साईमत लाईव्ह जळगाव प्रतिनिधी : शिवसेना युवा प्रमुख आदित्य ठाकरे आज (२० ऑगस्ट) जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर असणार आहेत. त्यांचा हा दौरा सुरू होण्यापूर्वीच जळगावात शिंदे-ठाकरे गट व समर्थक आमने-सामने आले आहेत. अशातच मध्यरात्री धरणगावात प्रवेश मार्गावरील आदित्य ठाकरे यांचे स्वागताचे बॅनर अज्ञात व्यक्तींनी फाडल्याची घटना समोर आली आहे. यामुळे गावात आता तणावाचे वातावरण निर्माण झालले आहे. माहितीनुसार, सहा ते सात ठिकाणी आदित्य ठाकरेंचे स्वागताचे बॅनर फाडण्यात आले. द्वेष भावनेतून हे काम करण्यात आले असा संशय शिवसैनिकांनी व्यक्त केला आहे. या घटनेनंतर शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी रोष व्यक्त केला आहे. आदित्य यांची ‘शिवसंवाद यात्रा’ आज जळगाव जिल्ह्यात येत आहे. या यात्रेचा दौरा…
Author: Saimat
साईमत लाईव्ह सोयगाव तालुका प्रतिनिधी (विजय चौधरी) येथील शासकीय कार्यालय दररोज उघडले जाते… बंदही केले जाते… या कार्यालयामार्फत तालुक्यात कोटींच्या घरात खर्च असलेली कामेही कागदावर दिसताहेत; मात्र अनेक महिन्यांपासून बहुतांश कार्यलयातील अधिकारी केवळ आठवड्यातुन एकच दिवस हजेरी लावतात. त्यामुळे कोणत्याच नियंत्रणाविना चालणाऱ्या यंत्रणाला येथे आठवडी ‘कार्यालय” म्हटले जाते. सोयगाव शहरात एकूण २३ विविध यंत्रणांचे शासकीय कार्यालये आहेत. यामध्ये, तहसील कार्यलय, पोलीस ठाणे, पंचायत समिती, नगर पंचायत, लागवड अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, पशुसंवर्धन चिकित्सालय, ग्रामीण रुग्णालय, बांधकाम उपविभाग(फरदापुर), एकात्मिक बालविकास प्रकल्पाधिकारी, वन परिक्षेत्र अधिकारी, जिल्हा परिषद सिंचन, जिल्हा परिषद बांधकाम, उपअधीक्षक भूमी अभिलेख,दुय्यम निबंधक, लघु पाटबंधारे स्थानिक स्तर, महावितरण कंपनी क्र.…
साईमत लाईव्ह प्रतिनिधी ठाणे Thane News : अपघातात ट्रकचालक/मालक दिनेश सोलकर (४०) हे अपघातग्रस्त ट्रकमध्येच अडकले होते. त्यांच्या नाकाला, चेहऱ्याला व पायांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. ठाणे – ठाण्याकडून भिवंडी, पडघा येथे जात असताना समोर तांत्रिक बिघाड झाल्यामुळे उभ्या असलेल्या कंटेनरला ट्रकने जोरदार मागून धडक दिल्याची घटना शुक्रवारी रात्री ११ वाजून ४७ मिनिटांच्या सुमारास कॅडबरी कंपनीजवळ घडली. या अपघातात ट्रकचालक/मालक दिनेश सोलकर (४०) हे अपघातग्रस्त ट्रकमध्येच अडकले होते. त्यांच्या नाकाला, चेहऱ्याला व पायांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तसेच अपघातग्रस्त ट्रक रस्त्याच्या एका बाजूला करून रस्ता मोकळा केल्याचे आपत्ती व्यवस्थापन कक्षेने सांगितले. ट्रक…
