डांभुर्णी येथे विवाहित महिलेची गळफास घेऊन आत्महत्या

0
4

यावल : तालुका प्रतिनिधी

डांभुर्णी येथील रहिवाशी अर्चना राजेंद्र कोळी वय 33 यांनी आज बुधवार दि.27 रोजी दुपारी 15:30 वाजेच्या सुमारास आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली.
याबाबत सविस्तर वृत्त असे की,अर्चना कोळीचे माहेर हे सुरतचे असून डांभुर्णी येथे ती 16/17 वर्षांपासून लग्न होऊन आली होती.घरातील सर्व परिवार व कुंटूंबाची संपूर्ण जबाबदारी ती पर पाडत होती.सासरी ती सुखी समाधानी आनंदी होती.मात्र तीने घेतलेल्या टोकाच्या भूमिकेने हे कुटुंब उघडे पडले आहे.आज दुपारी अर्चना ही घरात एकटी असतांना तिचे सासरे व पती हे कामानिमित्त बाहेर गेले होते व त्यांची मुले शाळेत गेलेले असतांना आपल्या घरात गळफास घेत तीने आपली जीवनयात्रा संपवली.दुपारी मुलगा शाळेतुन घरी आला असता बंद दरवाजा उघडताच घरातील छताला लटकलेल्या आईच्या मृतदेह पाहून त्याने रडत रडत वडिलांचा शोध घेतला.व वडिलांना घटने बाबतीत माहिती सांगताच राजेंद्र बळीराम कोळी यांनी घराकडे धाव घेतली.व गावातच रहिवास असलेल्या नातेवाईकांना घटनेची माहिती दिली बुधवारचा बाजार असल्याने या घटनेची चर्चा पसरताच लोकांनी गर्दी केली.अर्चना कोळी यांची घरातील परिस्थिती चांगली असून घरातील सर्व बाबी तीच सांभाळून घेत असल्याचे तिचे सासरे सांगत होते.मात्र सात आठ दिवसापासून ती सुस्तच राहत असल्याने व तीची तब्बेत बरी नसल्याचे ती घरच्यांना सांगत असल्यांचेही त्यांच्या कुंटुंबियांकडून सांगण्यात आले. वैद्यकीय उपचार करून तिला बर वाटू लागलं असतांना तीने टोकाचे पाऊल उचल्याने या कुटुंबावर आभाळ कोसळल आहे. तिच्या पच्यात पती,सासरे,लहान दोन मुली व एक मुलगा असा परिवार आहे.मोठी मुलगी10वर्ष,दुसरी मुलगी 9वर्ष,मुलगा 8वर्ष असे असल्याने मुलांच्या डोक्यावरील ममतेचे छत्र हरपल्याने मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.घटनेची माहिती पो.पाटील यांना कळताच त्यांनी घटनेस्थळी धाव घेत अर्चना कोळी यांना यावल येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविले व तेथील वैद्यकीय अधिकारी डॉ.सचिन देशमुख यांनी तपासणी अंती मृत घोषित केले.माहेरची मंडळी उद्या येणार असल्याने उद्या सेवाविच्छेदन करून मृतदेह ताब्यात मिळणार असल्याचे कुटुंबियांकडून सांगण्यात आले.या घटने बाबतीत यावल पोलिसात राजेंद्र कोळी यांचे जाबजबाब घेतले असून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे पुढील कार्यवाही व तपास पो.नि.दिलीप भागवत यांचे मार्गदर्शनाखाली बीट हवालदार हे.कॉ.अजीज शेख व नरेंद्र बगुले हे करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here