Author: Saimat

साईमत लाईव्ह कजगाव ता भडगाव कजगाव कजगाव ता भडगाव कजगाव परिसरात पावसाने मारलेल्या दांडीने दुष्काळ परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला आहे, त्यामुळे कजगाव परिसराला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी भोरटेक ग्रामस्थांकडून जिल्हाधिकाऱ्यांना करण्यात आली आहे. ह्या आशयाचे निवेदन भडगाव तहसीलदार मुकेश हिवाळे यांना देण्यात आले तर जिल्हाधिकारी व प्रांत अधिकारी यांना देखील सदरील निवेदन पाठवण्यात आले आहे. भोरटेक ग्रामस्थांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की पावसाळा सुरू होऊन दोन महिने उलटले तरी अजूनही बळीराजा जोरदार पावसाच्या प्रतीक्षेत आहे. भोरटेक व कजगाव परिसरात पावसाने दांडी मारल्याने शेतकरी मेटाकुटीला आला आहे ,ह्या भागातील शेतकरी पावसाअभावी हवालदिल झाला असून शेतात…

Read More

साईमत लाईव्ह कजगाव ता भडगाव प्रतिनिधी  असे म्हणतात की सात जन्माच्या रेशीमगाठी ह्या स्वर्गातच बांधल्या जातात आणि आता पर्यंत त्यालाचा मानले जात मात्र जर सात जन्माच्या रेशीम गाठी जर भुतालावरही बांधल्या गेल्यातर कठीणकाळ अवेळी वैधव्य व दोघा जीवांचा मनाचा मोठेपणा असेलतर हे शक्यच आहे हो तसेच काहींसे कजगाव येथे झाले आहे. आणि ह्या रेशिंमगाठीचे सर्वांनीच कौतुक केले आहे कजगाव येथील नामदेव रामदास सोनार यांचा एक वर्षांपूर्वी अकस्मित मृत्यू झाला होता मृत्यूनंतर त्यांच्या पश्चात पत्नी व दोन मुली आई तीन भाऊ होते मात्र मुलींचे आपल्या डोक्यावरील पितृछत्र हरपल्याने त्या पोरक्या झाल्या तर पत्नी वनिता यांचा पती म्हणून भक्कम आधार गेल्याने त्या…

Read More

साईमत लाईव्ह सोयगाव प्रतिनिधी येथून जवळच असलेल्या फुलंब्री येथील ६ वर्षीय मुलास २४ ऑगस्ट रोजी सायंकाळी पळवुन नेल्याची तक्रार फुलंब्री  पोलीस स्थानकात दाखल करण्यात आली आहे. मिळालेल्या माहिती नुसार वृत्त असे की, फुलंब्री येथील सार्थक हेमंत काथार ( वय ६ वर्ष ) या मुलास संशयीत आरोपी दिनेश अरुण कुलकर्णी ( वय 25 वर्ष) याने त्याचेकडील नॅनो कार क्रमांक-MH 40 KR 5950 चा वापर करुन  मुलाला फूस लावून पळवुन घेऊन गेला आहे. असे पोलीसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. दरम्यान , अपहरण झालेला  सार्थक हेमंत काथारने  हिरवा शर्ट आणि निळी जिन्स परिधान केलेले आहे. तर संशयीत आरोपी दिनेश अरुण कुलकर्णी हा रंगाने…

Read More

साईमत लाईव्ह पाळधी ता धरणगाव प्रतिनिधी भाऊसाहेब गुलाबरावजी पाटील इंग्लिश मीडियम स्कूल या ठिकाणी बळीराजाचं वैभव असणाऱ्या बैलांचा पोळा हा सण उत्साहात साजरा करण्यात आला. शेतामध्ये वर्षभर राबराब राबणाऱ्या शेतकऱ्याचा परममित्र म्हणजे त्याचा लाडका बैल, आणि या नंदीबैलाचा अनोखा सोहळा म्हणजे पोळा, त्या सणाचं अनोखा साजरीकरण भाऊसाहेब गुलाबरावजी पाटील इंग्लिश मीडियम स्कूल या ठिकाणी करण्यात आले. मातीच्या बैलांसोबतच खऱ्याखुऱ्या बैल जोडीला शाळेत आणून त्यांची पूजा करण्यात आली, विद्यार्थ्यांना शेतकरी, बैल, बैलपोळा या विषयी माहिती सांगण्यात आली, गुंजन गोपाल पाटील या विद्यार्थिनीचे पालक श्री गोपाल पाटील यांनी आपली मानाची बैल जोडी शाळेत पाठवली, खऱ्याखुऱ्या बैल जोडीला विद्यार्थ्यांसाठी घेऊन येणाऱ्या भूमिपुत्राचा शाल,श्रीफळ…

