शिवसेना खासदार संजय राऊत यांना ४ ऑगस्टपर्यंत ईडीची कोठडी, कोर्टाचा निर्णय

0
2

साईमत लाईव्ह मुंबई प्रतिनिधी :

पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी  शिवसेना खासदार  संजय राऊत  यांना न्यायालयाने चार ऑगस्टपर्यंत ईडीची कोठडी सुनावली आहे. पत्राचाळ घोटाळ्यात एक हजार कोटी रुपयांचा घोटाळा झाला होता असा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. रविवारी ईडीने राऊत यांच्या घरी धाड घालून साडे अकरा लाख रुपये रोख रक्कम जप्त केली होती. तसेच पत्राचाळ प्रकरणी अनेक कागदपत्रही ईडीने जप्त केली होती. आज ईडीने राऊत यांना कोर्टात सादर केले असता त्यांना चार ऑगस्टपर्यंत ईडीची कोठडी सुनावली आहे.

वकील अशोक मुंदरगी यांनी मांडली बाजू

कोर्टात संजय राऊत यांची वकील अशोक मुंदरगी यांनी बाजू मांडली. अशोक मुंदरगी म्हणाले की, संजय राऊत हे हार्ट पेशंट आहेत, २०१० आणि २०११ साली स्वप्ना पाटकर आणि वर्षा राऊत यांच्या नावावर जी जमीन विकत घेतली होती ते प्रकरण जुने आहे. आर्थिक गुन्हे शाखेने पत्राचाळ प्रकरणाचा प्रकरणाचा तपास सुरू केला होता अशी माहिती वकील मुंदरगी यांनी कोर्टात दिली. तसेच ईडीने राऊत यांचे मित्र प्रवीण राऊत यांच्या विरोधात जानेवारीत गुन्हा दाखल करून अटक केली होती. ही सर्व प्रकरणे जुने असून आताच ती का उकरून काढली जात आहे असा सवाल वकील मुंदरगी यांनी उपस्थित केला. संजय राऊत ईडीच्या चौकशीला सहकार्य करत नाही असा आरोप ईडीने केला आहे, त्यावर मुंदरगी म्हणाले की ईडीकडून जे प्रश्न उपस्थित केले जात आहे त्याची उत्तरे आम्हाला देता येत नाही याचा अर्थ असा नाही की संजय राऊत सहकार्य करत नाहीत.राजकीय असूयेपोटी राऊत यांच्यावर कारवाई केली जात आहे असेही मुंदरगी म्हणाले.

चार ऑगस्टपर्यंत कोठडी

दोन्ही बाजू ऐकल्यानंतर न्यायालयाने संजय राऊत यांना चार ऑगस्टपर्यंत ईडीची कोठडी सुनावली आहे. तसेच संजय राऊत ईडीच्या चौकशीला सहकार्य करत आहेत असे कोर्टाने म्हटले. संजय राऊत यांच्यावरील आरोप जरी गंभीर असले तरी आठ दिवसांची कोठडी सुनावता येणार नाही असेही कोर्टाने नमूद केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here