साईमत लाईव्ह सोयगाव तालुका प्रतिनिधी विजय चौधरी दिनांक २६/०७/२०२२ रोजी फर्दापुर पोलीस ठाणेचे सपोनि / डी बी वाघमोडे यांना त्याचे गुप्तबातमीदार मार्फत माहीती मिळाली की, फर्दापूर पोलीस ठाणे हद्दीतील मौजे रवळा शिवारातील गट क्रमांक ०९ मध्ये गांजा सारखी झाडे आहेत. मिळालेल्या माहीतीच्या आधारे सदर ठिकाणी पोलीस पथकासह व राजपत्रीत अधिकारी, कृषी पदविकाधारक अधिकारी असे जाऊन सदर शेताची पाहणी केली असता शेतात असलेला शेतकरी रामचंद्र दादा शिंदे रवळा यास मिळालेल्या माहीतीची थोडक्यात हकिगत सांगीतली. सदर शेताची सर्वांनी पाहणी केली असता इसम शेतकरी रामचंद्र दादा शिंदे याचे मालकीचे शेतात केळी पिकाच्या मधोमध गांजासारखी दोन झाडे दिसुन आली. इसम शेतकरी रामचंद्र दादा शिंदे…
Author: Saimat
भुसावळ – जळगाव येथील अशोक नगर मधील रहिवाशी व भुसावळ औष्णिक विद्युत वेंâद्र दीपनगरातील सेवानिवृत्त असिस्टंन इंजिनिअर खेमचंद मन्साराम भंगाळे (वय -८८) यांचे २७ जुलै रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली, जावई, सूना व नातवंडे असा परिवार आहे. ते भुसावळ येथील श्रीशिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ व के. एन.टी.सी.आय. संस्थेचे अध्यक्ष डॉ. मकरंद एन. नारखेडे यांचे सासरे होत.
साईमत लाईव्ह सोयगाव तालुका प्रतिनिधी सोयगाव तालुक्यातील फर्दापूर येथील जगप्रसिद्ध अजिंठा लेणी बघण्यासाठी देश, विदेशातील पर्यटक भारतात येतात. पावसाळ्यामधील निसर्गरम्य वातावरण व हिरवाईने नटलेली जगप्रसिद्ध लेणी व त्यावर निसर्गाने पांघरलेला हिरवा शालू,त्यातच नयनरम्य छोटे-मोठे धबधबे हे बघण्यासाठी हजारोच्या संख्येने पर्यटक हे लेणी बघण्यासाठी पावसाळ्यामध्ये जास्त प्रमाणात आपल्या परिवारासह आनंद घेण्यासाठी येतात.या पर्यटकांना आकर्षण असलेला लेणीजवळील वनविभागाअंतर्गत सप्तकुंड धबधबा हा पाहता येत नाही याचे कारण असे की, वनविभागाच्या बेजबाबदार कर्मचाऱ्याच्या सतत गैरहजेरीमुळे गेल्या चार वर्षापासून तो बंद आहे. सप्तकुंड मधून तापी खो-याला मिळणा-या वाघुर नदीचा उगम होतो अशा ह्या उगमस्थान असणा-या या वाघुर नदीच्या उगम सप्तकुंड बघण्यासाठी पर्यटकांचा गेल्या चार वर्षापासून…
साईमत लाईव्ह कजगाव ता भडगाव प्रतिनिधी कजगाव ता भडगाव येथे महावितरणने सक्तीच्या वसुलीने चांगलाच कहर केला असून महावितरणच्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या सामाजिक दृष्ट्या बेजबाबदारपनाच्या वागणुकीमुळे ग्रामस्थांनि तीव्र नाराजी व्यक्त केली, त्यामुळे महावीरणच्या विरोधात तीव्र असंतोष पसरला आहे. गावात अनेक ठिकाणी कुठलीच पूर्व सूचना न देता व घरी कोणीच नसतांना सुद्धा विद्युत पुरवठा खंडीत केला जात आहे. तसेच विद्युत वितरण कंपनीकडून नागरिकांना जाणून बुजून त्रास दिला जात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे , घरांचे व अन्य ठिकाणी वापर असलेल्या विद्युत पुरवठाचे महिन्याचे बिल थकीत असले तरी ग्राहकाला कुठलीच सूचना नदेता वीज कनेक्शन कट करण्याचा प्रकार व गोरगरिबांना वेटीस धरण्याचा प्रकार सुरू आहे…
भुसावळ – कै गीताबाई काशिनाथ बानाईत यांचे दि २७/०७/२०२२ राजे अल्पशा आजाराने निधन झाले. त्याची अंतयात्रा दि २७/०७/२०२२ रोजी संध्याकाळी ८.३० वाजता राहत्या घरून फेकरी, भुसावल ता. जि. जलगांव येथून निघेल. ते गजानन काशिनाथ बानाईत यांच्या आई होत्या.