Read More

साईमत लाईव्ह यावल प्रतिनिधी जळगाव जिल्हा बँकेने राजकारणातील काही राक्षसी प्रवृत्तीला प्राधान्य देत आणि एका माजी मंत्र्याच्या हेकेखोरपणामुळे मधुकर साखर कारखाना विक्री करण्याचा घाट रचल्यामुळे मधुकर साखर कारखाना विक्री न करता भाडे तत्त्वावर देण्यात यावा यासाठी काही सभासदांनी रिट पिटीशन दाखल केले असल्याचे समजले.यामुळे औरंगाबाद खंडपीठातून काय निर्णय जाहीर होईल. याकडे संपूर्ण सहकार क्षेत्राचे लक्ष वेधून. गेल्या 52वर्षात नियमित गाळप करणारा सहकारी साखर कारखाना म्हणजे जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील मधुकर सहकारी साखर कारखाना राजकारणातील काही राक्षसी प्रवृत्ती असलेल्या मानवनिर्मित आर्थिक अडचणीमुळे बंद झाला. कारखान्याने जिल्हा बँकेचे 2019 पर्यंत अनेक कर्ज नियमित भरले. कारखाना बंद झाला तेव्हा कारखान्यावर इतर कारखान्या प्रमाणे…

Read More

साईमत लाईव्ह सोयगाव तालुका प्रतिनिधी (विजय चौधरी) आगामी येऊ घातलेल्या पोळा आणि गणेशोत्सव दारूमुक्त वातावरणात साजरा करण्यासाठी सोयगाव पोलिसांचे अवैध दारू विक्रीवर लगाम घालण्यासाठी एक पथक नियुक्त करण्यात आले असून मंगळवारी या पथकाने नांदगाव तांडा ता सोयगाव येथे गावरान(हातभट्टीची) अवैध दारू दहा लिटर कब्जात बाळगून विक्रीच्या उद्देशाने रंगेहात पकडून त्याचे कडून अंदाचे दोन हजार रु चा मुद्देमाल हस्तगत केला आहे. देवमन किसन सोनवणे वय 45 वर्ष रा.नांदगाव ता. सोयगाव असे गावरान अवैध दारूविक्री करतांना आढळून आलेल्या चे नाव असून मंगळवारी त्यास पोलिसांच्या विशेष पथकाने रंगेहात पकडून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे मौजे नांदगाव येथे घराचे बाजूला सदर इसम अवैध…

Read More

साईमत लाईव्ह जळगाव प्रतिनिधी येथील सेंट लॉरेन्स स्कूल मध्ये आपला पर्व दिन मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरा करण्यात आला. सेंट लॉरेन्स शाळेने जळगावातील अनेक घरांमध्ये शिक्षणाची मशाल पेटवण्याची 30 वर्षे साजरी केली.यावेळी त्यांनी त्यांच्या संरक्षक संतांचे तेथे उपस्थित राहून त्यांच्यासाठी सतत मध्यस्थी केल्याबद्दल आभार मानले. या मैलाच्या दगडी वर्षात जाताना ते म्हणाले की, आम्हाला आमच्या संरक्षक संताचे सर्वात कमी लोकांच्या सेवेचे आणि त्याहूनही अधिक प्रेमाचे गुण आत्मसात करायचे आहेत. यावेळी मुख्याध्यापिका नेहा जस्मिन रॉड्रिग्स आणि पर्यवेक्षिका दिपाली पाटील यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून समारंभाची सुरुवात झाली. प्रार्थना सेवेचे नेतृत्व कॅबिनेट सदस्यांनी केली.

Read More

साईमत लाईव्ह अमळनेर प्रतिनिधी- निसर्डी गावासाठी 42.66 लक्ष निधीतून जलजीवन मिशन अंतर्गत मंजूर झालेली पाणीपुरवठा योजना गावासाठी वरदान ठरणारी असून यामुळे पाणी संकटावर निश्चितपणे मात होणार आहे असा विश्वास आ.अनिल भाईदास पाटील यांनी निसर्डी येथे विकास कामाच्या भूमिपूजन प्रसंगी व्यक्त केला. निसर्डी ता.अमळनेर येथे विविध विकासकामांचे भुमीपूजन आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी ते बोलत होते,गावात आगमन होताच आमदारांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.याप्रसंगी जलजीवन मिशन अंतर्गत 42.66 लक्ष निधीतून पाणीपुरवठा योजना,क्रीडा विभाग अंतर्गत 7 लक्ष निधीतून व्यायामशाळा बांधकाम आणि 2515 अंतर्गत 15 लक्ष निधीतून गाव दरवाजा बांधणे आदी कामांचे भूमिपूजन करून शुभारंभ करण्यात आला.यावेळी आयोजित सत्कार सोहळ्यानंतर पुढे बोलताना…

Read More

साईमत लाईव्ह जळगाव प्रतिनिधी शहरातील निवृत्ती नगर परिसरात मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास एका तरुणाचा चाकूने भोसकून खून झाल्याची घटना उघडकीस आल्यानंतर प्रचंड खळबळ उडाली आहे. विशेष बाब म्हणजे जळगाव जिल्ह्यात चार दिवसातील हा तिसरा खून आहे. हा खून इतका भयंकर होता की तरुणाला तीक्ष्ण हत्याराने वार केल्याने तो जागीच गतप्राण झाला होता. दरम्यान, खुनाला पूर्व वैमनस्याची किनार असल्याचे निष्पन्न होत असून याबाबत दोघांन विरूध्द जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भावेश उर्फ गोलू उत्तम पाटील (वय २८, रा. आव्हाने) असे मृत तरूणाचे नाव आहे. तर हा प्रकार अवैध वाळू व्यवसायातून घडल्याची चर्चा देखील सुरू आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे…

Read More