साईमत लाईव्ह सोयगाव तालुका प्रतिनिधी
तालुक्यात सर्वत्र बैलपोळा हा सण उत्साहात साजरा करण्यात आला गावच्या वेशीतुन बैलांना काढून बैलांचा पोळा फुटला या वेळी शेतकरी बांधवामध्ये उत्साही वातावरण होते यावेळी सोयगाव पोलीस हद्दीतील गावांमध्ये पोलीस सहायक निरीक्षक अनमोल केदार यांच्या मार्गदर्शनाखाली कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता यावेळी गावातील सरपंच, उपसरपंच,सदस्य पोलीस पाटील यांच्या सहकार्याने सर्वत्र शांततेत पोळा हा सण पार पडला.
शेतकऱ्यांच्या कष्टात व दुःखात खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या सर्ज्याचा दिवस म्हणजे पोळा. आपल्या कष्टाच्या जोरावर जगाला दोन घास खाऊ घालणारा जिद्दी शेतकरी व त्याला तेवढ्याचं ताकदीने साथ देणाऱ्या बैलांबद्दल कृतज्ञता व्यक्त करतांना सोयगाव तालुक्यातील शेतकरी बांधव भारावून गेले होते तालुक्यात सर्वत्र उत्साही वातावरण शेतकऱ्यांमध्ये दिसून येत होते बैलपोळा निमित्त बैलजोडीला आकर्षक सजावट करण्यात आली होती.