Author: Saimat

मुंबई : प्रतिनिधी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)यांच्या महामुलाखतीचा दुसरा भाग आज शिवनेसेचे(Shivsena)मुखपत्र असलेल्या सामनामध्ये प्रसिद्ध करण्यात आला आहे. या मुलाखतीमध्ये उद्धव ठाकरे यांनी शिंदे गट आणि भाजपवर(BJP) हल्लाबोल केला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी अनेक मुद्द्यांवर चर्चा केली.भाजपमधील नाराजीबद्दलही त्यांनी उघडपणे मत मांडले. भाजप पक्षातील क्षातले जुनेजाणते निष्ठावान, त्यावेळी आमच्या बरोबर युतीत असणारे अनेक नेते आजही माझ्या संपर्कात आहेत. पण ते निष्ठेने भाजपसोबत आहेत. मात्र भाजपचे ते निष्ठावान नेते शिवसेनेत येणार असा पोकळ दावा मी करणार नाही. मात्र त्यांना सध्याच्या गोष्टी पटत नाहीत. पण तरीदेखील ते निष्ठेने भाजपचे काम करत आहेत, असा खुलासा उद्धव ठाकरे यांनी केला .बाहेरच्या माणसांना…

Read More

साईमत लाईव्ह सोयगाव तालुका प्रतिनिधी भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालय, केंद्रीय संचार ब्यूरो, क्षेत्रीय कार्यालय-औरंगाबाद, जिल्हा प्रशासन, औरंगाबाद व संत ज्ञानेश्वर महाविद्यालय सोयगाव तर्फे कारगिल विजय दिनानिमित्त रॅली, निबंध स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, वकृत्व स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम, मार्गदर्शन, लसीकरण कॅम्प, शहीदांच्या कुटुंबाचा सत्कार कार्यक्रम मंगळवारी संपन्न झाला. ‘कारगिल युद्धात शहिदांना मार्गदर्शन करतांना उपस्थितीत विद्यार्थ्यांना म्हणाले, झालेल्या अमर जवानांच्या स्मरणार्थ कारगिल विजय दिवसाचे स्मरण करणे आवश्यक आहे’ असे प्रतिपादन तहसिलदार, रमेश जसवंत यांनी केले. भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाअंतर्गत येणा-या केंद्रीय संचार ब्यूरो, क्षेत्रीय कार्यालय-औरंगाबाद, जिल्हा प्रशासन औरंगाबाद व संत ज्ञानेश्वर महाविद्यालय, सोयगाव यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक २६ जुलै २०२२…

Read More

साईमत लाईव्ह  मुंबई प्रतिनिधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. बंड पुकारुन सत्ता स्थापन केल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी अनेक वेळा उद्धव ठाकरेंवर प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे हल्लाबोल केला आहे. मात्र आज ठाकरेंच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांनी पहिल्यांदाच शुभेच्छा व्यक्त केल्याचं दिसतंय. एकनाथ शिंदे यांनी ट्विटर हँडलवरुन ठाकरेंना जन्मदिनाच्या शुभेच्छा दिल्या. विशेष म्हणजे उद्धव ठाकरे यांचा उल्लेख ‘शिवसेना पक्षप्रमुख’ असा न करता ‘महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री’ असा केला आहे. ठाकरेंच्या निरोगी दीर्घायुष्यासाठी आई जगदंबेच्या चरणी शिंदेंनी प्रार्थना केली आहे. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेची जुनी कार्यकारिणी बरखास्त करत परस्पर नवी जाहीर केली. त्याचप्रमाणे धनुष्यबाण या निवडणूक चिन्हासह शिवसेनेवर दावा सांगण्याचा…