साईमत लाईव्ह मुंबई प्रतिनिधी रज्यात सर्वत्र मोठ्या उत्साहात जन्माष्टमीच्या उत्सव साजरा होत आहे. तरुणाईसह राज्य सरकारही मोठ्या दणक्यात दहीहंडी साजरी करताना दिसून येत आहेत. विविध राजकिय नेत्यानी मुंबईतील वेगवेगळ्या भागात राजकीय नेत्यांनी उपस्थिती लावत दहीहंडीच्या कार्यक्रमात भाग घेतला आहे. भाजप नेते करीट सोमय्या यांनीही दहीहंडी उत्सवात आपला सहभाग नोंदवला आहे . यावेळी त्यांनी या जोशात ताशा , ढोल वाजवाण्याचा आनंद घेतला. एवढ्यावरच नाना थांबता त किरीट सोमय्या यांनी डान्सही केला. त्याच्याडान्सचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
साईमत लाईव्ह मुंबई प्रतिनिधी राजधानी मुंबईमध्ये राजकीय नेत्यांनी मोठ्या दहीहंडी उत्सवाचे आयोजन केले. भाजपा नेते प्रकाश सुर्वे यांनीसुद्धा मागाठाणे येथे दहीहंडी उत्सवाचे आयोजन केले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हेसुद्धा तिथे उपस्थित होते. अनेक गोविंदा पथकांनी या उत्सवामध्ये भाग घेतला. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी भाषण करून गोविंदांचा उत्साह वाढवण्याचा प्रयत्न केला. “गोविंदा खेळाडू असून खेळाडूंना दिल्या जाणाऱ्या सर्व सुविधा आता गोविंदांना दिल्या जातील. तसेच सर्व सुविधा मिळाल्यामुळे गोविंदांना आता कसे वाटते? मोकळे-मोकळे वाटते, छा-छान वाटते, असे मिश्किल भाष्यदेखील केले. यावेळी फडणवीस यांच्यासोबत भाजपाचे इतर नेतेदेखील उपस्थित होते. दरम्यान, दहीहंडी उत्सवादरम्यान मुंबईत शिवसेना (Shiv Sena) विरुद्ध भाजपा (BJP) असा सामना पाहायला मिळत आहे.…
साईमत लाईव्ह मुक्ताईनगर प्रतिनिधी 15 ऑगष्ट स्वातंत्र्यदिनाच्या अमृतमहोत्सवाचं औचित्य साधत राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवा नेत्या तथा जळगांव जिल्हा बँकेच्या संचालिका डॉ. रोहिणीताई खडसे – खेवलकर यांनी जनसंवाद यात्रा सुरू केली. र16 ऑगस्ट रोजी या जनसंवाद यात्रेचा दुसरा दिवस होता. मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघातील 182 गावांमध्ये ही यात्रा पोहचणार आहे. स्वातंत्र्यदिनी बोदवड तालुक्यातील राऊतझिरा येथून जनसंवाद यात्रेचा शुभारंभ झाला. मुसळधार पावसातही कार्यकर्ते आणि गावकऱ्यांचा उत्साह तसूभरही कमी झालेला दिसला नाही. ह्या जनसंवाद यात्रेचे जो तो ज्याच्या त्याच्या परीने विश्लेषण करेल; परंतु कुठल्याही प्रकारच्या निवडणुका समोर किंवा जवळ नसतांना लोकांच्या समस्या जाणून घेऊन त्याच्या निराकरणासाठी निघालेली ही एकमेव यात्रा असावी. त्यामुळे स्वार्थासाठी ही यात्रा…
साईमत लाईव्ह जळगाव प्रतिनिधी युवाशक्ती फाऊंडेशनतर्फे आज 19 ऑगस्ट रोजी काव्यरत्नावली चौक येथे सायंकाळी 6 वाजेपासून तरूणींची दहीहंडी आयोजित करण्यात आली आहे. सदर आयोजनाचे हे 14 वे वर्ष असून यावर्षी मोठ्या प्रमाणात आयोजनाची तयारी करण्यात आली आहे. डॉ.अण्णासाहेब जी. डी. बेंडाळे महिला महाविद्यालयाचे मुलींचे गोविंदा पथक, शिवतांडव प्रतिष्ठानचे 130 वादकांचे ढोल पथक, हायटेक लाईटस, बालगोपालांसाठी श्रीकृष्ण वेषभूषा स्पर्धा, मल्लखांबचे थरारक प्रात्यक्षिक, सांस्कृतिक नृत्य आदी. या दहीहंडी महोत्सवाचे मुख्य आकर्षण आहे. जळगाव जिल्ह्यात सार्वजनिक रित्या युवाशक्ती फाऊंडेशनतर्फे एकमेव तरूणींच्या गोविंदा पथकाची दहीहंडी आयोजित करण्यात येते. दहीहंडी सारख्या उत्सवात महिलांना मुख्य प्रवाहात आणून उत्सवाचा आनंद द्विगुणीत करणे हे या आयोजनामागील युवाशक्ती फाऊंडेशचा…
