अपहरण झालेल्या मुलाचा पोलिसांनी चोवीस तासात लावला छडा

0
3

साईमत लाईव्ह सोयगाव तालुका प्रतिनिधी

फुलंब्री येथील सहा वर्षीय मुलाचे ओळखीच्याच व्यक्तीने बुधवार रोजी संध्याकाळी फुलंब्री येथील कथार गल्ली येथील राहत्या घरून अपहरण केले होते . बुधवार संध्याकाळी पाच वाजेपासून पासून मुलगा घरातून गायब असल्याने मुलाचे आई वडील त्यांचे नातेवाईक व मित्र परिवार सर्वच चिंतेत होते गुरुवारी दुपारी तो सुखरूप असल्याची बातमी मिळाली आणि सगळ्यांचा जीव भांड्यात पडला.

याबाबत सविस्तर माहिती अशी की फुलंब्री येथील हेमंत चंद्रकांत काथार यांचा मुलगा सार्थक काथार हा दुपारी आपल्या बहिणीसोबत शाळेतून घरी आला सार्थक याचे वडील हे सकाळी कामावर गेले होते तर आई काही कामानिमित्त संभाजीनगर येथे गेली होती.. संध्याकाळी चार च्या सुमारास हेमंत काथार यांच्या ओळखीचा दिनेश अरुण कुलकर्णी उर्फ देवबाप्पा रा निधोना ता फुलंब्री हा त्याची नॅनो कार क्र एम एच 40 के आर 5950 घेऊन हेमंत काथार यांच्या घरी आला व सार्थक काथार यास कार मध्ये बसवले व सार्थक याची लहान बहीण हिस सांगितले की मी त्याला फिरवून आणतो असे सांगून घेऊन गेला. संध्याकाळी पाच वाजता सार्थक याची आई आली संभाजीनगर वरून परत आली तेव्हा मुलीने सांगितले की ब्राम्हण देवबाप्पा आले होते व सार्थक यास कार मध्ये घेऊन गेले त्यानुसार सार्थकच्या आई ने आरोपी दिनेश यास फोन लावला असता तो बंद येत होता त्यांनी पती हेमंत काथार यांना फोन करून सांगितले. आरोपी दिनेश हा सर्व परिवार यांचा परिचयाचा असल्याने काही वेळाने येईल असे वाटले परंतु रात्री आठ वाजता सार्थक चे वडील घरी आले तेव्हा सार्थक अजून आला नाही असे माहीत झाल्यावर त्यांनी आरोपी ला फोन केला तर तो बंद होत त्याच्या घरी निधोना येथे गेले असता घरी सुद्धा नव्हता.. हेमंत व त्यांच्या नातेवाईक व मित्रांनी शोध घेतला असता तो मिळून न आल्याने त्यांनी बुधवार रात्री फुलंब्री पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली सीसीटीव्ही फुटेज देऊन गुन्हा दाखल केला. त्यानुसार फुलंब्री पोलिसांनी तपासाची चक्र फिरवीत पोलीस निरीक्षक रविंद्र निकाळजे यांच्या मार्गदर्शनाखाली रात्रीच तपस सुरू केला त्यासाठी दोन पथक तयार करून आरोपीचा माग काढत तपास सुरू केला.

दरम्यान आरोपीचा मोबाईल हा मध्यरात्री एक वाजता सुरू होऊन बंद झाला त्यामुळे पोलिसांनी ज्या ठिकाणी मोबाईल सुरू झाला तो परिसर रात्री पासून गुरुवार 11 पर्यंत पिंजून काढला पण आरोपी मिळाला नाही त्यानंतर जशी माहिती मिळेल तसा तपास सुरू केला . यात सार्थक यांचे वडील व नातेवाईक तसेच मित्र वेगवेगळ्या ठिकाणी गाडीचा तपस घेत होते. दरम्यान दुपारी 3 च्या सुमारास आरोपीचा मोबाईल औंढा नागनाथ येथे सुरू होऊन बंद झाला तो पर्यंत पोलिसांकडे आरोपीचे लोकेशन आले होते. ते हेमंत काथार व नातेवाईक याना सांगण्यात आले हेमंत यांचे मित्र राहुल काथार व रवींद्र काथार हे पोलिसांसोबत तपस करीत होते यातील राहुल काथार यांना लोकेशन सांगितल्यावर त्यांचा मित्रा हा औंढा नागनाथ येथे राहत होता त्यांनी लगेच त्याला कॅल करून माहिती देऊन सर्व घटना सांगितली तसेच तेथील पोलीस स्टेशनमध्ये पोलिस उपनिरीक्षक बनसोड यांनी माहिती देण्यात आली त्यानुसार राहुल काथार यांचे मित्र तसेच स्थानिक पोलिस व नागरिकांच्या मदतीने आरोपीस पकडण्यात आले व सार्थक यास आरोपीच्या तावडीतून सोडविले आरोपीस औंढा नागनाथ येथील पोलीस स्टेशन मध्ये नेण्यात आले असून फुलंब्री पोलिसांचे पथक व सार्थक यांचे नातेवाईक औंढा नागनाथ येथे रवाना झाले आहे.

फुलंब्री पोलिसांनी सार्थक यास शोधण्यासाठी दोन पथक तयार केले होते शिवाय सायबर सेल ची मदत सुद्धा घेतली होती त्यामुळेच फुलंब्री पोलिसांनी 24 तासाच्या आत आरोपीस जेरबंद केले आहे यासाठी पोलीस अधीक्षक मनीष कवनिया यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रविंद्र निकाळजे, पोलीस उपनिरीक्षक बनसोड, पोलीस उपनिरीक्षक वाघमारे, पोलीस उपनिरीक्षक धुळे यांनी सलग 22 तास तपास करून आरोपीस अखेर जेरबंद केले. अपहरण का केले याची माहिती व पुढील तपास आरोपीस फुलंब्री पोलिस स्टेशनमध्ये आणल्यावर करण्यात येईल अशी माहिती पोलीस निरीक्षक रविंद्र निकाळजे यांनी दै सामना प्रतिनिधि बोलताना दिली.

// अपहरणाचे कारण गुलदस्त्यात //

आरोपीचे हेमंत काथार यांच्या घरी येणे जाणे असायचे काही पूजा विधी त्यांच्या कडून घेत असत शिवाय आरोपी हेमंत यांच्या गावाकडचा असल्याने चांगला परिचय होता. त्याने बुधवारी सार्थक याचे अपहरण केले मात्र अपहरण का केले याची माहिती त्याच्या शिवाय कोणीच नाही देऊ शकत सध्या आरोपी दिनेश हा औंढा नागनाथ पोलिसांच्या ताब्यात आहे त्यास फुलंब्री पोलिस स्टेशन मध्ये आणल्यावर चौकशी होईल त्यानंतर अपहरणाचे खरे कारण समजून येईल .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here