साईमत लाईव्ह यावल प्रतिनिधी यावल तालुक्यातील चितोडा येथील तरुणाच्या हत्येमुळे उडालेली मोठी खळबळ शांत होत नाही तोच पुन्हा एकदा यावल शहरासह तालुका खुनाने हादरल्याची घटना आज शनिवार दिनांक 27 रोजी संध्याकाळी सात वाजेच्या सुमारास यावल शहरात मध्यवस्तीत काजीपुरा, महाजन गल्ली,सुतार गल्ली, परिसरात घडली. 8 दिवसांपूर्वीच तालुक्यातील चितोडा येथील तरूणाचा खून झाला.या प्रकरणी एका महिलेसह तीन जणांना अटक करण्यात आली असून ते पोलीस कोठडीत आहेत.आणि पुढील तपास सुरू आहे यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती.. यानंतर आज पुन्हा एकदा यावल शहरात महाजन गल्ली आणि काजीपुरा मुख्य रस्त्यावर खुन झाल्याने समाजमन सुन्न झाले आहे. या संदर्भातील प्राथमिक माहितीनुसार,शहरातील परिसरात आज सायंकाळी उशीरा…
Author: Saimat
साईमत लाईव्ह कजगाव ता.भडगाव प्रतीनिधी कजगाव ता.भडगाव येथे कुवारी पंगतीची प्रथा ज्या महानुभाव ने घालुन दिली त्या भाईकनशा फकीर बाबाचा उरूस कार्यक्रम तसेच यात्रा,कुस्त्यांची दंगल,तमाशा आदि कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे दि.२६ रोजी मुस्लीम पंच कमेटी जामा मज्जीद यांचे वतीने सम्पूर्ण गावातुन संदल मिरवणुक काढण्यात येऊन बाबाच्या दर्ग्यावर हिन्दु मुस्लीम बांधवांनी चादर चढवत एकतेचे दर्शन येथे घडले. दिल अमीर का वतन फकीर का दे उसका भी भला ना दे उसका भी भला असे म्हणत जगाचे हित सांगणाऱ्या भाईकनशा फकीर बाबा ने अंदाजे २५० वर्षा पूर्वी कुवारी पंगतीची प्रथा घालून दिली होती. ती प्रथा आजही कजगावकर मोठ्या श्रद्धेने चालवितात पुढे भाईकनशा…
साईमत लाईव्ह सोयगाव तालुका प्रतिनिधी हिंद मराठा महासंघ राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष सदानंदराव भोसले राष्ट्रीय अध्यक्ष उज्वलसिंह राजे गायकवाड राष्ट्रीय सरचिटणीस उद्योजक विजयराव कदम यांच्या सूचनेनुसार उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष पदी सोपान पुंडलिक गव्हांडे पाटील यांची निवड महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष गजाननराव साळुंखे यांनी ही निवड जाहीर केली. या वेळी बोलताना समाज नेते उद्योजक हिंद मराठा महासंघ प्रदेश कार्याध्यक्ष गजाननराव साळुंखे यांनी सांगितले कोरोना महामारी काळात रुग्णांसाठी ४ रुग्णवाहिका त्यांनी मोफत चालवल्या मराठा प्रतिष्ठान या संस्थेचे अध्यक्ष पदी नियुक्ती २०१२ साली त्यांनी समाजाला उपयुक्त काम केले आहे मोफत वह्या वाटप पाण्याचे तालुक्यात हौद बांधले असून पाणी टंचाई मुक्त आपले गाव केले कोरोणा योद्धा…
साईमत लाईव्ह पाळधी प्रतिनिधी पाळधी तालुका धरणगाव येथिल महामार्गावर असलेल्या एस पी वाईन शॉप मधून चोरट्यांनी चार लाख रुपयाची दारू तर चार लाख रुपये रोख असा एकूण आठ लाखावर रकमेवर डल्ला मारल्याने एकच खळबळ उडाली आहे. येथिल महामार्ग लगत एस पी वाईन शॉप नावाचे दुकान असून ते जळगांव येथिल राजकुमार शितलदास मोटवानी यांचे आहे.सदर दुकानाचा वरील भागात व्हेंटिलेशन साठी एक पंखा असून चोरट्यांनी तेथे चढून वरील व्हेंटिलेशन चा पंखा वाकवून आत प्रवेश केला. तेथून त्यांनी वेगवेगळ्या कंपनीची एकूण तीन लाख एकतीस हजार सातशे सत्तर रुपयाची दारू तर चार लाख अठरा हजार रुपये रोख असा ऐवज लांबवून पोबारा केला. या वेळी…
साईमत लाईव्ह कजगाव ता भडगाव प्रतिनिधी कजगाव ता भडगाव येथे गावाच्या उरूस निमित्ताने भव्य कुस्त्यांच्या दंगलीचे आयोजन करण्यात आले, तितुर नदीच्याकाठी साला बादाप्रमाणे दरवर्षी कुस्त्यांच्या दंगलीचे आयोजन लोक सहभागातून केले जाते. यावेळी भडगाव पाचोरा चाळीसगाव व अनेक तालुक्यातील मल्ल कुस्त्या खेडण्यासाठी येतात, यावेळी विविध मल्लांनी डाव पेज वापरून चित्तथरारक कुस्त्या केल्या तर विविध मल्लानी कुस्त्यांचे विविध डावपेजने कुस्ती शौकिनांची मने जिंकली यावेळी बघ्यांची गर्दीत शेकडोंच्या संख्येने पहायला मिळाली यावेळी आखाडा पूजन जि प चे माजी शिक्षण सभापती एकनाथ महाजन सरपंचपती दिनेश पाटील जय बजरंग व्यामशाळेचे अध्यक्ष पोपट महाजन व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी सरपंच निवृत्ती पवार मंगलसिंग पाटील…