Read More

कडक उन्हानंतर आल्हाद गारवा घेऊन येणारा पावसाळा सर्वांनाच आवडतो. पण येणाऱ्या पावसासोबत अनेक आजारही येतात. पावसाळ्यात दूषित पाणी किंवा अन्नामुळे होणाऱ्या आजारांमुळे लोक त्रस्त होतात. या दिवसांत पचनशक्ती थोडी मंदावलेली असते. त्यामुळे स्वतःच्या तब्येतीची नीट काळजी घेऊन निरोगी राहणे महत्त्वाचे आहे. रोज उकळलेले पाणी पिणे, बाहेरचे किंवा उघड्यावरचे न खाणे हे नियम पावसाळ्यात पाळले पाहिजे. रोजच्या आहारात काही पदार्थांचा समावेश केल्यास रोगप्रतिकारक शक्ती वाढतेच आणि पावसामुळे होणाऱ्या आजारांपासून वाचता येते. लसूण लसणामध्ये ॲंटी-ऑक्सिडेंट्स मोठ्या प्रमाणात असतात. त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते. रोजच्या आहारात लसणाचा समावेश केल्याने पचनशक्ती सुधारते. तसेच मेटाबॉलिज्मही वाढते. इतर पदार्थांमध्येही त्याचा समावेश करून सेवन करता येतो. सर्वांना परिचित…

Read More

मुंबई : प्रतिनिधी एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेच्या आमदारांनी केलेल्या बंडखोरीनंतर राज्यातील वातावरण गढूळ झालं आहे. ठाकरे सरकार गेल्यानंतर बंडखोर आमदार पुन्हा स्वगृही परततील असं बोललं जात होतं. मात्र, आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या घरातच फूट पडण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरे यांचा भाऊ जयदेव ठाकरे यांच्या दुसऱ्या पत्नी स्मिता ठाकरे यांनी आज थेट मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेऊन त्यांना पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. त्यामुळे आता ठाकरे घराण्यातील सुनबाई स्मिता ठाकरे या शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती सुत्रांकडून मिळत आहे. स्मिता ठाकरे यांनी आज शिंदे यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी एकनाथ शिंदे यांचे समर्थन केले. एकनाथ शिंदे यांना खूप वर्षापासून ओळखते.…

Read More

मुंबई : प्रतिनिधी शिवसेनेचा मुख्यमंत्री पुन्हा होईल, असा विश्वास माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)यांनी व्यक्त केला. इतकेच नाही तर मुंबई महापालिकेवरही शिवसेनेचाच भगवा फडकेल, असेही ते म्हणाले. ‘सामना’ला(Samanna) दिलेल्या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी भाजप(BJP) आणि शिंदे गटावर पुन्हा एकदा हल्लाबोल केला. आज या मुलाखतीचा दुसरा भाग प्रदर्शित कारण्यात आला . महाविकास आघाडीचा प्रयोग चुकला नाही. लोकांनी स्वागतच केले. ‘वर्षा’(Varsha) सोडून जाताना महाराष्ट्रात अनेकांनी अश्रू अनावर झाले. कोणत्या मुख्यमंत्र्यांना असे प्रेम मिळाले? त्या अश्रूंचे मोल मी वाया जाऊ देणार नाही , असेही उद्धव ठाकरे म्हणाले. ज्यांना मी आपले मानले, तीच माणसं सोडून गेली, अशी खंतही त्यांनी व्यक्त…

Read More

मेष राशी: मेष राशीच्या लोकांना आजचा दिवस चांगला जाईल. व्यवसायात लाभ होईल. उधार दिलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणीही चांगली स्थिती दिसून येईल. आज नोकरदार लोकांना तुमच्या कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाची आणि समर्पणाची योग्य प्रशंसा आणि आदर मिळू शकेल. घरात आनंदाचे वातावरण राहील. आज ७२% नशिबाची साथ आहे. गुरुजन किंवा ज्येष्ठांचे आशीर्वाद घ्या. वृषभ राशी: वृषभ राशीच्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी आजचा दिवस चांगला आहे, त्यांना मेहनतीनुसार यश मिळेल. उच्च शिक्षणासाठी परदेशात जाण्याचा विचार करत असाल तर यश मिळेल. आज, वृषभ राशीचे लोक देखील ऊर्जा आणि उत्साहाने परिपूर्ण असतील. वडिलोपार्जित मालमत्तेबाबत एखादे प्रकरण प्रलंबित असेल, तर ते निकाली काढता येईल,…

