जळगाव : प्रतिनिधी वन्यजीव संरक्षण संस्था, वन विभाग जळगाव, यावल जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे जागतिक व्याघ्र दिनाच्या पार्श्वभूमीवर मानव वन्यजीव संघर्ष टाळणे, व्याघ्र संवर्धनासाठी जनजागृती कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. या अनुषंगाने 28 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातून व्याघ्र संवर्धन जनजागृती मोटारसायकल रॅली काढण्यात येणार आहे तसेच वन्यजीवचे व्याघ्रदूत ‘वाघ वाचवा’चा संदेश देत गावागावात जनजागृती करणार आहे कार्यक्रमास जिल्हाधिकारी अभिजित राऊत, मुख्य वनसंरक्षक डिगंबर पगार, पोलिस अधीक्षक प्रवीण मुंढे, जळगाव उपवनसंरक्षक विवेक होशिंग, यावल उपवनसंरक्षक एच. एस. पद्मनाभा, टायगर कॉन्झर्वेशन ॲण्ड रिसर्च सेंटर मुंबईचे प्रसाद हिरे, स्टँडिंग फॉर टायगर फाउंडेशनचे रवींद्र मोहोड सहभागी होणार आहेत. आमदार सुरेश भोळे, महापौर जयश्री…
Author: Saimat
साईमत लाईव्ह यावल प्रतिनिधी तालुक्यातील म्हैसवाडी प्राथमिक आरोग्य उपकेंद्र बांधकामाची आणि खर्च करण्याची मुदत 31 मार्च 2022 रोजी संपलेली असताना आज सुद्धा बांधकाम अपूर्णच असल्याने बांधकाम विभाग जिल्हा परिषद जळगाव कार्यकारी अभियंता आणि रावेर जिल्हा परिषद बांधकाम उपविभागीय अभियंता यांच्यावर जिल्हा परिषद सदस्यांचा आणि संबंधित ठेकेदार गजानन मधुकर सोनार यांचा प्रभाव असल्याचे असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाल्याबाबत तसेच यावल तालुक्यातील म्हैसवाडी येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या बांधकामाबाबत कार्यारंभ आदेश दिल्यानंतर संबंधित कार्यकारी अभियंता,उपविभागीय अभियंता आणि ठेकेदार गजानन सोनार यांच्या मिलीभगत कड़े जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांचे तसेच यावल पंचायत समिती गट विकास अधिकारी यांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष झाल्याचे संपूर्ण यावल तालुक्यासह जिल्ह्यात…
जळगाव : प्रतिनिधी शिवसेना व शिंदे सेनेतील राजकीय वाद वाढतच चालला आहे. दोन्ही गटातील नेत्यांकडून एकमेकांना लक्ष्य करण्यात येत आहे. त्यात आता थेट पूर्वी दिलेल्या साधनसामग्री काढून घेण्याचे प्रकार सुरू आहे. शिंदे गटाने गेल्या शुक्रवारी रुग्णवाहिका परत घेतल्यानंतर शिवसेनेकडून तातडीने पर्यायी व्यवस्था उभारण्यात आली.पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आज 27 जुलै रोजी सकालली येथील शिवसेना कार्यालय परिसरात ज्येष्ठ शिवसैनिकांंच्या हस्ते दोन रुग्णवाहिकांचे उत्साहात लोकार्पण करण्यात आले . याप्रसंगी सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, जिल्हा प्रमुख विष्णू भंगाळे,महापौर जयश्रीताई महाजन,महानगर प्रमुख शरद तायडे, उपमहापौप कुलभूषण पाटील,माजी महापौर नितीन लढ्ढा, मनपा विरोधी पक्षनेते सुनिल महाजन,नगरसेवक बंटी जोशी आदींची…