साईमत लाईव्ह सोयगाव तालुका प्रतिनिधी तालुक्यात सर्वत्र बैलपोळा हा सण उत्साहात साजरा करण्यात आला गावच्या वेशीतुन बैलांना काढून बैलांचा पोळा फुटला या वेळी शेतकरी बांधवामध्ये उत्साही वातावरण होते यावेळी सोयगाव पोलीस हद्दीतील गावांमध्ये पोलीस सहायक निरीक्षक अनमोल केदार यांच्या मार्गदर्शनाखाली कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता यावेळी गावातील सरपंच, उपसरपंच,सदस्य पोलीस पाटील यांच्या सहकार्याने सर्वत्र शांततेत पोळा हा सण पार पडला. शेतकऱ्यांच्या कष्टात व दुःखात खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या सर्ज्याचा दिवस म्हणजे पोळा. आपल्या कष्टाच्या जोरावर जगाला दोन घास खाऊ घालणारा जिद्दी शेतकरी व त्याला तेवढ्याचं ताकदीने साथ देणाऱ्या बैलांबद्दल कृतज्ञता व्यक्त करतांना सोयगाव तालुक्यातील शेतकरी बांधव भारावून गेले होते…
साईमत लाईव्ह सोयगाव तालुका प्रतिनिधी फुलंब्री येथील सहा वर्षीय मुलाचे ओळखीच्याच व्यक्तीने बुधवार रोजी संध्याकाळी फुलंब्री येथील कथार गल्ली येथील राहत्या घरून अपहरण केले होते . बुधवार संध्याकाळी पाच वाजेपासून पासून मुलगा घरातून गायब असल्याने मुलाचे आई वडील त्यांचे नातेवाईक व मित्र परिवार सर्वच चिंतेत होते गुरुवारी दुपारी तो सुखरूप असल्याची बातमी मिळाली आणि सगळ्यांचा जीव भांड्यात पडला. याबाबत सविस्तर माहिती अशी की फुलंब्री येथील हेमंत चंद्रकांत काथार यांचा मुलगा सार्थक काथार हा दुपारी आपल्या बहिणीसोबत शाळेतून घरी आला सार्थक याचे वडील हे सकाळी कामावर गेले होते तर आई काही कामानिमित्त संभाजीनगर येथे गेली होती.. संध्याकाळी चार च्या सुमारास हेमंत…
साईमत लाईव्ह सोयगाव तालुका प्रतिनिधी सोयगांव दि २६(प्रतिनिधी )राज्य परिवहन मंडळाच्या सोयगांव आगारात ४० बसेस चालवीण्यासाठी ७६ चालक आहे परंतु चालक मात्र २९ आहे. त्यामुळे आगाराला उत्पन्न आणि प्रवाशांना सेवा देणाऱ्या महत्वाच्या बसफेऱ्या वाहका आभावी बंद कराव्या लागल्याचे समोर आले असून प्रशिक्षण देऊन चालकांनाच वाहक करण्याचा प्रस्ताव आगाराने दिला आहे. सोयगांव एस टी आगाराच्या सोयगांव ते अकोला व सोयगांव ते पिशोर या बसफेऱ्या चांगले उत्पन्न मिळवून देणाऱ्या आहे.परंतु सध्या या बसफेऱ्या बंद आहे. पिशोर मुक्कामी जाणारी बस आगार स्थापने पासून आहे. परंतु ती बंद असल्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. सोयगांव अकोला ही बुलढाणा, शेगाव जाणाऱ्या प्रवाशांसाठी अंत्यत सोयीची बस बंद…
साईमत लाईव्ह मुंबई प्रतिनिधी आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी अटकेत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची प्रकृती बिघडली आहे. एबीपी माझाच्या वृत्तानुसार, अनिल देशमुख आर्थर रोड जेलमध्ये चक्कर येऊन पडले. यानंतर त्यांची डॉक्टरांनी वैद्यकीय तपासणी केली. छातीमध्ये दुखत असल्याची तक्रार असल्याने त्यांना जे जे रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अनिल देशमुख सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यांना आर्थर रोड जेलमध्ये ठेवण्यात आलं आहे. सकाळी ११ वाजता ते अचानक चक्कर येऊन खाली पडले. यानंतर तेथील डॉक्टरांनी त्यांची वैद्यकीय तपासणी केली. नंतर जे जे रुग्णालयात नेऊन त्यांची वैद्यकीय चाचणी करण्यात आली. दोन दिवस त्यांना रुग्णालयातच ठेवण्यात येणार आहे. त्यांच्यावर सध्या उपचार…