महामार्गावर रात्री अपघातात एक ठार

0
3

जळगाव : प्रतिनिधी

शहरातून भुसावळकडे जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर रात्री १० वाजेच्या सुमारास दुचाकीस्वाराचा अपघात झाला. या अपघातात तरसोद येथील व्यक्ती कामावर जात असताना अपघातात ठार झाल्याची घटना घडली आहे.

मिळालेली माहिती अशी की, जळगाव – भुसावळ महामार्गावर असलेल्या गौरव हॉटेलपासून ते चौपदरीकरण झालेल्या हायवेपर्यंतचा रस्ता हा खूप अरूंद असल्याने यावर कायम लहानमोठे अपघात होत असतात. याच प्रकारे रात्री एका मोटारसायकलस्वाराला आपले प्राण गमवावे लागले आहे.

तरसोद येथील रामचंद्र चिंधू कुंभार हे रेमंड कंपनीत कामाला असून ते रात्री साडेदहाच्या सुमारास ड्युटीवर जात होते. महामार्गावरील चांडक हॉस्पीटलच्या परिसरात ते एका ट्रकच्या मागील चाकात असल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिसांनी अपघातस्थळी धाव घेतली. याबाबत रात्री उशीरापर्यंत गुन्हा नोंद करण्याचे काम सुरू होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here