Read More

साईमत लाईव्ह सोयगाव तालुका प्रतिनिधी सोयगाव येथील संत ज्ञानेश्वर महाविद्यालयात कारगिल शहीद दिनानिमित्त आयोजित वक्तृत्व स्पर्धेत कै,बाबूरावजी काळे मेमोरियल स्कूलची इयत्ता दहावीतील प्राची विजय पाटील(जरंडी) हिने वक्तृत्व स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकाविल्याने अजिंठा शिक्षण संस्थेच्या वतीने तिला पारितोषिक देण्यात आले सोयगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रकाश नाईक यांच्या हस्ते प्रमाणपत्र देवून प्राची पाटील या विद्यार्थिनीला गौरविण्यात आले.यावेळी व्यासपीठावर तहसीलदार रमेश जसवंत प्रमुख पाहुणे होते तर अध्यक्ष प्राचार्य डॉ,गणेश अग्निहोत्री,नगराध्यक्ष आशाबी तडवी,गटविकास अधिकारी प्रकाश नाईक,केंद्रीय संचार ब्युरोचे संतोष देशमुख,उपप्राचार्य डॉ,शिरीष पवार,शहीद जवान विष्णू चव्हाण यांचे पिता हरी चव्हाण,माहिती व प्रसारण मंत्रालयाचे क्षेत्रीय कार्यालयाचे प्रवीण पवार आदींची उपस्थिती होती.कारगिल दिनानिमित्त आयोजित स्पर्धेत विशेष…

Read More

साईमत लाईव्ह मुंबई प्रतिनिधी : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामनामधील मुलाखतीमध्ये एकनाथ शिंदे आणि इतर बंडखोरांवर घणाघाती टीका केली होती. उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटाच्या आमदारांची तुलना पालापाचोळ्याशी केली आहे. गेला तो पालापाचोळा आहे. तो उडून गेल्याशिवाय राहणार नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले होते. उद्धव ठाकरे यांच्या या विधानावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  यांनीही मोजक्या शब्दात उद्धव ठाकरे यांना प्रत्युत्तर दिले आहे. लक्षात ठेवा, याच पालापाचोळ्यांनी इतिहास घडवला, असे एकनाथ शिंदे म्हणाले. एकनाथ शिंदे हे माध्यमांशी बोलत असताना यावेळी त्यांना आजच्या उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतीतील पालापाचोळा या विधानाबाबत प्रतिक्रिया विचारली. त्यावर एकनाथ शिंदे म्हणाले, त्यांना आणखी काही बोलायचं ते बोलून…

Read More

साईमत लाईव्ह चाळीसगांव प्रतिनिधी केंद्रातील हुकूमशाही भाजप सरकारच्या चुकीच्या पद्धतीने केंद्रीय तपास यंत्रणा द्वारे विरोधकांना त्रास देण्याचा जो प्रकार सुरू आहे त्याचा निषेध करण्यासाठी शांततापूर्ण सत्याग्रह आज चाळीसगाव काँग्रेसतर्फे तहसील कार्यालयात करण्यात आला. केंद्रातील भाजपचे मोदी सरकार राजकीय सूडबुद्धीने मा. काँग्रेस अध्यक्षा श्रीमती सोनियाजी गांधी यांना लक्ष्य करीत असल्याचे आज संपूर्ण देश पाहत आहे.. भाजप सरकारने घेतलेले चुकीचे निर्णय व धोरण यावरून सर्वसामान्यांचे लक्ष विचलीत करण्यासाठी काँग्रेस नेत्यांना व कार्यकर्त्यांना नाहक त्रास देण्यात येत आहे,हे हुकूमशाही शासन केंद्रीय तपास यंत्रणा चा करीत असलेल्या गैरवापरा विरुद्ध सर्व काँग्रेस कार्यकर्ते एकजुटीने काँग्रेस अध्यक्ष सोनियाजी गांधी यांच्या सोबत उभे आहेत, केंद्रातील भाजप सरकारने…

Read More