मुंबई : प्रतिनिधी सतत प्रयत्न करुनही अनेकदा यश पदरी पडत नाही आणि तिथेच आपल्या संयमाचा बांध फुटतो. जीवाचा आटापिटा करुनही एखादी गोष्ट मिळत नाही, त्यावेळी होणाऱ्या वेदना नेमक्या काय असतात याची नव्यानं ओळख करुन देण्याची गरज नाही. पण, स्वप्नांचा पाठलाग करणं सोडण्यापेक्षा त्या स्वप्नांच्याच साथीनं मोठं होण्याचा प्रयत्न केलाय का कधी? केरळमधील एका व्यक्तीनं हा प्रयत्न केला. आयुष्यातील खाचखळगे त्याच्यासाठी प्रमाणाहून जास्तच आव्हानात्मक ठरले. पण, तो खचला नाही. विश्वास बसणार नाही, पण इडली आणि डोश्याचं पीठ विकून त्यानं कोट्यवधींच्या श्रीमंतीचा डोलारा उभा केला. या व्यक्तीचं नाव, मुस्तफा पीसी. मुस्तफा पीसी यांचा जन्म केरळमध्ये झाला. त्यांचे वडील कुली होते. इयत्ता सहावीमध्ये…
साईमत लाईव्ह मुक्ताईनगर प्रतिनिधी तालुक्यातील उचंदा आरोग्य केंद्रात आरोग्य कर्मचार्यांचे दुर्लक्ष झाल्याने अक्षरश: साथीच्या काळात रुग्णांना मरण यातनांना सामोरे जावे लागत आहे. या आरोग्य केंद्रात नागरी सुविधांसाठी मनसेचे तालुकाध्यक्ष मधुकर भोई यांनी आरोग्य अधिकार्यांना निवेदन दिले आहे. याबाबत माहिती अशी की, मुक्ताईनगर तालुका अंतर्गत उचंदा आरोग्य केंद्रात वैद्यकीय सुविधा देणारे कर्मचारी आरोग्य केंद्रात दिलेल्या वेळेवर येत नसल्याची तक्रार स्थानिकांनी मनसेकडे केली होती. यावरुन मनसेचे तालुकाध्यक्ष मधुकर भोई यांनी आरोग्य केंद्रा संदर्भात माहिती जाणून घेतली असता धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मनसेचे सदस्य गजानन पाटील यांनी आरोग्य केंद्राजवळ पाहणी केली असता आरोग्य केंद्रात तापाने फणफणत असलेले रुग्ण वैद्यकीय अधिकार्यांच्या प्रतिक्षेत असल्याचे…
मुंबई : प्रतिनिधी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)यांच्या महामुलाखतीचा दुसरा भाग आज शिवनेसेचे(Shivsena)मुखपत्र असलेल्या सामनामध्ये प्रसिद्ध करण्यात आला आहे. या मुलाखतीमध्ये उद्धव ठाकरे यांनी शिंदे गट आणि भाजपवर(BJP) हल्लाबोल केला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी अनेक मुद्द्यांवर चर्चा केली.भाजपमधील नाराजीबद्दलही त्यांनी उघडपणे मत मांडले. भाजप पक्षातील क्षातले जुनेजाणते निष्ठावान, त्यावेळी आमच्या बरोबर युतीत असणारे अनेक नेते आजही माझ्या संपर्कात आहेत. पण ते निष्ठेने भाजपसोबत आहेत. मात्र भाजपचे ते निष्ठावान नेते शिवसेनेत येणार असा पोकळ दावा मी करणार नाही. मात्र त्यांना सध्याच्या गोष्टी पटत नाहीत. पण तरीदेखील ते निष्ठेने भाजपचे काम करत आहेत, असा खुलासा उद्धव ठाकरे यांनी केला .बाहेरच्या माणसांना…
साईमत लाईव्ह सोयगाव तालुका प्रतिनिधी भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालय, केंद्रीय संचार ब्यूरो, क्षेत्रीय कार्यालय-औरंगाबाद, जिल्हा प्रशासन, औरंगाबाद व संत ज्ञानेश्वर महाविद्यालय सोयगाव तर्फे कारगिल विजय दिनानिमित्त रॅली, निबंध स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, वकृत्व स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम, मार्गदर्शन, लसीकरण कॅम्प, शहीदांच्या कुटुंबाचा सत्कार कार्यक्रम मंगळवारी संपन्न झाला. ‘कारगिल युद्धात शहिदांना मार्गदर्शन करतांना उपस्थितीत विद्यार्थ्यांना म्हणाले, झालेल्या अमर जवानांच्या स्मरणार्थ कारगिल विजय दिवसाचे स्मरण करणे आवश्यक आहे’ असे प्रतिपादन तहसिलदार, रमेश जसवंत यांनी केले. भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाअंतर्गत येणा-या केंद्रीय संचार ब्यूरो, क्षेत्रीय कार्यालय-औरंगाबाद, जिल्हा प्रशासन औरंगाबाद व संत ज्ञानेश्वर महाविद्यालय, सोयगाव यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक २६ जुलै २०२२…
