पिंपळगाव बु. : प्रतिनिधी
पत्रकारांच्या न्याय व हक्कासाठी लढणाऱ्या लोकशाही मराठी पत्रकार संघाच्या जामनेर तालुका उपाध्यक्षपदी संतोष रामा पांढरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संघाचे संस्थापक अध्यक्ष सचिन बोंबले, राज्य उपाध्यक्ष अमोल पाटील यांनी ही नियुक्ती केली असून यांच्या स्वाक्षरीचे नियुक्तीपत्र संतोष पांढरे यांना नुकतेच प्राप्त झाले आहे.
संतोष पांढरे हे गेल्या अनेक वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी या क्षेत्रात केलेल्या कार्याची दखल घेत उत्तर महाराष्ट्रचे विभागीय अध्यक्ष दीपक वाघ, औरंगाबादचे विभागीय सचिव प्रवीण तायडे, जळगाव जिल्हाध्यक्ष विष्णू मोरे यांच्या शिफारशीने ही नियुक्ती करण्यात आली आहे. पांढरे यांच्या निवडीबद्दल लोकशाही मराठी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष सचिन बोंबले, राज्य उपाध्यक्ष अमोल पाटील, राज्याचे प्रसिद्धी प्रमुख मनोज खोब्रागडे, उत्तर महाराष्ट्र विभागाचे अध्यक्ष दीपक वाघ, मराठवाडा विभागीय अध्यक्ष दशरथ सुरडकर, सचिव प्रविण तायडे यांसह विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी, समाजसेवक, तहसीलदार, गटविकास अधिकारी व विविध विभागांचे अधिकारी यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.