मुंबई ः साईमत लाईव्ह प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी आज विधानपरिषद सदस्यत्वाची शपथ घेतली. दरम्यान, सुमारे पावणे तीन वर्षाच्या कालखंडानंतर नाथाभाऊंचे राजकीय पुर्नवसन झाल्याचे यातून पुढे आले आहे.
भोसरी येथील कथित भूखंड गैरव्यवहार प्रकरणी माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी जून 2016 मध्ये राजीनामा दिला होता. यानंतर 2019 च्या विधानसभा निवडणूकीत भाजपातर्फे त्यांना उमेदवारी नाकारण्यात आली होत. त्यांच्याजागी त्यांच्या कन्येस उमेदवारी देण्यात आली होती. यावेळी त्यांच्या कन्येचा पराभव झाला होता. यानंतर झालेल्या राजकीय उलथापालथीत माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला. एकनाथराव खडसे यांच्या राजकीय पुर्नवसनसाठी राष्ट्रवादीकडून त्यांच्या कोट्यातून राज्यपाल नियुक्त विधानपरिषद सदस्यत्वासाठी त्यांचे नामाकंन करण्यात आले होते. मात्र राज्यपाल महोदयांनी ही यादीच प्रलंबित ठेवली. यानंतर जून महिन्यात झालेल्या विधानपरिषदेच्या निवडणूकीत राष्ट्रवादीतर्फे एकनाथराव खडसे यांना उमेदवार देण्यात आली. या निवडणूकीत श्री.खडसे सहजपणे निवडूण आले. त्यांच्या निकालानंतर नाट्यमय घडामोडी होवून सत्तांतर झाले.
या राजकीय घडामोडीनंतर आज सकाळी राजभवनात विधान परिषदेच्या 10 नवनिर्वाचित सदस्यांनी आमदारकीचा शपथ घेतली. यावेळी सभापती निलमताई गोऱ्हे यांनी एकनाथराव खडसे यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली. या माध्यमातून त्यांची आता विधान परिषदेत एन्ट्री होणार आहे.