Author: Saimat

साईमत लाईव्ह मलकापूर प्रतिनिधी मलकापूर थोर समाजसुधारक, लोककवी, लेखक लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे. त्यानिमित्ताने मलकापूर येथे निघालेल्या भव्य रॅलीला संबोधित करतांना व अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन करतांना मलकापूर आमदार राजेश एकडे संबोधित करताना म्हणाले की अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या लेखणीतून शोषितांचा आक्रोश आपल्या शब्दातून मांडून समाज जागृती केली. म्हणतात की कडकडे डफावर थाप तू शोषितांचा मायबाप तू .हे मानवा तू गुलाम नाहीस तू या वास्तव जगाचा निर्माता आहेस असे असंख्य विचार त्यांनी समस्त भारतीयांना दिलेत. अण्णाभाऊ साठे म्हणतात की जग बदल घालुनी घाव सांगून गेले मज भीमराव… अशा या समाज सुधारक थोर पुरुषाला…

Read More

शिवसेनेची बुलंद तोफ मानल्या जाणाऱ्या खा. संजय राऊतांना रविवारी कथित पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने अटक केली. त्यानंतर कोट्राने त्यांना 4 आठवड्यांपर्यंत ईडीची कोठडी सुनावली आहे. या अटकेमुळे अवघा महाराष्ट्र ढवळून निघाला. त्याचे संसदेतही तीव्र पडसाद उमटले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही या प्रकरणी सगळे दिवस सारखेच नसतात असे नमूद करत भाजप व केंद्र सरकारला निर्वाणीचा इशारा दिला. त्यानंतर आता थेट काँग्रेस नेते खा. राहुल गांधी यांनी राऊतांच्या समर्थनार्थ ट्विट करून त्यांना आपला पूर्ण पाठिंबा दर्शवला आहे. काय म्हणाले राहुल गांधी? राहुल गांधी यांनी रविवारी रात्री संजय राऊतांना ईडीने अटक केल्याच्या बातमीचा स्क्रीनशॉट ट्विट भाजपवर निशाणा साधला. ते म्हणाले – ‘राजाचा…

Read More

संजय राऊतांच्या घरात ईडीचे पथक घुसले. त्यांना अटक झाली. अशा तपास यंत्रणांची झुंडशाही आणि दिल्लीश्वरांच्या हुकूमशाहीचे हे शेवटचे टोक आहे. सत्य व परखड बोलणाऱ्यांच्या जिभाच छाटायच्या किंवा नरडी आवळायची. हे असले दळभद्री प्रकार इंदिरा गांधींनी आणलेल्या आणीबाणीतही घडले नव्हते असा घणाघात शिवसेनेचे मुखपत्र सामनातील अग्रलेखात करण्यात आला. ज्या देशात राजकीय विरोधकांशी सन्मानाने वागले जात नाही त्या देशात लोकशाही व स्वातंत्र्याचे मोल संपते व नंतर देश संपतो अशी टीकाही करण्यात आली. तुरुंगही कमी पडतील महाराष्ट्रावर एकापाठोपाठ घाव घातले जात असून महाराष्ट्र तोडण्याआधी शिवसेनेला संपवायलाच हवे. त्यासाठी तर फोडाफोडी, दहशत निर्माण करायची, महाराष्ट्र काय किंवा शिवसेना काय कधीही झुकणार नाही. संजय राऊतांसारखे…

Read More

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरेंच्या तोफा आज पुण्यात धडाडणार आहेत. एकनाथ शिंदे हे अतिवृष्टी, पेरणी आणि विकास कामांबाबतचा आढावा घेणार आहेत. त्यांच्या उपस्थितीत दिवसभरात जाहीर सभेसह भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तर, शिवसेनेचे नेते युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांचीही संध्याकाळी कात्रज चौकात जाहीर सभा होणार आहे. शिंदे आणि ठाकरे यांच्या राजकीय तोफा धडाडणार असून, त्याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज सकाळी 11 वाजता विभागीय आयुक्त कार्यालयात अतिवृष्टी, पेरणी आणि विकास कामांचा आढावा घेणार आहेत. त्यानंतर ते 1.20 दरम्यान फुरसुंगी पाणी योजना प्रकल्पाची पाहणी करतील. दुपारी 2.15 ला ते श्री खंडोबा जेजुरी देवस्थान येथे…

