जपानचे ( Shinzo Abe ) यांच्यावर शुक्रवारी सकाळी जपानच्या(Japan) नारा शहरात हल्ला झाला. निवडणूक प्रचाराच्या भाषणावेळी त्यांच्यावर अज्ञातांनी दोनदा गोळ्या झाडल्या. या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी आबे यांच्यावर गोळीबार झाडणाऱ्या व्यक्तीला घटनास्थळावरून अटक केली आहे. ४२ वर्षीय हल्लेखोराकडून बंदूक जप्त केली. पोलीस आरोपीची चौकशी करत असून त्याने गोळी का मारली याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. (Former Japanese Prime Minister Shinzo Abe )
एका इंग्रजी वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, शिंजो आबे वरिष्ठ सभागृहाच्या निवडणुकीचा प्रचार करत होते. जपानमध्ये रविवारी (१० जुलै) वरिष्ठ सभागृहाच्या निवडणुका होणार आहेत. त्यासाठी शिंजो आबे तेथे प्रचारासाठी गेले होते. सभेला संबोधित करताना आबे यांच्यावर गोळीबार करण्यात आला. यादरम्यान गोळीबाराचा आवाज आला आणि आबे अचानक खाली कोसळले. त्याच्या छातीत कोणीतरी गोळी मारल्याचे प्राथमिक अहवालात दिसून आले आहे. मात्र, त्यांच्यावर मागून दोन वेळा गोळ्या झाडण्यात आल्याचे नंतर स्पष्ट झाले. अशा स्थितीत घटनास्थळी गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. भाषण देताना अचानक गोळी लागल्याने आबे कोसळले. त्याचवेळी त्यांच्या डोक्यालाही दुखापत झाली. रक्तबंबाळ अवस्थेत त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र रक्तस्त्राव झाल्याने उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.