साईमत लाईव्ह जामनेर प्रतिनिधी शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांचा आज वाढदिवस निमित्त येथील शिवसेना जामनेर शहर शाखेच्या वतीने मोठ्या उत्साहात वाढदिवस साजरा करण्यात आला व जामनेर उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांना फळ वाटप करण्यात आले. याप्रसंगी शहर प्रमुख अतुल सोनवणे शहर प्रमुख ज्ञानेश्वर जंजाळ युवा सेना माजी उपजिल्हाप्रमुख एडवोकेट भरत पवार उपशहर प्रमुख सुरेश चव्हाण उपशहर प्रमुख कैलास माळी माजी शिवसेना तालुकाप्रमुख एडवोकेट प्रकाश पाटील खुशाल पवार ज्ञानेश्वर राठोड युवराज पाटील यांच्या शिवसेनेचे पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पहुर शिवसेना शहर शाखेच्या वतीने येथील गणपती मंदिरात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त महाआरती करण्यात आली. याप्रसंगी शिवसेना तालुका प्रवक्ता…
मुंबई : प्रतिनिधी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. मातोश्रीमध्येसुद्धा शुभेच्छा देणाऱ्यांच्या रांगा लागल्या आहेत. मातोश्री निवासस्थानी फुलांची सजावट करण्यात आली. गेटवर मध्यभागी फुलांनी धनुष्यबाण(Dhanushyaban) साकारण्यात आला आहे. तसेच मातोश्रीच्या परिसरात शुभेच्छा देणारे बॅनर्सही लावण्यात आलेत.एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेना कमकुवत झाली असली तरी सामान्य शिवसैनिकांनी मातोश्रीवर गर्दी केलेली पाहायला मिळत आहे. अशातच ठाकरेंचे सुपुत्र आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनीही वडिलांना शुभेच्छा दिल्यात. आदित्य ठाकरेंनी इंस्टाग्रामवर फोटो शेअर केला आहे. त्या फोटोत उद्धव ठाकरे गॉगल लावून, जीन्स घालून अत्यंत कुल दिसत आहेत.”माझ्या वडिलांना आणि माझ्या नेत्याला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. मी करत असलेली प्रत्येक…
जळगाव : प्रतिनिधी संजय गांधी योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी दोन हजारांची लाच मागून ती स्वीकारताना जळगाव तहसील कार्यालयातील शिपायाला लाचलुचपत विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले आहे. या कारवाईमुळे महसुल विभागात खळबळ उडाली आहे. तक्रारदार या घटस्फोटीत असून निराधार असून मुलगी व आई सोबत त्या वास्तव्यास आहेत. जळगाव तहसील कार्यालयाचे रेल्वे स्थानकाजवळील पोलिस कार्यालयाजवळ कार्यालय असून तेथे शिपाई मगन गोबा भोई रा. वाघ नगर, जळगाव हे संगायो योजनेचे फार्म जमा करता. संजय गांधी निराधार योजनेंतर्गत लाभार्थींचे फार्म स्वीकारणे व लाभार्थींना शासकीय अनुदान मिळवून देणे हे त्यांचे काम आहे. तक्रारदार त्यांच्याकडे आल्यानंतर आरोपीने बुधवारी २७ जुलै रेाजी त्यांच्याकडे आईचे काम करून ३ तीन…
जळगाव ः प्रतिनिधी शहरातील एमआयडीसी हद्दतील कंजरवाडा परिसरात कोम्बिंग ऑपरेशन राबवत हिस्ट्रीसिटरवरील 12 गुन्हेगारांना तपासण्यात आले. दरम्यान, या कारवाईत 7 जणांविरुध्द गुन्हे दाखल करत 95 हजार 500 रुपयांचा अवैध गावठी दारुचे रसायन नष्ट करण्यात आले आहे. जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ.प्रविण मुंडे यांच्या आदेशाने व एमआयडीसी पोलिस स्थानकाचे पोलिस निरिक्षक प्रताप शिकारे यांच्या मार्गदर्शनाखाली कोंम्बिग ऑपरेशन राबविण्यात आले. यावेळी परिसरातील 12 हिस्ट्रीसिटर गुन्हेगारांची तपासणी करण्यात आली. हद्दपार केलेल्या 1 हिस्ट्रीसिटरचा तपास करण्यात आला. त्याचबरोबर रेकॉर्डवर असलेल्या सात गुन्हेगारांना शोधण्यात आले. यावेळी कंजरवाडा परिसरात पाच पोलिसांच्या टिम तयार करण्यात आली होती. या दरम्यान सात ठिकाणी धाडी टाकल्या असता. सात आरोपींविरुध्द गुन्हे दाखल…