Read More

मेष : आजचा दिवस व्यस्त असेल. वाहन सावकाश चालवा. कोणत्याही महत्त्वाच्या कामात जवळच्या व्यक्तींकडून सल्ला घ्या. आरोग्याची काळजी घ्या. दिवस चांगला आहे. इच्छा नसताना कार्यक्रमात उपस्थित राहावं लागेल. वृषभ: कुटुंबातील वाद कमी होतील. स्वतःच्या वाणीवर संयम ठेवा. घरातील वरिष्ठांचा सल्ला घ्या. वाहन सावकाश चालवा. स्वतःची आणि कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घ्या. दिवस चांगला आहे.  मिथुन : चंचलता वाढेल. काम वेळेत पूर्ण करा. मित्रांची मदत करा. आज तुम्हाला तुमच्या कंपनीला मोठ्या ठिकाणी रिप्रेजेन्ट करण्याची संधी मिळेल. नोकरी करणाऱ्यांसाठी दिवस चांगला आहे. नाराज असलेल्यांची समज काढाल. मान सन्मान मिळेल. दिवस चांगला आहे. कर्क : छोट्या छोट्या गोष्टीपासून काही तरी नवी शिका. ऑनलाइन व्यापार…

Read More

भारतीय रेल्वे (Indian Railway)ही आजही देशातील वाहतुकीचे आणि दळणवळणाचे महत्त्वाचे साधन आहे. लाखो प्रवासी दररोज रेल्वेने प्रवास करतात. येत्या काही वर्षांत भारतातील रेल्वे स्टेशनचे(Railway Station) चित्र बदलू शकते. 40 हून अधिक स्थानकांचे मॉल्समध्ये रूपांतर केले जाऊ शकते आणि त्यासाठी रेल्वे 17,500 कोटींचे पॅकेज तयार करते आहे. ही स्टेशन्स रूफटॉप प्लाझाने सुसज्ज असतील. ज्यामध्ये शॉपिंग सेंटर्स, फूड कोर्ट आणि रेस्टॉरंट असतील. भारतीय रेल्वे (Indian Railway)ही आजही देशातील वाहतुकीचे आणि दळणवळणाचे महत्त्वाचे साधन आहे. लाखो प्रवासी दररोज रेल्वेने प्रवास करतात. येत्या काही वर्षांत भारतातील रेल्वे स्टेशनचे(Railway Station) चित्र बदलू शकते. 40 हून अधिक स्थानकांचे मॉल्समध्ये रूपांतर केले जाऊ शकते आणि त्यासाठी रेल्वे…

Read More

भुसावळ : निलेश वाणी जिल्हा परिषद , पंचायत सामिती व नगर परिषदेची निवडणूक तोंडावर आहे. सध्या राज्यातील राजकीय वातावरण काही प्रमाणात गढुळच आहे, त्याचे पडसाद भुसावळ च्या राजकारणावर पडलेले आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक होणार असून कसोटी मात्र नेतृत्वाची लागणार आहे. कार्यकर्ते संभ्रमात असून ऐनवेळी अनपेक्षित घटना घडू शकतात . जुने व नवे कार्यकर्ते संभ्रमात आहेत. आज पर्यंतचा इतिहास पाहता नव्यांनाच संधी मिळत असल्याने नेत्यांचीही कसोटी लागणार आहे. भुसावळ हे कॉस्मो पॉलिटिन  शहर आहे. येथील राजकारणावर माजी मंत्री आ. एकनाथराव खडसे , माजी मंत्री  आ. संजय सावकारे व माजी आ . संतोष चौधरी यांची पकड आहे. आ. एकनाथराव खडसे हे…

