साईमत लाईव्ह जळगांव प्रतिनिधी येथील अवघ्या १५ वर्षाच्या अल्पवयीन मुलीचा विवाह बीडच्या डोंबरी गावच्या तरुणाशी बळजबरीने लावून दिल्याची घटना उघडकीस आली आहे. मात्र, या मुलीने अतिशय धाडसाने या लग्नाला विरोध करण्याचा निर्णय घेतला. तिला सासरी घेऊन जाण्यासाठी आलेल्या सासऱ्याची नजर चुकवून तिने बसस्थानकातून पळ काढला आणि थेट अंबड पोलीस ठाणं गाठलं. यानंतर तिने आपली आपबिती पोलिसांना सांगितली. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीवरून, जळगाव येथील १५ वर्षीय मुलीच्या वडिलांचे दोन महिन्यांपूर्वी निधन झाले. वडिलांनी मृत्यूपूर्वी तिचा विवाह बीडच्या पाटोदा तालुक्यातील डोंबरी गावच्या एका तरुणाशी ठरवला होता. वडील गेल्यानंतर मुलगी अल्पवयीन असतानाही तिच्या आई आणि मामा यांनी त्या तरुणाशी विवाह लावून दिला. लग्नानंतर…
Author: Saimat
साईमत लाईव्ह मुंबई प्रतिनिधी : रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन येथील समुद्र किनाऱ्यावर हरिहरेश्वर येथे सापडलेली बोट ओमान सिक्युरिटीची असल्याची माहिती हाती आली आहे. आज दुपारी हरिहरेश्वर समुद्राच्या किनारी संशयित बोट आल्याने एकच खळबळ माजली. या बोटीत कुणीही व्यक्ती नसल्याने आणखीच भीती व्यक्त करण्यात आली. गंभीर बाब म्हणजे बोटीत काही शस्त्रास्त्रांचा साठादेखील सापडला. समुद्रामार्गे दहशतवादी हल्ल्याचा कट असल्याची शक्यता पाहता, रायगड जिल्ह्यात अलर्ट जारी करण्यात आला. आज विधानसभेचं पावसाळी अधिवेशन सुरु असल्याने अधिवेशनातदेखील हा मुद्दा उपस्थित करण्यात आला. या प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी तत्काळ एटीएसच्या चौकशीचे आदेश द्यावेत, तसेच सुरक्षा यंत्रणांना अलर्ट ठेवावे, अशी मागणी करण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीदेखील या प्रकरणी चौकशीचे आदेश…
साईमत लाईव्ह मुंबई प्रतिनिधी : विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. अधिवेशनाचा आज (१८ ऑगस्ट) दुसरा दिवस असून सत्ताधाऱ्यांना विविध प्रश्नांवरून धारेवर धरले जात आहे. विधानसभेच्या कामकाजादरम्यान जीएसटीसंदर्भातील विधेयकावर छगन भुजबळ यांनी भाष्य केले. समोर बसलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना उद्देशून “काळी दाढी आणि पांढरी दाढी” याचा उल्लेख करत त्यांनी एकनाथ शिंदे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर मिस्कील टिप्पणी केली. छगन भुजबळ यांनी जीवनावश्यक वस्तूंवर जीएसटी लावण्यावरून केंद्र सरकारच्या धोरणांवर आक्षेप घेतला. “आत्तापर्यंत अन्नधान्यसहित अनेक जीवनावश्यक वस्तू करमुक्त होत्या. पण नव्या निर्णयामुळे अनेक जीवनावश्यक वस्तूंवर ५ टक्के जीएसटी लागू होत असल्यामुळे सर्वसामान्य जनतेला याचा फटका बसणार आहे. कर वाढवल्यानंतर त्याचा फटका…
साईमत लाईव्ह जळगाव प्रतिनिधी विद्यावर्धिनी शिक्षण संस्थेने चालवलेले प्रगती प्राथमिक व माध्यमिक शाळेत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती, राष्ट्रीय प्रेम निर्माण व्हावे या उद्देशाने शाळेत वकृत्व व गीत गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. स्पर्धेत जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना संधी व सहभाग देण्यात आला. विद्यार्थ्यांनी उत्तम असे सादरीकरण केले. कार्यक्रमांच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या मुख्याध्यापिका मनीषा पाटील, प्रमुख पाहुणे अनिल वाघ स्पर्धेचे परीक्षक म्हणून प्रगती प्राथमिकचे उपशिक्षक मनोज भालेराव व बालवाडी विभागाच्या उपशिक्षिका वैशाली चौधरी यांनी काम पाहिले. “हर घर तिरंगा ” या कार्यक्रमांतर्गत इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी चैताली पाटील हस्ते संस्था सचिव सचिनदुनाखे यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन व सूत्रसंचालन सुवर्णा पाटील…
