साईमत लाईव्ह सोयगाव तालुका प्रतिनिधी गणेशोत्सव विसर्जनाच्या पार्शवभूमीवर सोयगाव पोलिसांनी अवैध दारूविक्री विरोधात तालुक्यात वाश आउट मोहीम हाती घेतल्याने, बुधवारी चक्क स्वतंत्र महिला पोलिसांच्या पथकांनी बहुलखेड्यात अवैध दारूविक्री करणाऱ्या महिलेविरोधात कारवाई केल्यानें तालुक्यात सोयगाव ठाण्याच्या महिला पोलिसांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे…सोयगावचे पोलीस निरीक्षक अनमोल केदार यांनी स्वतंत्र महिला पोलिसांना अवैध दारूविक्रेत्या महिला विरुद्ध कारवाई साठी पथक स्थापन केले आहे. बहुलखेडा ता सोयगाव येथे राहत्या घरासमोर संगीताबाई संजय पवार या राहत्या घरासमोर गावरान(हातभट्टी) दहा लिटर दारू विक्रीसाठी बाळगून कबज्यात असल्याची खात्रीलायक माहिती महिला पोलीस भाग्यश्री चव्हाण यांना मिळताच त्यांनी तातडीने बहुलखेडा गावात सापळा रचून विनापरवाना अवैध गावरान(हातभट्टी) ची दहा लिटर दारू…
Author: Saimat
साईमत लाईव्ह सोयगाव तालुका प्रतिनिधी सोयगाव परिसरात अचानक झालेल्या वादळी वाऱ्याच्या तडाख्याच्या चक्रव्यूहात १४ गावे अर्धातास अडकली होती..या अर्ध्यातासात तेरा गावात खरिपाची पिके आडवी पडली आहे त्यामुळे मोठे नुकसान झाले आहे..या वादळी वाऱ्याच्या तडाख्यात तीस मिनिटात होत्याचे नव्हते झाल्याने शेतकऱ्यांना मोठा धक्का बसला आहे या वादळी वाऱ्याच्या तडाख्यात तेरा गावांमध्ये तब्बल पाच हजार तीनशे आठ हेक्टर वर पीक उध्वस्त झाली असून यामध्ये कपाशीचे पिके आडवी झाली आहे. सोयगाव परिसरातील तेरा गावांना बुधवारी सायंकाळी चार वाजता अचानक वादळी वाऱ्याच्या चक्रव्यूहाने घेरले होते यामध्ये जरंडी परिसराला मोठा तडाखा बसला आहे.जरंडी, निंबायती शिवारात तब्बल एक हजारावरील हेक्टरवरील कपाशी पिके आडवी झाली असून वादळाचा…
काय मटक्याच्या टपऱ्या,काय दारूचे अड्डे, काय करोड रु जुगारची अड्डे, काय लाखोचा गुटखा कस एकदम ओके मध्ये कस खोके देऊन जोरात चालू आहे राजकीय वरदहस्त की प्रशासनाचे दुर्लक्ष तर नाही ना पोलीस प्रशासनाकडून कारवाईस विलंब का ? साईमत लाईव्ह मुक्ताईनगर प्रतिनिधी मुक्ताईनगर शहरांमध्ये जवळच असलेल्या परिवर्तन चौकाच्या लागून काही हात गाड्यांमध्ये खुलेआम मटका घेतला जात आहे लाखो करोडो रुपयांची उलाढाल या माध्यमातून होताना दिसून येत आहे सट्टा मटका हा रोज हा साधारण वर्ग व अ साधारण वर्ग प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या भ्रमणधणी द्वारे किंवा चिठ्ठ्यांद्वारे खेळला जात आहे साधारणतः परिवर्तन चौका लागत असलेल्या रोहिदास नगर पासून ते बजरंग टी जवळून गावंडे कॉम्प्लेक्स च्या…
शनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने नॅशनल एलिजिबिलिटी कम एन्ट्रन्स टेस्ट (NEET) UG, 2022 साठी निकाल जाहीर करण्याची तारीख आणि वेळ जाहीर केली आहे. NTA वेळापत्रकानुसार, NEET UG 2022 चा स्कोअर कार्ड neet.nta.nic.in वर अधिकृतपणे वेबसाइटवर आज प्रसिद्ध केला जाईल. NEET Result 2022 LIVE Updates: नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने नॅशनल एलिजिबिलिटी कम एन्ट्रन्स टेस्ट (NEET) UG, 2022 साठी निकालाची तारीख आणि वेळ जाहीर केली आहे. NTA वेळापत्रकानुसार, NEET UG 2022 चे स्कोअरकार्ड neet.nta.nic.in. अधिकृतपणे वेबसाइटवर आज प्रसिद्ध केले जातील. ही परीक्षा 17 जुलै रोजी घेण्यात आली होती. एका अहवालानुसार, सुमारे 18.72 लाख उमेदवारांनी प्रवेश परीक्षेसाठी नोंदणी केली होती. NTA…
साईमत लाईव्ह चाळीसगाव प्रतिनिधी गणेशोत्सवानिमित्ताने राज्यात अनेक ठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते, त्याचप्रमाणे चाळीसगाव येथे आमदार मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित एकदंत गणेशोत्सव मंडळाने देखील एका स्तुत्य उपक्रमाचे आयोजन केले होते. चाळीसगाव शहरातील तृत्तीय पंथीय महिलांकडून यावेळी गणेशाची आरती करण्यात आली. ‘श्रीं’च्या आरतीचा मान तृत्तीयपंथी महिलांना मिळाल्याने या महिलांनी देखील आनंद व्यक्त केला. यावेळी आमदार मंगेश चव्हाण यांच्यासह शिवनेरी फाउंडेशनच्या अध्यक्षा सौ.प्रतिभाताई चव्हाण, शहर पोलीस निरीक्षक के.के.पाटील, एकदंत गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष जितेंद्र पाटील, किशोर रणधीर, माजी नगरसेवक भास्कर पाटील, राजेंद्र गवळी, आनंद खरात, मनोज गोसावी, योगेश खंडेलवाल, स्वप्नील मोरे, संदीप गवळी, राहुल पाटील, कपिल पाटील आदी उपस्थित होते. यावेळी…
साईमत लाईव्ह नाशिक प्रतिनिधी ज्ञानरंजन शिक्षण प्रसारक मंडळ संचलित..निवासी मतिमंद विद्यालय, नांदगांव, ता.नांदगांव, जि.नाशिक या बौद्धिक अक्षम मुलांच्या शाळेचे “कला शिक्षक” श्री. लालचंद राजाराम बागुल यांची कला क्षेत्रात शैक्षणिक व दिव्यांग कार्याची दखलं घेत, “शिक्षक दिन 2022” साठी “राष्ट्रस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार 2022” साठी कलासाधना सामाजिक संस्था,नवी मुंबई यांचे कडून निवड करण्यात आली असून हा पुरस्कार दि.११/०९/२०२२ रविवार रोजी “हॉटेल थ्री स्टार, खारघर, नवी मुंबई” येथे भव्य कार्यक्रमात प्रदान करण्यात येणार आहे. पुरस्काराचे स्वरूप स्मुर्तिचिन्ह, सन्मानपत्र, गोल्डमॅडल, पुस्तक व पेन देऊन गुरुजनांस सन्मानित करण्यात येणार आहे. सदर पुरस्कार सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मा. श्री. संदिप सोमन (सुप्रसिद्ध सिनेअभिनेते), मा. श्री. सतीश…
साईमत लाईव्ह यावल प्रतिनिधी गोशामहल विधानसभा मतदारसंघातील प्रखर हिंदुत्वनिष्ठ आमदार टी.राजासिंह यांना 23 ऑगस्ट 2022 या दिवशी अटक करण्यात आली.त्यांच्यावर एका पंथीयांच्या श्रद्धास्थानांचा कथित अवमान केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी न्यायालयाने त्यांना जामीनही दिला आहे.त्यानंतर अन्य एका जुन्या प्रकरणात आमदार टी.राजासिंह यांना पुन्हा 25 ऑगस्ट 2022 या दिवशी अटक करण्यात आली. एकूणच या प्रकरणात आमदार टी.राजासिंह यांना जाणीवपूर्वक लक्ष करून त्रास दिला जात आहे.आता तर त्यांच्यावर ‘पी.डी.अॅक्ट’ अंतर्गत गुन्हा नोंद करून त्यांना किमान एक वर्ष जेलमध्ये अडकवून ठेवण्याचा भयंकर कट रचण्यात आला आहे.त्यांना अटक करण्यापूर्वी आणि अटक केल्यानंतर जिहादी प्रवृत्तीच्या धर्मांधांकडून जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत.तसेच ‘सर तन से जुदा’…