Read More

साईमत लाईव्ह मुंबई प्रतिनिधी : पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी  शिवसेना खासदार  संजय राऊत  यांना न्यायालयाने चार ऑगस्टपर्यंत ईडीची कोठडी सुनावली आहे. पत्राचाळ घोटाळ्यात एक हजार कोटी रुपयांचा घोटाळा झाला होता असा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. रविवारी ईडीने राऊत यांच्या घरी धाड घालून साडे अकरा लाख रुपये रोख रक्कम जप्त केली होती. तसेच पत्राचाळ प्रकरणी अनेक कागदपत्रही ईडीने जप्त केली होती. आज ईडीने राऊत यांना कोर्टात सादर केले असता त्यांना चार ऑगस्टपर्यंत ईडीची कोठडी सुनावली आहे. https://twitter.com/LiveLawIndia/status/1554049285028978688?s=20&t=fIVw12GkoB-bk4YJ01deSQ वकील अशोक मुंदरगी यांनी मांडली बाजू कोर्टात संजय राऊत यांची वकील अशोक मुंदरगी यांनी बाजू मांडली. अशोक मुंदरगी म्हणाले की, संजय राऊत हे हार्ट पेशंट…

Read More

साईमत लाईव्ह जामनेर प्रतिनिधी जामनेर वाकी रोड चांगदेव नगर येथे वाचनालय कार्यलात मध्ये भ्रष्टाचार विरोधी मोर्चा दिल्ली ची बैठक संपन्न झाली आज दि.३१ जुलै रविवार रोजी भ्रष्टाचार विरोधी मोर्चा दिल्ली ची बैठक महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष राहूल जी गंगावणे यांच्या अध्यक्षते खाली पार पडली .या बैठकीत पदाधिकारी यांनी मार्गदर्शन केले व कार्यकर्त्यांना भ्रष्टाचार विरोधात आवाज उठविणे , अन्याया विरोधात खंबीरपणे उभे राहणे , जन सामान्यांची आवाज उठविणे व जन हिताचे कामं करणे बाबत सांगितले. बैठकीत जळगांव जिल्हा महीला अध्यक्ष वैशाली विलास चौधरी यांची निवड करण्यात आली जळगांव जिल्हा उपाध्यक्ष संतोष भगत व महीला जामनेर शहर अध्यक्ष पदी महीला निलम मुळे यांची…

Read More

साईमत लाईव्ह चाळीसगाव प्रतिनिधी गेल्या आठवड्यात पाटणादेवी मंदिराकडे नदीवरचा लोखंडी पूल काढण्यात आला होता नंतर वनविभागाने आदेश काढले होते की, मंदिर दर्शनाला काही दिवसासाठी बंद. त्या संदर्भातील वृत्त माध्यमांमध्ये  व  सोशेल मेडियावर सर्वत्र झडकले. मंदिर दर्शन सर्वांसाठी बंद असतांना रविवारी दर्शनासाठी व्हीआयपी गेस्ट यांना सोडण्यात आल्याचे वृत्त आहे. सर्वसामान्य माणूस गेल्यावर मुख्य गेटवर असलेले वनरक्षक मोरे व फॉरेस्ट अधिकारी देसाई यांना जाऊ दिले.त्यांना आमचे प्रतिनिधी यांनी हटकले असता, गेटवरील वनरक्षक म्हणतात की, ते न्यायाधीश यांची मुले आहेत.आम्हाला आमदार, खासदार यांचे कॉल आले तर आम्ही दर्शनासाठी सोडू. मंदिर दर्शन सर्वच बंद असतांना सर्वसामान्य माणूस व व्हीआयपी माणूस दर्शनासाठी जाऊ न देता…

Read More