एकुलत्या एक कन्येने आधार गेला तरीही शिक्षणाचा ध्यास पूर्ण केला

0
3

साईमत लाईव्ह जळगाव प्रतिनिधी 
जीवनाला आधार  देणाऱ्या वडिलांचे  मध्यरात्री अकस्मात  निधन झाले असतांना शिक्षणाचा ध्यास घेतलेल्या एकुलत्या  एक कन्येने आज सीईटीचा शेवटचा पेपर देऊन जे धाडस दाखविले त्याबद्दल तिचे कुसुंबे गावात कौतुक होत आहे.
तालुक्यातील कुसुंबे खुर्द गावात राहणारे रितेश रमेश विसपुते यांचे मध्यरात्री अकस्मात निधन झाले.या घटनेने विसपुते परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळेला. अशा प्रसंगातही त्यांची एकलुती एक कन्या वैष्णवी विसपुते हिने मोठ्या धीराने आज सकाळी सीईटीचा शेवटचा पेपर देण्याचे धाडस दाखवून जिद्द व शिक्षणाचा ध्यास  पूर्ण  केला. त्यामुळे कुंसुंबे गावात तिचे कौतुक होत आहे.

जीवनाला आधार देणाऱ्या जन्मदात्या वडिलांचे पार्थिव घरात असतांनाही व पितृछत्र हरपल्याचे दुःख झाले असतांनाही शिक्षण हा  सुध्दा जीवनाचा सर्वात मोठा आधारच आहे हे वैष्णवीने सर्व समाजासमोर दाखवून दिले.सकाळी 11.30 वाजता पेपर दिल्यानंतर कुसुंबे गावात तिने वडिलांच्या पार्थिवाला अग्निडाग दिला तेंव्हा ग्रामस्थांना अश्रू अनावर झाले तसेच तिच्या धाडसाचेही सर्वांनी कौतुकही केले. वैष्णवीने समाजासमोर एक आदर्श निर्माण  केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here