साईमत लाईव्ह फैजपूर प्रतिनिधी येथिल धनाजी नाना महाविद्यालय येथे लोकसेवक बाळासाहेब मधुकरराव चौधरी यांची पुण्यतिथी निमित्त अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.पी.आर. चौधरी यांनी स्वर्गीय बाळासाहेब मधुकरराव चौधरी यांच्या सामजिक आणि राजकिय जीवनातील यशस्वी कार्याबद्दल माहिती दिली. ज्या प्रमाणे धनाजी नाना चौधरी यांनी देशासाठी प्राण पणाला लावून पोलिस अधिकारी पदाचा त्याग करून ब्रिटिशांशी लढा दिला तोच आदर्श घेत बाळासाहेब मधुकरराव चौधरी यांनी जनतेच्या हितासाठी कार्य केले. त्याची प्रचिती रावेर यावल परिसरातील दुर्गम आणि डोंगराळ भागात झालेल्या विकासातून दिसून येते. त्यांच्या कार्याप्रती आज पुण्यतिथी निमित्त पूर्ण परिसरात विवीध ठिकाणी आदरांजली वाहण्यास जन समुदाय एकत्र येत असतो हीच…
Author: Saimat
मुंबई ः साईमत लाईव्ह प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी आज विधानपरिषद सदस्यत्वाची शपथ घेतली. दरम्यान, सुमारे पावणे तीन वर्षाच्या कालखंडानंतर नाथाभाऊंचे राजकीय पुर्नवसन झाल्याचे यातून पुढे आले आहे. भोसरी येथील कथित भूखंड गैरव्यवहार प्रकरणी माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी जून 2016 मध्ये राजीनामा दिला होता. यानंतर 2019 च्या विधानसभा निवडणूकीत भाजपातर्फे त्यांना उमेदवारी नाकारण्यात आली होत. त्यांच्याजागी त्यांच्या कन्येस उमेदवारी देण्यात आली होती. यावेळी त्यांच्या कन्येचा पराभव झाला होता. यानंतर झालेल्या राजकीय उलथापालथीत माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला. एकनाथराव खडसे यांच्या राजकीय पुर्नवसनसाठी राष्ट्रवादीकडून त्यांच्या कोट्यातून राज्यपाल नियुक्त विधानपरिषद सदस्यत्वासाठी…
जपानचे ( Shinzo Abe ) यांच्यावर शुक्रवारी सकाळी जपानच्या(Japan) नारा शहरात हल्ला झाला. निवडणूक प्रचाराच्या भाषणावेळी त्यांच्यावर अज्ञातांनी दोनदा गोळ्या झाडल्या. या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी आबे यांच्यावर गोळीबार झाडणाऱ्या व्यक्तीला घटनास्थळावरून अटक केली आहे. ४२ वर्षीय हल्लेखोराकडून बंदूक जप्त केली. पोलीस आरोपीची चौकशी करत असून त्याने गोळी का मारली याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. (Former Japanese Prime Minister Shinzo Abe ) एका इंग्रजी वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, शिंजो आबे वरिष्ठ सभागृहाच्या निवडणुकीचा प्रचार करत होते. जपानमध्ये रविवारी (१० जुलै) वरिष्ठ सभागृहाच्या निवडणुका होणार आहेत. त्यासाठी शिंजो आबे तेथे प्रचारासाठी गेले होते. सभेला संबोधित करताना आबे यांच्यावर गोळीबार करण्यात…
