साईमत लाईव्ह पाळधी प्रतिनिधी
पाळधी तालुका धरणगाव येथिल महामार्गावर असलेल्या एस पी वाईन शॉप मधून चोरट्यांनी चार लाख रुपयाची दारू तर चार लाख रुपये रोख असा एकूण आठ लाखावर रकमेवर डल्ला मारल्याने एकच खळबळ उडाली आहे.
येथिल महामार्ग लगत एस पी वाईन शॉप नावाचे दुकान असून ते जळगांव येथिल राजकुमार शितलदास मोटवानी यांचे आहे.सदर दुकानाचा वरील भागात व्हेंटिलेशन साठी एक पंखा असून चोरट्यांनी तेथे चढून वरील व्हेंटिलेशन चा पंखा वाकवून आत प्रवेश केला. तेथून त्यांनी वेगवेगळ्या कंपनीची एकूण तीन लाख एकतीस हजार सातशे सत्तर रुपयाची दारू तर चार लाख अठरा हजार रुपये रोख असा ऐवज लांबवून पोबारा केला. या वेळी त्यांनी सोबत सी सी टी व्ही चा डी व्ही आर ही लांबविला.एवढ्या मोठ्या प्रमाणात चोरी झाल्याचे सकाळी दहा वाजता दुकान उघडल्या नंतर लक्षात आले आणि एकच खळबळ उडाली.पाळधी पोलिस यांना खबर मिळताच त्यांनी तेथे धाव घेतली. या वेळी गुन्हे शाखेचे डॉग पथक ,ठसे तज्ञ यांनीही धाव घेतली मात्र डॉग तेथेच घुटमळले. घटना स्थळी सहाय्यक पोलिस अधीक्षक कृषीकेक कुमार रावले,धरणगाव चे पो. नि.राहुल खताळ, पाळधीचे स. पो. नि.गणेश बुवा,यांचेसह गुन्हे शाखा,अबकरीचे अधिकारी यांनी भेट देऊन पाहणी केली. या बाबत तेथील व्यवस्थापक भुषण अभिमान जगताप याने दिलेल्या फिर्यादी नुसार गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास पाळधी पोलिस करीत आहेत.