साईमत लाईव्ह मुंबई प्रतिनिधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. बंड पुकारुन सत्ता स्थापन केल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी अनेक वेळा उद्धव ठाकरेंवर प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे हल्लाबोल केला आहे. मात्र आज ठाकरेंच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांनी पहिल्यांदाच शुभेच्छा व्यक्त केल्याचं दिसतंय. एकनाथ शिंदे यांनी ट्विटर हँडलवरुन ठाकरेंना जन्मदिनाच्या शुभेच्छा दिल्या. विशेष म्हणजे उद्धव ठाकरे यांचा उल्लेख ‘शिवसेना पक्षप्रमुख’ असा न करता ‘महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री’ असा केला आहे. ठाकरेंच्या निरोगी दीर्घायुष्यासाठी आई जगदंबेच्या चरणी शिंदेंनी प्रार्थना केली आहे. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेची जुनी कार्यकारिणी बरखास्त करत परस्पर नवी जाहीर केली. त्याचप्रमाणे धनुष्यबाण या निवडणूक चिन्हासह शिवसेनेवर दावा सांगण्याचा…
कडक उन्हानंतर आल्हाद गारवा घेऊन येणारा पावसाळा सर्वांनाच आवडतो. पण येणाऱ्या पावसासोबत अनेक आजारही येतात. पावसाळ्यात दूषित पाणी किंवा अन्नामुळे होणाऱ्या आजारांमुळे लोक त्रस्त होतात. या दिवसांत पचनशक्ती थोडी मंदावलेली असते. त्यामुळे स्वतःच्या तब्येतीची नीट काळजी घेऊन निरोगी राहणे महत्त्वाचे आहे. रोज उकळलेले पाणी पिणे, बाहेरचे किंवा उघड्यावरचे न खाणे हे नियम पावसाळ्यात पाळले पाहिजे. रोजच्या आहारात काही पदार्थांचा समावेश केल्यास रोगप्रतिकारक शक्ती वाढतेच आणि पावसामुळे होणाऱ्या आजारांपासून वाचता येते. लसूण लसणामध्ये ॲंटी-ऑक्सिडेंट्स मोठ्या प्रमाणात असतात. त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते. रोजच्या आहारात लसणाचा समावेश केल्याने पचनशक्ती सुधारते. तसेच मेटाबॉलिज्मही वाढते. इतर पदार्थांमध्येही त्याचा समावेश करून सेवन करता येतो. सर्वांना परिचित…
मुंबई : प्रतिनिधी एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेच्या आमदारांनी केलेल्या बंडखोरीनंतर राज्यातील वातावरण गढूळ झालं आहे. ठाकरे सरकार गेल्यानंतर बंडखोर आमदार पुन्हा स्वगृही परततील असं बोललं जात होतं. मात्र, आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या घरातच फूट पडण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरे यांचा भाऊ जयदेव ठाकरे यांच्या दुसऱ्या पत्नी स्मिता ठाकरे यांनी आज थेट मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेऊन त्यांना पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. त्यामुळे आता ठाकरे घराण्यातील सुनबाई स्मिता ठाकरे या शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती सुत्रांकडून मिळत आहे. स्मिता ठाकरे यांनी आज शिंदे यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी एकनाथ शिंदे यांचे समर्थन केले. एकनाथ शिंदे यांना खूप वर्षापासून ओळखते.…