसे. विकास सोसायटीचे चेअरमन सुधाकर पाटील हरीश पायघोण निलेश घुगे विकास कोळी विशाल वाघ राहुल मंदाणे अमोल पाडोळसे तसेच सरपंच उपसरपंच सर्व ग्रामपंचायत सदस्य तथा ग्रामपंचायत कर्मचारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेळगाव ग्रामपंचायत उपसरपंच पदी विधानसभा क्षेत्र प्रमुख शिवसेना निळकंठ पाटील यांची निवड झाल्याबद्दल जामनेर तालुका शिवसेना व युवासेना शाखेतर्फे युवासेना उपजिल्हाधिकारी विश्वजीत पाटील शिवसेनेचे गणेश पांढरे जामनेर शहर प्रमुख ज्ञानेश्वर जंजाळ माजी शहर प्रमुख पवन माळी युवा सेना तालुका अधिकारी विशाल लामखेडे सुकलाल बारी यांनी शाल श्रीफळ देऊन सत्कार केला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here