Alert : पुढील 48 तास मुसळधार पावसाचे, 3 जिल्ह्यांना रेड तर 12 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

0
86

साईमत लाईव्ह मुंबई प्रतिनिधी

 राज्यात पावसाचा जोर आजही कायम पहायला मिळत आहे. त्यातच आता पुढील 48 तासांत राज्यातील काही भागांत मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. राज्यात काही भागांत अतिवष्टी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, गुरुवार (14 जुलै 2022) राज्यातील तीन जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला आहे तर 12 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. रेड अलर्ट देण्यात आलेल्या जिल्ह्यांमध्ये पालघर, नाशिक आणि पुणे जिल्ह्यांचा समावेश आहे.

14 जुलैचं हवामान अंदाज

रेड अलर्ट – पालघर, नाशिक, पुणे

ऑरेंज अलर्ट – मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर

यल्लो अलर्ट – नंदुरबार, धुळे, जळगाव, औरंगाबाद, अहमदनगर, बीड, जालना, बुलढाणा, अकोला, वाशिम, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली.

त्याच प्रमाणे 15 जुलै रोजी सुद्धा काही भागांत जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यानुसार, पालघर, पुणे आणि सातारा या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, नाशिक, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती, वर्धा, यवतमाळ, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली या जिल्ह्यांना यल्लो अलर्ट देण्यात आला आहे.

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here