साईमत लाईव्ह यावल प्रतिनिधी खासदार,आमदार आणि जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांच्या आणि जिल्हा परिषद,पंचायत समिती सदस्यांच्या नाकावर टिचून सुशिक्षित बेरोजगार तरुणांना नोकरी लावण्यासाठी ठोस आश्वासन देण्यात आले आहे. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात नोकरीचे आमिष सुशिक्षित बेरोजगार तरुणांची आर्थिक फसवणूक असे वृत्त काल प्रसिद्ध झाल्याने सुमारे 20 ते 25 तरुणांकडून प्रत्येकी एक ते दीड लाख रुपये घेतले असल्याने संबंधित सुशिक्षित बेरोजगार तरुणांमध्ये मोठी खळबळ उडाली,आणि त्यांनी आरोग्य विभागातील ज्या एका व्यक्तीस पैसे दिले आहे त्यांच्याशी संपर्क साधून चौकशी केली असता त्या संबंधित आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांनी सांगितले की आपल्या जळगाव जिल्ह्यात आता लवकरच नव्याने बांधकाम करण्यात आलेले ग्रामीण रुग्णालयात आणि प्राथमिक आरोग्य केंद्रा…
साईमत लाईव्ह जामनेर प्रतिनिधी जामनेर तालुक्यातील शेंदूर्णी येथे कायदा व सुव्यवस्था तसेच शांतता भंग करणाऱ्या गुन्हेगारांना सहा महिन्यांसाठी जामनेर, पाचोरा व सोयगाव तालुक्यातून हद्दपारीचे आदेश पोलीस अधीक्षक डॉ. प्रविण मुंडे यांनी दिले असून पहूर पोलीस स्टेशनला आदेश प्राप्त होऊन कार्यवाही करण्यात आली आहे. शेंदूर्णि ता.जामनेर येथे गावातील शांततेला गालबोट लागून वेळोवेळी कायदा सुव्यवस्था निर्माण झाल्याचे समोर आले आहे. यात गावातील तीन टोळ्यांवर विविध कलमांखाली गुन्हे दाखल आहे त.यांच्या वय प्रतिबंधात्मक कार्यवाही करण्यात आली आहे. तरीही टोळ्या तील गुन्हेगारांचे वर्तनात बदल झाला नाही.त्यामुळे पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे ,गोपनीय शाखेचे गोपाळ माळी व विनय सानप यांनी प्रस्ताव तयार करून…
साईमत लाईव्ह बोदवड प्रतिनिधी वराड; येथे जनसंवाद यात्रेत शेतकरी संघटनेचे बोदवड तालुका अध्यक्ष पुरुषोत्तम पाटील यांनी मनोगत व्यक्त केले यावेळी ते म्हणाले रोहिणी खडसे यांनी सुरू केलेली जनसंवाद यात्रा कौतुकास्पद आहे. त्या माजी मंत्री व तीस वर्षे आमदार असलेल्या एकनाथराव खडसे यांच्या कन्या आहेत, अशा मोठया नेत्यांची मुले परदेशात किंवा उद्योग धंद्यात स्थायिक होतात किंवा स्वतः संघर्ष न करता वडिलांच्या पुण्याई ने राजकारण येतात परंतु रोहिणी ताई याला अपवाद आहेत. नाथाभाऊ सारख्या मोठ्या व्यक्तीच्या त्या कन्या असुन सुद्धा त्या राजकारण सक्रिय झाल्या आहेत निवडून आलेल्या लोकप्रतिनिधी नसताना सुद्धा गावोगावी जाऊन जनतेच्या समस्या जाणून घेत आहेत. त्या सोडविण्यासाठी प्रयत्न करत आहेत आगामी…