मंत्री तुम्ही तुमच्या घरी’ डॉ. नीलम गोऱ्हेंनी गुलाबराब पाटील यांना झापलं

0
3

साईमत लाईव्ह मुंबई प्रतिनिधी :

पावसाळी अधिवेशनाच्या  दुसऱ्या दिवशी विधान परिषदेत खडाजंगी पाहायला मिळाली. अत्यंत शांत आणि संयमी स्वभावाच्या म्हणून ओळखल्या डॉ. नीलम गोऱ्हे या गुलाबराव पाटील यांच्यावर कमालीच्या संतापल्याचं यावेळी पाहायला मिळालं. पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी गुलाबराव पाटील यांनी झापलं. मंत्री तुम्ही तुमच्या घरी, अशा शब्दांत झापलंय. छातीवर हात ठेवून कसलं बोलता, सभागृहात बोलण्याची ही पद्धत नाही, असंही त्यांनी म्हटलंय. दरम्यान, यावेळी झालेल्या गदारोळात विरोधही पुन्हा वेलमध्ये उतरले होते. जोरदार गदारोळ यावेळी पाहायला मिळाला.

सभागृहात नेमकं काय घडलं?

उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे या गदारोळादरम्यान, संपातल्या होत्या. वारंवार विनंती करुनही आमदारांचा गदारोळ सुरुच होता. यावेळी झालेलं संभाषण नेमकं काय होतं, ते जाणून घ्या…

डॉ. नीलम गोऱ्हे: गुलाबराव पाटील मी तुम्हाला वारंवार विनंती केली, ताकीद दिली, खाली बसा आधी ताबडतोब. ही कुठली पद्धत आहे सभागृहात वागायची. संसदीय कार्यमंत्री आपण यांना समज देऊ शकत नाही? परत परत सभापती सांगतायत, ही कुठली पद्धत आहे? चौकात आहात का तुम्ही?

गुलाबराव पाटील – मी मंत्री आहे!

डॉ. नीलम गोऱ्हे – मंत्री काय? मंत्री तुम्ही घरी, आधी खाली बस. हे सभागृह आहे. दरेकरजी काय चाललंय? अहो शांत राहा…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here