अण्णाभाऊ साठे म्हणजे शोषितांचा आक्रोश आपल्या शब्दातून मांडणारे थोर समाज सुधारक – आ.राजेश एकडे

0
3

साईमत लाईव्ह मलकापूर प्रतिनिधी

मलकापूर थोर समाजसुधारक, लोककवी, लेखक लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे. त्यानिमित्ताने मलकापूर येथे निघालेल्या भव्य रॅलीला संबोधित करतांना व अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन करतांना मलकापूर आमदार राजेश एकडे संबोधित करताना म्हणाले की अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या लेखणीतून शोषितांचा आक्रोश आपल्या शब्दातून मांडून समाज जागृती केली. म्हणतात की कडकडे डफावर थाप तू शोषितांचा मायबाप तू .हे मानवा तू गुलाम नाहीस तू या वास्तव जगाचा निर्माता आहेस असे असंख्य विचार त्यांनी समस्त भारतीयांना दिलेत. अण्णाभाऊ साठे म्हणतात की जग बदल घालुनी घाव सांगून गेले मज भीमराव… अशा या समाज सुधारक थोर पुरुषाला माझे विनम्र अभिवादन त्यावेळी उपस्थित राजुभाऊ पाटील, बंडू चौधरी, भगवान धांडे, निवृत्ती झाल्टे, ज्ञानेश्वर डांबरे, निवृत्ती तांबे व समाधान इंगळे आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here