साईमत लाईव्ह यावल प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्यात एस.टी. महामंडळात एस.टी.महामंडळ चालक कर्मचारी संपावर गेले होते.या संपकाळात जे कत्राटी चालकांची नियुक्ती करण्यात आली होती या कत्राटी चालकांना ठेकेदारातर्फे व काही महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी कत्राटी चालकांचे पगार एस.टी.महामंडळाने 23 हजार 900 रुपये एवढा पगार एका चालकासाठी ठेकेदाराला दिले आहे,तरी कत्राटी चालक हे आप आपल्या दिलेल्या जागेवर नियुक्ती करून कर्तव्य करत आहे.तरी त्यांना वेळेवर पगार नाही,व त्यांना रात्री मुक्कामाचा भत्ता नाही जे रापमचे कर्मचारी जे काम करत आहे तेच काम कत्राटी चालक करत आहे तरी या चालकांचे आर्थिक शोषण का करत आहे,महामंडळाने नियुक्ती केलेली आहे.संस्था पगार का देत नाही का संस्थेवर महामंडळाचे कोणत्या अधिकाऱ्याचे आशिर्वाद आहे.18जुलै 2022रोजी मध्य प्रदेशात खलघाट येथे अपघात झाला या अपघातात अमळनेर डेपोतील दोन कर्मचाऱ्यांनी आपले प्राण गमावले तरी महामंडळाने का चालक व वाहक यांच्या जिवाशी खेळावे का?
तरी महामंडळ सहा महीने पासून कत्राटी चालकांचे आर्थिक शोषण करत आहे,तरी लेखी सूचना न देता कत्राटी चालकांना तीन महिन्यापासून16 हजार पगार देत आहे तरी दि.19जुलै संस्थेने जे पत्र दिले आहे त्या पत्रात तीन महिने 538प्रति दिवस पगार म्हटले आहे.तरी आता आम्ही 466प्रति दराने पगार देण्यास कळवत आहे तरी त्या पत्रावर संस्थेचे नाव आहे किव्वा नाही शिक्का नाही तरी या सर्व चालकांनी जळगाव विभागाचे नियंत्रक यांना पत्र दिले तरीही काही कार्यवाही झालेली नाही तरी कत्राटी चालकांचे पगार स्वत: एस.टी.महामंडळाने करावे व आय कार्ड द्यावे असे म्हटले आहे फक्त कामा पुरता मामा कत्राटी भर्तीच्या आधि आपले काम धंदे सोडून एसटी महामंडळाला संपात साथ दिली त्यांच्याकडे आता दुर्लक्ष केले जात आहे म्हणून कंत्राटी चालकांमध्ये नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.