Author: Saimat

साईमत लाईव्ह मुंबई प्रतिनिधी ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन (Girish Mahajan ) यांच्या हस्ते राज्यातील 3 हजार 943 जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांचे आंतरजिल्हा बदली आदेश विधान भवनातील दालनात जारी करण्यात आले. यावेळी ग्रामविकास विभागाचे अपर मुख्य सचिव राजेश कुमार, जिल्हा परिषद, पुणे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषद वर्धा मुख्य कार्यकारी अधिकारी सचिन ओंबासे, सातारा जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, ग्रामविकास विभागाचे उपसचिव का. गो. वळवी यांची उपस्थिती होती. मंत्री महाजन म्हणाले, राज्यात प्रथमच एवढ्या मोठ्या संख्येने बदल्या करण्यात आल्या आहेत. अभ्यास गटाचे संशोधन आणि विश्लेषण तसेच शासन निर्णयाची अचूकता, पारदर्शकता आणि सर्व संवर्गासाठी लावलेल्या योग्य निकषानुसार या…

Read More

साईमत लाईव्ह जळगाव प्रतिनिधी  शहरातील निवृत्ती नगर परिसरात मध्यरात्री एक वाजेनंतर एका तरुणाचा चाकूने भोसकून खून झाल्याची घटना उघडकीस आल्यानंतर प्रचंड खळबळ उडाली आहे. भावेश उत्तम पाटील (वय २८, रा. आव्हानी) असे मयताचे नाव आहे. विशेष म्हणजे जळगाव जिल्ह्यात चार दिवसातील हा तिसरा खून आहे. रात्री १ वाजेच्या सुमारास एसएमआयटी महाविद्यालयासमोरील १०० फुटी रस्त्यावर हा खून करण्यात आला. भावेश उत्तम पाटील (वय-२८, रा.आव्हाणे, हल्ली मुक्काम निवृत्तीनगर) असे मयताचे नाव आहे. चाकूने सपासप वार केल्याने तरुण रस्त्यावरच रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. खून करणारे संशयीत वाळूमाफिया असून वाळू व्यवसायाच्या वादातून खून झाल्याची कळते. मात्र, अद्याप खू कोणी केला व त्यामागील नेमकं कारण…

Read More

साईमत लाईव्ह प्रतिनिधी सिंधुदुर्ग सिंधुदुर्ग |: राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांकडून भात खरेदी करण्यात आली.मात्र अद्याप पर्यंत शेतकऱ्यांना भात खरेदीच्या वरती देण्यात येणाऱ्या बोनसची रक्कम मिळालेली नाही. सिंधुदुर्ग जिल्ह्यात हजारो शेतकरी आज बोनसच्या रक्कमे पासून वंचित आहेत .लवकरात लवकर शेतकऱ्यांना बोनसची रक्कम मिळावी या , मागणीसाठी आज कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्यासह विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे व राजापूरचे आमदार राजन साळवी यांनी मुंबईत विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन केले. कोकणातल्या शेतकऱ्यांना भात खरेदीचा बोनस द्या, शेतकऱ्यांना न्याय द्या अशी मागणी आमदार वैभव नाईक यांच्यासह विरोधी पक्षाच्या आमदारांनी केली. यावेळी जोरदार घोषणा देत विधान भवन परिसर या आमदारांनी दणाणून सोडले. राज्य सरकारच्या…

