पाटणादेवी दर्शन सर्वसामान्यांसाठी बंद मात्र व्हीआयपींसाठी सुरु?

0
3

साईमत लाईव्ह चाळीसगाव प्रतिनिधी

गेल्या आठवड्यात पाटणादेवी मंदिराकडे नदीवरचा लोखंडी पूल काढण्यात आला होता नंतर वनविभागाने आदेश काढले होते की, मंदिर दर्शनाला काही दिवसासाठी बंद. त्या संदर्भातील वृत्त माध्यमांमध्ये  व  सोशेल मेडियावर सर्वत्र झडकले. मंदिर दर्शन सर्वांसाठी बंद असतांना रविवारी दर्शनासाठी व्हीआयपी गेस्ट यांना सोडण्यात आल्याचे वृत्त आहे.

सर्वसामान्य माणूस गेल्यावर मुख्य गेटवर असलेले वनरक्षक मोरे व फॉरेस्ट अधिकारी देसाई यांना जाऊ दिले.त्यांना आमचे प्रतिनिधी यांनी हटकले असता, गेटवरील वनरक्षक म्हणतात की, ते न्यायाधीश यांची मुले आहेत.आम्हाला आमदार, खासदार यांचे कॉल आले तर आम्ही दर्शनासाठी सोडू. मंदिर दर्शन सर्वच बंद असतांना सर्वसामान्य माणूस व व्हीआयपी माणूस दर्शनासाठी जाऊ न देता या महाशयांना व्हीआयपीचे कॉल आले तर गेटवरुन दर्शनासाठी जाऊ देता, असा दुजाभाव का, असा प्रश्‍न निर्माण होतो. या गेटवरुन जाण्यासाठी हे वनरक्षक किती पैसे आकारत आहे, याकडे जिल्हा वनपाल अधिकारी लक्ष देतील का व  वशिलाबाजी थांबणार का? आमदार- खासदार यांचे कॉल आलेतर सोडू,अशी अरेरावी भाषा वापरत असलेले अधिकारी व कर्मचारी यांचा बंदोबस्त होईल का, अशा वनरक्षकांवर कारवाई करावी व सर्वांना समान वागणूक द्यावी अशी  मागणी जनतेतून केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here