भाजपाची मोठी खेळी ; राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरेंना शिंदेंच्या मंत्रीमंडळात मंत्रिपदाची ऑफर !

0
4

मुंबई : प्रतिनिधी

राज्यातील राजकीय नाट्यानंतर एकनाथ शिंदे (Eknath Shinde)यांनी भाजपासोबत सत्ता स्थापन केली. सत्ता पालटल्यानंतर भाजपाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेशी संपर्क साधला असून मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray)यांचे पुत्र अमित ठाकरे(Amit Thackeray) यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्याची ऑफर दिली असल्याची माहिती समोर आली आहे. भाजपने मोठी खेळी खेळात एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून शिवसेनेत (Shivsena) मोठी फूट पाडली. आता राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांना भाजपने मंत्रिपदाची ऑफर देऊ केली आहे. अमित यांना मंत्री करण्याचा निर्णय हा शिवसेनेतील ठाकरे कुटुंबाचा प्रभाव कमी करण्याचा भाजपचा आणखी एक प्रयत्न असू शकतो.भाजपाने नुकतेच शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पद दिले तर स्वतः उपमुख्यमंत्री पद घेतले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे पुत्र आणि माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे राजकीय वर्तुळात सक्रिय झाले आहेत. त्यांना टक्कर देण्यासाठी अमित ठाकरे यांना मंत्रिमंडळात स्थान देण्याच्या हालचालींना वेग आला आहे.ही भाजपाची रणनीती असल्याचे बोलले जात आहे.

 

मनसे नेत्यांनी भाजपाकडून अमित ठाकरे संदर्भात कोणताही प्रस्ताव नसल्याचे सांगितले आहे. तसेच राज ठाकरेंनी ही ऑफर धुडकावून लावल्याचे वृत्त मनसेकडून येत आहे. मात्र याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

 

अमित ठाकरे यांनी मुंबई महापालिका निवडणुकीदरम्यान त्यांनी पहिल्यांदाच मनसेच्या रोड शोमध्ये भाग घेतला होता, जो राजकारणातील त्यांचा प्रवेश मानला जात होता.मात्र, त्यानंतर अभ्यासाचे कारण देत राजकारणापासून दूर गेले. यानंतर जुलै २०१४ मध्ये ते पुन्हा एकदा मनसे विद्यार्थी सेनेच्या पहिल्या मेळाव्यात दिसले. मात्र त्यानंतरही ते राजकीय वर्तुळात सक्रिय झालेले दिसले नाही. नुकतीच राज ठाकरे यांच्यावर शास्त्रक्रिया पार पडली. त्यामुळे अमित ठाकरे आता पुन्हा राजकारणात सक्रिय झाले आहेत. यापार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमित ठाकरे यांना मंत्रालयात आणण्याची योजना आखली आहे. बुधवारी ते राज ठाकरेंची भेट घेणार होते. मात्र, त्यानंतर ही बैठक पुढे ढकलण्यात आली. दरम्यान एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतरही त्यांच्याकडून शिवसेनेला खिंडार पाडण्याचे काम सुरूच आहे. त्यामुळे शिवसेनेत मोठी फूट पडल्याचे दिसते. उद्धव ठाकरेंची शिवसेनेवरील पकडही आता संपुष्टात आल्याचे चित्र आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here