Read More

साईमत लाईव्ह प्रतिनिधी सांवतवाडी सावंतवाडी येथील सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठान या सेवाभावी संस्थेच्यावतीने सावंतवाडीतील जिल्हा कारागृह वर्ग २ येथील बंदीवानांसाठी योगा शिबिर घेण्यात आले. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचे साधुन आयोजित केलेल्या या शिबिराला कारागृह अधिकाऱ्यांसह कर्मचारी व बंदीवानांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यावेळी कारागृह अधिक्षक ब्रह्मदेव लटपटे, कारागृह सुभेदार विनोद शिरगावकर, विनोद खोडके, हणमंत माने, मोईस जुन्नेदी, गणेश धावडे उपस्थित होते. सिंधुमित्र प्रतिष्ठानचे डॉ मिहीर प्रभुदेसाई, अँड्र्यू फर्नांडिस, दुर्गेश ठाकूर, सिद्देश मणेरीकर, दुर्गेश कुमार लालन यांनी योगाबाबत कारागृह अधिकाऱ्यांसह कर्मचारी व बंदीवानांचा प्रात्याक्षिकासाहीत मार्गदर्शन केले. यावेळी कारागृह अधीक्षक ब्रह्मदेव लटपटे यांनी कारागृहात बंदीवानांसाठी योगा शिबिर घेतल्याबद्दल सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठानचे आभार…

Read More

साईमत लाईव्ह प्रतिनिधी वैभववाडी वैभववाडी I प्रतिनिधी: वैभववाडी रेल्वे स्टेशन मास्तर आणि नापणे गावातील प्रतिष्ठित नागरिक कै.संजय बालाजी शिंगाडे वय ४७ वर्ष यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. ही घटना रविवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास घडली. संजय शिंगाडे मनमिळाऊ होते. त्याच्या या स्वभावामुळे त्यांचा मोठा मित्र परिवार आहे. त्यांच्या निधनाची बातमी समजताच वैभववाडी रुग्णालयात मोठी गर्दी केली होती. गेली बावीस वर्षे संजय शिंगाडे हे कोकण रेल्वेत स्टेशन मास्तर म्हणून कार्यरत आहेत. पाच वर्षापासून ते वैभववाडी येथील स्टेशनवर स्टेशन मास्तर म्हणून कार्यरत होते. प्रामाणिक व कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून त्यांची ओळख होती. रेल्वे प्रवाशांना कोणतीही गैरसोय होऊ नये याची काळजी ते घेत…

Read More

साईमत लाईव्ह प्रतिनिधी औरंगाबाद औरंगाबाद: नाशिक- हिंगोली या बसला आज पहाटे १ वाजेच्या सुमारास ढोरेगाव येथे अचानक आग लागली. यात संपूर्ण बस (क्र. mh  14-bt 3805) जळून खाक झाली असून २६ प्रवासी बालंबाल बचावले आहेत. नाशिकच्या आगार क्रंमाक १ मधून रविवारी रात्री नाशिक-हिंगोली ही बस रवाना झाली होती. पहाटे १ वाजेच्या दरम्यान गंगापूर तालुक्यातील ढोरेगाव येथे बस आली असता इंजिनमधून धूर निघू लागला. चालक आर .डी. लोखंडे यांच्या हे लक्षात आल्याने त्यांनी तत्काळ बस थांबवली. वाहक एम. पी. नरोळे यांना याची माहिती देत दोघांनी बसमधील २६ प्रवास्यांना खाली उतरवले. सर्व प्रवासी खाली उतरून सुरक्षितस्थळी थांबले. याचवेळी संपूर्ण बस आगीने वेढली…

Read More

तुम्हीही लॅपटॉप किंवा कॉम्प्युटरवर ब्राउझिंगसाठी गुगल क्रोम वापरत असाल तर तुमच्यासाठी एक वाईट बातमी आहे. गुगल क्रोम वापरणाऱ्यांना भारत सरकारने अलर्ट जारी केला आहे. हा इशारा आयटी मंत्रालयाच्या इंडियन कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम (SERT-In) ने डेस्कटॉप वापरकर्त्यांसाठी जारी केला आहे. SERT-In नुसार, Google Chrome मध्ये काही त्रुटी आढळल्या आहेत, ज्याचा फायदा घेऊन हॅकर्स सहजपणे संगणक हॅक करू शकतात. SERT-In ने यापूर्वी Apple iOS, Apple iPad आणि MacOS मधील बग्सबाबत अलर्ट जारी केला होता. गुगल क्रोममध्ये काय त्रुटी आढळल्यात? SERT-In च्या अॅडवायजरीनुसार, Google Chrome मध्ये अनेक त्रुटी आहेत. या त्रुटींचा फायदा घेऊन, हॅकर्स तुमच्या सिस्टमवर क्राफ्टेड रिक्वेस्ट अटॅकर्स आर्बिटरी कोड एक्झीक्यूट…

