साईमत लाईव्ह जळगाव प्रतिनिधी
विद्यावर्धिनी शिक्षण संस्थेने चालवलेले प्रगती प्राथमिक व माध्यमिक शाळेत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती, राष्ट्रीय प्रेम निर्माण व्हावे या उद्देशाने शाळेत वकृत्व व गीत गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. स्पर्धेत जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना संधी व सहभाग देण्यात आला. विद्यार्थ्यांनी उत्तम असे सादरीकरण केले.
कार्यक्रमांच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या मुख्याध्यापिका मनीषा पाटील, प्रमुख पाहुणे अनिल वाघ स्पर्धेचे परीक्षक म्हणून प्रगती प्राथमिकचे उपशिक्षक मनोज भालेराव व बालवाडी विभागाच्या उपशिक्षिका वैशाली चौधरी यांनी काम पाहिले.
“हर घर तिरंगा ” या कार्यक्रमांतर्गत इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी चैताली पाटील हस्ते संस्था सचिव सचिनदुनाखे यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन व सूत्रसंचालन सुवर्णा पाटील भाग्यश्री तळले यांनी केले याप्रसंगी दीपक बारी, सुभाष शिरसाठ हर्षदा पाटील रुबीना तडवी यांनी कार्यक्रमास सहकार्य केले संस्थेचे विश्वस्त पी.बी ओसवाल, संस्था अध्यक्ष मंगला दुनाखे संस्था सचिव सचिन दुनाखे यांनी कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या.