साईमत लाईव्ह मुंबई प्रतिनिधी : पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विधान परिषदेत खडाजंगी पाहायला मिळाली. अत्यंत शांत आणि संयमी स्वभावाच्या म्हणून ओळखल्या डॉ. नीलम गोऱ्हे या गुलाबराव पाटील यांच्यावर कमालीच्या संतापल्याचं यावेळी पाहायला मिळालं. पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी गुलाबराव पाटील यांनी झापलं. मंत्री तुम्ही तुमच्या घरी, अशा शब्दांत झापलंय. छातीवर हात ठेवून कसलं बोलता, सभागृहात बोलण्याची ही पद्धत नाही, असंही त्यांनी म्हटलंय. दरम्यान, यावेळी झालेल्या गदारोळात विरोधही पुन्हा वेलमध्ये उतरले होते. जोरदार गदारोळ यावेळी पाहायला मिळाला. सभागृहात नेमकं काय घडलं? उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे या गदारोळादरम्यान, संपातल्या होत्या. वारंवार विनंती करुनही आमदारांचा गदारोळ सुरुच होता.…
साईमत लाईव्ह मुंबई प्रतिनिधी : रायगड जिल्ह्यातील खळबळजनक माहिती समोर येते आहे. हरिहरेश्वर किनाऱ्यावर संशयास्पद बोट आढळून आलीय. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात रेड अलर्ट जारी करण्यात आला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. बोटीमध्ये शस्त्र सापडली असल्याचंही सांगण्यात येतंय. त्यामुळे पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. जिल्ह्यात चोख नाकाबंदी करण्यात आली असून पोलीस यंत्रणाही अलर्ट मोडवर आहे. प्रत्येकक वाहनाचीही कसून चौकशी तपास नाकाबंदी दरम्यान केला जातोय. शोथ पथकाद्वारे पुढील तपास केला जातोय.
साईमत लाईव्ह मुंबई प्रतिनिधी : गेल्या बारा वर्षांपासून मुंबई -गोवा महामार्ग रखडला आहे. हा महामार्ग केव्हा पूर्ण होणार यासंदर्भात कोकणातील आमदारांनी मंत्री रवीद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांना विविध प्रश्न केले. या मुद्दयांवर शिवसेनेचे (Shivsena)नेते भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) बोलत असताना नितेश राणे (Nitesh Rane) यांनी त्यांना टोला लगावत अडीच वर्षे वाया गेली असे म्हटले. यावर जाधव यांनी संताप व्यक्त करत राणे यांचा चांगलेच सुनावले. आमदार सुनिल प्रभू यांनी मुंबई गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामावर लक्षवेधी मांडली होती. याला उत्तर देतांना चव्हाण म्हणाले डिसेंबर २०२३ पर्यंत हे काम पूर्ण करण्यात येईल. तसेच या कामात भुसंपादन, भौगोलीक स्थिती, माती ढासळणे, न्यायालयीन वाद आदी…
साईमत लाईव्ह यवतमाळ प्रतिनिधी : तब्बल ४० आमदारांनी शिवसेनेची साथ सोडून शिंदे गटात सामील होण्याचा निर्णय घेतल्यानंतर शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यासमोर आता पक्ष संघटना मजबूत करण्याचे मोठे आव्हान आहे. मात्र आता त्यांनी विदर्भाकडेही लक्ष केंद्रित केले आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा प्रचाराचा नारळ शिंदे गटात (Shinde Group)सामील झालेले मंत्री संजय राठोड (Sanjay Rathore)त्यांच्या बालेकिल्ल्यातून फोडण्याचा निर्णय घेतला आहे. उद्धव ठाकरे बंजारा समाजाची काशी असलेल्या पोहरादेवी (ता. मानोरा, जि. वाशीम) दौऱ्यावर लवकरच जाणार आहेत. उद्धव ठाकरे यांनी पोहरादेवी (Pohradevi) येथे भेट द्यावी, यासाठी मुंबईतील बांधकाम व्यावसायिक व मूळचे यवतमाळ जिल्ह्यातील पुसद येथील राजू नाईक यांनी पुढाकार…
साईमत लाईव्ह जळगाव प्रतिनिधी जीवनाला आधार देणाऱ्या वडिलांचे मध्यरात्री अकस्मात निधन झाले असतांना शिक्षणाचा ध्यास घेतलेल्या एकुलत्या एक कन्येने आज सीईटीचा शेवटचा पेपर देऊन जे धाडस दाखविले त्याबद्दल तिचे कुसुंबे गावात कौतुक होत आहे. तालुक्यातील कुसुंबे खुर्द गावात राहणारे रितेश रमेश विसपुते यांचे मध्यरात्री अकस्मात निधन झाले.या घटनेने विसपुते परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळेला. अशा प्रसंगातही त्यांची एकलुती एक कन्या वैष्णवी विसपुते हिने मोठ्या धीराने आज सकाळी सीईटीचा शेवटचा पेपर देण्याचे धाडस दाखवून जिद्द व शिक्षणाचा ध्यास पूर्ण केला. त्यामुळे कुंसुंबे गावात तिचे कौतुक होत आहे. जीवनाला आधार देणाऱ्या जन्मदात्या वडिलांचे पार्थिव घरात असतांनाही व पितृछत्र हरपल्याचे दुःख झाले असतांनाही शिक्षण…