मुंबई : साईमत लाईव्ह प्रतिनिधी एकनाथ शिंदे यांनी आमदारांपाठोपाठ शिवसेनेचे महापालिकेतील नगरसेवक फोडायला सुरुवात केल्यानंतर आता ही गळती रोखण्यासाठी युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे हे मैदानात उतरले आहेत. बंडखोरांना धडा शिकवण्यासाठी आदित्य ठाकरे हे आता स्वत: राज्यभरात फिरून शिवसैनिकांशी संवाद साधणार आहेत. या माध्यमातून शिवसेनेची संघटना पुन्हा बळकट करण्याचा प्रयत्न आदित्य ठाकरे (Aaditya Thakceray) यांच्याकडून केला जाईल. आदित्य ठाकरे यांच्या या दौऱ्याला ‘निष्ठा यात्रा’असे नाव देण्यात आले आहे. या ‘निष्ठा यात्रेत’ आदित्य ठाकरे हे बंडखोर आमदारांच्या मतदारसंघाचा दौरा करतील. याशिवाय, आदित्य ठाकरे यांचे मुख्य लक्ष्य हे मुंबई महानगरपालिका असेल. आदित्य ठाकरे मुंबईतील २३६ शाखांना भेटी देणार आहेत. प्रत्येक शाखेत जाऊन आदित्य ठाकरे…
जामनेर : साईमत लाईव्ह प्रतिनिधी जामनेर तालुक्यातील शेळगाव येथे ठरल्याप्रमाणे उपसरपंच हरीश पायघोण यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या उपसरपंच पदांची निवडणूक मा. सरपंच यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होऊन उपसरपंच पदांसाठी निळकंठ पाटील यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्याची बिनविरोध निवड घोषित करण्यात आली.सभेचे कामकाज ग्रामसेवक भगवान बोरसे यांनी पाहीले. हरीश पायघोण यांनी ठरल्याप्रमाणे उपसरपंच पदा राजीनामा एक महीण्यापुर्वच दिला असल्याने गावात त्याचे कौतुक होत आहे.नवनियुक्त उपसरपंच तथा शिवसेना जामनेर विधानसभा क्षेत्र प्रमुख निळकंठ पाटील यांची बिनविरोध निवड झाली असून ग्रामपंचायत कार्यालयात ही निवडणूक प्रक्रिया पार पडली याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य दीपक पाडोळसे. विकास सोसायटीचे चेअरमन सुधाकर पाटील हरीश पायघोण निलेश घुगे…
साईमत लाईव्ह सोयगाव तालुका प्रतिनिधी रोजगार हमी योजनेच्या अंतर्गत चालू असलेल्या विहिरीवरील काम करणाऱ्या मजुरांचे हजेरीपटावरील सही करण्यासाठी लाच घेतांना वरठाण ता.सोयगाव येथील ग्रामसेवकाला लाचलुचपतविरोधी पथकाने गुरुवारी वरठाण-पाचोरा रस्त्यावर पाच हजार रु ची लाच घेतांना रंगेहात पकडल्याची घटना उघडकीस आली आहे मजुरांच्या हजेरी पटावरील स्वाक्षरी साठी मागितलेली दहा हजार रु पैकी तडजोडी अंती पाच हजाराची लाच घेतांना ग्रामसेवक चतुर्भुज झाला आहे.या घटनेमुळे पंचायत विभागात खळबळ उडाली आहे. विजय पिराजीराव जोंधळे(वय ४७) असे रंगेहात पकडलेल्या ग्रामसेवकाचे नाव आहे.यातील तक्रारदार यांचे आईच्या व इतर तिघांच्या शेतात रोजगार हमी योजनेच्या विहिरीचे खोदकाम सुरु होते या कामाच्या हजेरी पटावर स्वाक्षरी साठी ग्रामसेवकाने…
नांदगाव : साईमत लाईव्ह प्रतिनिधी शिवसेनेशी (Shiv Sena) बंडखोरी करत एकनाथ शिंदे (Eknath Shinde)यांच्या गटात सामील झालेले आमदार सुहास कांदे (Suhas Kande) यांनी शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह आम्हालाच मिळेल, असा दावा केला आहे. कांदे हे काल आपल्या निवास्थानी नांदगावला (Nandgaon)दाखल झाले. यावेळी कांदे यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांचे जल्लोषात स्वागत केले. यानंतर त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. सत्ताबदल हे निमित्त असले व त्यात सुख असले तरी त्यात एक दर्द आहे, अशी भावना कांदे यांनीं व्यक्त केली. एकनाथ शिंदे यांची मुख्यमंत्रीपदी निवड व्हावी, यासाठी आमदार कांदे यांनी शिर्डीच्या साईबाबा (shirdi Saibaba)चरणी साकडे घातले होते. हा नवस फेडण्यासाठी शिर्डीला गेलेले आमदार कांदे बुधवारी रात्री त्यांच्या…
साईमत लाइव्ह मुंबई प्रतिनिधी :- शिवसेनेचे एक पर्व गाजवणारे धडाडीचे नेते म्हणून आनंद दिघे (Anand Dighe) यांना ओळखले जायचे. १३ मे रोजी दिघेसाहेबांच्या जीवनावर आधारित चित्रपट प्रदर्शित करण्यात आला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला . इतकेच नाही तर ‘धर्मवीर’ चित्रपटाला ‘कै. शाहीर दादा कोंडके स्मृती गौरव सन्मान’ मिळाला आहे. अभिनेता प्रसाद ओक यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचे आभार मानत सोशल मीडियावर एक पोस्ट शेयर केली. प्रसाद ओक (Prasad Oak) यांनी चित्रपटात आनंद दिघे यांची भूमिका साकारली आहे. प्रसाद ओक यांनी पोस्टमध्ये म्हटले की, ‘धर्मवीरसाठी या वर्षीचा ‘दादा कोंडके स्मृती गौरव सन्मान’ मला मिळाला. हा सन्मान मी मा.…
साईमत लाइव्ह जळगाव प्रतिनिधी शिवसेनेसोबत बंडखोरी करत एकनाथ शिंदे यांनी पक्षाचे ४० आमदार गळाला लावले. त्यामुळे उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. नंतर शिंदे गटाने भाजपसोबत नवीन सरकार स्थापन केले. यानंतर शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी बंडखोर आमदारांवर अत्यंत खालच्या पातळीवर टीका केली. यावर शिंदे गटाचे नेते गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी संजय राऊतांवर टीकेची तोफ डागली. आम्ही शिवसेनेतच आहोत, पण नासक्या भाजीबद्दल काही बोलणार नाही, अशा शब्दात पाटील यांनी राऊतांवर हल्लाबोल केला. बंडखोरांनी काय ते एक कारण सांगावं, असा टोला संजय राऊत यांनी लगावला होता. त्याला पाटील यांनी प्रत्युत्तर दिले. ते जळगावमध्ये पत्रकारांशी बोलत होते. आम्ही शिवसेना…
जळगाव : साईमत लाईव्ह प्रतिनिधी दोन दिवसांपासून पावसाने लावलेल्या दमदार हजेरीमुळे हतनूर धरणाचे पाणलोट क्षेत्र भरले आहे. त्यामुळे आज सकाळी धरणाचे ३० दरवाजे उघडण्यात आले आहेत. यामुळे तापी नदीला पूर आल्याने नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. मध्य प्रदेशातल्या तापी नदीच्या उगम स्थानाच्या परिसरात बुधवार झालेल्या पावसामुळे हतनूर धरणातील पाणीसाठी वाढला आहे. उमगस्थानाजवळच्या पावसाचे पाणीही धरणात वाहून आल्याने हतनूर धरण भरले आहे. त्यामुळे आता धरणाचे ३० दरवाजे उघडण्यात आले आहेत. सकाळी ११ वाजेपर्यंत धरणाचे 3० दरवाजे उघडण्यात आले होते. जळगाव जिल्ह्यातील हतनुर धरणाचे 30 दरवाजे एक मीटरने उघडण्यात आले असून हतनुर धरणातून तापी नदी पात्रात 42 हजार 378 क्युसेक…