साईमत लाईव्ह कजगाव ता भडगाव प्रतिनिधी
कजगाव ता भडगाव येथे गावाच्या उरूस निमित्ताने भव्य कुस्त्यांच्या दंगलीचे आयोजन करण्यात आले, तितुर नदीच्याकाठी साला बादाप्रमाणे दरवर्षी कुस्त्यांच्या दंगलीचे आयोजन लोक सहभागातून केले जाते. यावेळी भडगाव पाचोरा चाळीसगाव व अनेक तालुक्यातील मल्ल कुस्त्या खेडण्यासाठी येतात, यावेळी विविध मल्लांनी डाव पेज वापरून चित्तथरारक कुस्त्या केल्या तर विविध मल्लानी कुस्त्यांचे विविध डावपेजने कुस्ती शौकिनांची मने जिंकली यावेळी बघ्यांची गर्दीत शेकडोंच्या संख्येने पहायला मिळाली यावेळी आखाडा पूजन जि प चे माजी शिक्षण सभापती एकनाथ महाजन सरपंचपती दिनेश पाटील जय बजरंग व्यामशाळेचे अध्यक्ष पोपट महाजन व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी माजी सरपंच निवृत्ती पवार मंगलसिंग पाटील बाळासाहेब राजपूत हिलाल चौधरी दिनकरराव पाटील गोटू वस्ताद किशोर महाजन पोपट सोनवणे नाना पहेलवान सुनील पाटील योगेश पाटील शिवा पहेलवान अर्जुन मालचे पंढरीनाथ बोरसे अण्णा पहेलवान संभाजी पवार वाल्मिक बोरसे दादाभाऊ पाटील बिहारी कोळगावकर आदी उपस्थित होते तर भडगाव पोलीस स्टेशनच्या वतीने सहाय्यक फौजदार छबुलाल नागरे हवालदार जिजाबराव पवार पोलीस कॉन्स्टेबल प्रकाश गवळी व अनेक होमगार्ड व ग्रामपंचायत कर्मचारी यांनी चोख बंदोबस्त ठेवला यावेळी विविध ठिकाणची नावाजलेले मल्ल व असंख्य ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.