Read More

साईमत लाईव्ह नवी दिल्ली प्रतिनिधी ओबीसी आरक्षणासंबंधित आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार होती. परंतु ही सुनावणी आता पाच आठवड्यांनी पुढे ढकलण्यात आली आहे. ओबीसी आरक्षणासाठी विशेष खंडपीठ स्थापन करताना जैसे थे परिस्थिती ठेवाण्याचे आदेशही सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. राज्य सरकारने स्थापन केलेल्या बांठिया आयोगाच्या शिफारसी सर्वोच्च न्यायालयाने मान्य केल्यानंतर ओबीसी आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला होता. ओबीसी आरक्षणाची परिस्थिती जैसे थे आहे. ओबीसी आरक्षणासाठी जे नवीन खंडपीठ स्थापन होणार आहे, त्यावर पाच आठवड्यांनी सुनावणी होणार आहे. आगामी ९२ नगर परिषदांसाठी आरक्षण लागू होणार की नाही यावरही पाच आठवड्यांनंतर निर्णय होणार आहे. OBC Reservation : ओबीसी आरक्षणाची सुनावणी पाच आठवडे पुढे ढकलली थोडं…

Read More

साईमत लाईव्ह यावल प्रतिनिधी या संदर्भातील वृत्त असे की, यावल तालुक्यातील सांगवी फाटा ते डोंगरकठोरा रस्त्यावर आज पहाटे एका तरूणाचा छिन्नविछीन्न अवस्थेत मृतदेह आढळून आला. ग्रामस्थांनी याची माहिती पोलिसांना दिल्यानंतर पोलिस पथकाने घटनास्थळी धाव घेतली. यात मृत व्यक्ती हा मनोज संतोष भंगाळे (वय ४०) असून तो चितोडा येथील रहिवासी असल्याचे निष्पन्न झाले. मनोज भंगाळे हे कुणाच्या अध्यात-मध्यात पडत नसून ते शेती आणि प्लॉट खरेदी विक्रीचा व्यवसाय करत असल्याची माहिती समोर आली आहे. मारेकर्‍यांनी अतिशय क्रूर पध्दतीत मनोज भंगाळे यांना संपविले आहे. त्यांच्या गळ्यात फास टाकून कोणत्या तरी वाहनाने त्यांना ओढून आणत रस्त्याला लागून असणार्‍या शेतात त्यांचा मृतदेह टाकण्यात आला आहे.…

Read More

साईमत लाईव्ह बोदवड प्रतिनिधी :- येथे दिनांक २४/८/२०२२ पासून ते २९/८/२०२२ या सहा दिवसामध्ये माजी मंत्री तथा आमदार एकनाथ खडसे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात आयोजन करण्यात आले आहे तरी जास्तीत जास्त बेरोजगारानी जास्तीत जास्त संख्येने सहभाग घ्यावा असे आवाहन रामदास पाटील यांनी केले आहे. भारत सरकारच्या PASARA एक्ट -2005 च्या अंतर्गत प्रशिक्षण देऊन S.S प्रा .लिमिटेड या ISO मान्यताप्राप्त कम्पनीतर्फे कायमस्वरूपी नौकरीसाठी भर्ती मेळाव्याचे आयोजन केले आहे , भर्ती होणाऱ्या तरुणांना S.S. प्रा .लिमिटेड तर्फे सिलेक्शन करूँन नौकरी उपलब्ध केली जाणार असून , प्रोविडेंट फण्ड व सम्पूर्ण परिवारस मेडिकल सुविधा ,ग्रेचुटी ,PF पेंशन…

Read More