साईमत लाईव्ह मुंबई प्रतिनिधी : राज्यभरात सर्वत्र दही हंडीचा उत्सव साजरा करण्यात येत आहे. यापार्श्वभूमीवर शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. दही हंडीचा उत्सवाला राजकीय रंग देण्याची गरज नाही. वरळीतील जांबोरी मैदानावरूनही शिवसेना आणि भाजपमध्ये वाद पेटला आहे. यावरही आदित्य यांनी भाष्य केले. दही हंडीसाठी जांबोरी मैदान मिळावं यासाठी आम्ही कोणतेही प्रयत्न केले नाही. आज आनंदाचा दिवस आहे. सर्वांनी तो उत्साहत साजरा करावा असेही ठाकरे म्हणाले. दोन वर्षापूर्वीच अडीच कोटी रुपये खर्चून आम्ही जांबोरी मैदान चांगले केले आहे. माझी सर्वांना एवढीच विनंती आहे की, प्रत्येक गोष्टीत राजकारण आणू नका. हा बालिशपणा असल्याचा टोला आदित्य ठाकरे यांनी विरोधकांना…
साईमत लाईव्ह पाचोरा प्रतिनिधी माजी मंत्री शिवसेना युवा प्रमुख यांच्या जिल्हा शिव संवाद दौऱ्याची पाचोरा नगरीतून सुरुवात करण्यात येणार आहे. शिवसेनेचे माजी आमदार स्व. आर. ओ. पाटील यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्या पासून मतदार संघाच्या राजकारणात सक्रिय झालेल्या आर.ओ. पाटील यांच्या कन्या दिली. यावेळी विधानसभा क्षेत्र जेष्ठ शिवसैनिक शेतकरी सेना तालुकाप्रमुख, रमेश बाफना, उपजिल्हा प्रमुख ॲड.अभय पाटील, शेतकरी सेना जिल्हाप्रमुख अरुण पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य उध्दव मराठे, आजी तालुकाप्रमुख शरद पाटील, नरेंद्रसिंग सुर्यवंशी, नाना वाघ, सह शिवसैनिक उपस्थित होते. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचा 20 ऑगस्ट मंगळवार रोजी जळगांव जिल्ह्याच्या शिव संवाद दौऱ्याची सुरुवात पाचोरा येथून…
साईमत लाईव्ह बुलढाणा प्रतिनिधी : गेल्या अडीच वर्षांपासून आरोग्य यंत्रणा कोरोनाशी लढत आहे. आता राज्यात स्क्रब टायफस या दुर्मिळ आणि जीवघेण्या आजाराने शिरकाव केलाय. त्यामुळं आरोग्य विभाग हाय अलर्ट मोडवर आल्याचं दिसून येत आहे. स्क्रब टायफस राज्यासाठी अत्यंत दुर्मिळ असा आजार आहे. या आजाराचे रुग्ण अफगाणिस्तान, पाकिस्तान, जपान, इंडोनेशिया आणि रशिया या देशातच आढळतात. आपल्या देशात या आजाराचे वर्षभरातून एक दोन रुग्ण हिमाचल प्रदेशात आढळले. केरळमध्ये जून महिन्यात स्क्रब टायफसनं एका 15 वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू झाला. आता एक दोन नव्हे तर तब्बल नऊ रुग्ण बुलडाणा जिल्ह्यात आढळल्याने एकच खळबळ उडालीय. एकट्या खामगावात स्क्रब टायफसचे 7 रुग्ण आढळले. त्यामुळं आरोग्य यंत्रणा अलर्ट…