साईमत लाईव्ह बोदवड प्रतिनिधी
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसराचे सुशोभीकरण करणे साठी लोकप्रिय आमदार चंद्रकांत भाऊ पाटील यांनी 30 लाख रुपयाचा भरगोस निधी मंजूर केल्या बद्द्ल बोद्धसामाज बांधवांच्या वतीने आमदार साहेब यांची त्याच्या निवास्थानी भेट घेऊन आभार व्यक्त करून सत्कार करण्यात आला.
बोद्धसामाज बांधवांसोबत आमदार चंद्रकांत भाऊ पाटील यांनी मनमोकळ्या चर्चा केल्या , व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे सुशोभीकरण करण्यासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही याची ग्वाही सर्व समाज बांधवांना आमदार यांनी दिली तसेच कोणतेही काम असल्यास माझ्याशी संपर्क साधावा असे देखील सांगितले.
त्यावेळी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे सुशोभीकरण करणे साठी सातत्याने पाठपुरावा केलेले शिवसेना तालुका संघटक शांताराम कोळी, शिवसेना शहर संघटक भास्कर गुरचल , सह शिवसेना शहर प्रमुख राहुल शर्मा,धनराज माळी ,निरंजन चंदनकार, गोविंदा तायडे ,सुरेश तायडे, विजय तायडे ,प्रकाश तायडे, पंकज तायडे, सनी तायडे, योगेश निकम, सुरेश निकम, आकाश गुरचळ, अजय गुरचळ ,संजय गुरचळ, अशोक गुरचळ, दिपक निकम, जयेंद्र मोरे, मनोज मोरे, अविनाश तायडे, जगन गुरचळ, समाधान गुरचळ, रामदास तायडे, ईश्वर इंगळे, रवि गुरचळ, करणं आवचारे, कुणाल गुरचळ,आकाश सोनवणे, अशोक तायडे, गणेश तायडे,विलास तायडे,कमरलेस तायडे,अनिकेत तायडे, प्रविण गुरचळ सह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.