साईमत लाईव्ह चाळीसगांव प्रतिनिधी
केंद्रातील हुकूमशाही भाजप सरकारच्या चुकीच्या पद्धतीने केंद्रीय तपास यंत्रणा द्वारे विरोधकांना त्रास देण्याचा जो प्रकार सुरू आहे त्याचा निषेध करण्यासाठी शांततापूर्ण सत्याग्रह आज चाळीसगाव काँग्रेसतर्फे तहसील कार्यालयात करण्यात आला.
केंद्रातील भाजपचे मोदी सरकार राजकीय सूडबुद्धीने मा. काँग्रेस अध्यक्षा श्रीमती सोनियाजी गांधी यांना लक्ष्य करीत असल्याचे आज संपूर्ण देश पाहत आहे.. भाजप सरकारने घेतलेले चुकीचे निर्णय व धोरण यावरून सर्वसामान्यांचे लक्ष विचलीत करण्यासाठी काँग्रेस नेत्यांना व कार्यकर्त्यांना नाहक त्रास देण्यात येत आहे,हे हुकूमशाही शासन केंद्रीय तपास यंत्रणा चा करीत असलेल्या गैरवापरा विरुद्ध सर्व काँग्रेस कार्यकर्ते एकजुटीने काँग्रेस अध्यक्ष सोनियाजी गांधी यांच्या सोबत उभे आहेत, केंद्रातील भाजप सरकारने सूडबुद्धीने माननीय सोनियाजी गांधी यांच्याविरुद्ध ई. डी. कार्यालयात खोट्या कारवाया थांबवत नाही तोपर्यंत काँग्रेस मागे हटणार नाही.. महात्मा गांधी यांच्या फोटोला पुष्पहार अर्पण करून शांततापूर्ण मार्गाने आंदोलन सुरू ठेवतील असे जाहीर करण्यात आले.
यावेळी चाळीसगाव शहर महिला काँग्रेस अध्यक्षा सौ अर्चना ताई पोळ यांनी माननीय तहसीलदार साहेब यांना शांततापूर्ण सत्याग्रहाचे निवेदन देऊन तहसील कार्यालयात धरणे आंदोलन केले आणि सोनियाजी गांधी यांच्याविरुद्ध ई.डी. कार्यालयात खोट्या कारवाई थांबवत नाही तोपर्यंत काँग्रेसचे हे आंदोलन सुरूच राहील प्रशासनाने केंद्रातील सरकारचे डोके तपासावे व त्यांची डोळ्यावरील असलेली पट्टी दूर करावी त्यावेळी माजी आमदार ईश्वर भाई जाधव यांनी केंद्र सरकारवर सडकून टीका केली… त्यावेळी शांततापूर्ण सत्याग्रहात सौ अर्चनाताई पोळ, कुसुम खरटमल, लता पगारे, लता वाणी, मंगल खरटमल, संगीता खरटमल, छाया खरटमल, मीना मोरे, मा.आमदार ईश्वरभाई जाधव, बाळासाहेब पाटील, मा. प्रदेश काँग्रेस प्रतिनिधी, प्रदीप दादा देशमुख, मा. जिल्हा उपाध्यक्ष रमेश शिंपी, शिवलाल साबणे साहेब, रवींद्र पोळ, रवी जाधव, अल्ताफ शेख, गंयासबाबा शेख, वाडीलाल चव्हाण, नितीन परदेशी, नितीन सूर्यवंशी, देविदास खरटमल, कल्याण देशमुख, गोविंदा सावळे, संतोष सुर्यवंशी ,बाळकृष्ण सोळंके, प्रज्वल जाधव, निलेश भडक, रामेश्वर कासार ,नितीन पवार, आनंद गांगुर्डे, अमोल राहुल, अमोल शिरोडे, बनभैरु काका इतर असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.