‘या’ डाळीच्या सालीत दुधापेक्षा ६ पट अधिक कॅल्शियम

0
3

शरीरासाठी आवश्यक प्रमाणात कॅल्शियम देणाऱ्या पदार्थांचे नियमित सेवन करणे गरजेचे आहे. ही गरज दूध किंवा त्यापासून निर्मित पदार्थांपासून भागवता येते. अशी समज आहे. ते बरोबरही आहे. परंतु, डाळींच्या सेवनातूनही आपल्याला कॅल्शियम मिळवता येते.

कॅल्शियम शरीरातील हाडांना, दातांना मजबूत ठेवते. तसेच रक्त गोठणे, स्नायू मजबूत करणे आणि हृदयाचे ठोके, तसेच मज्जातंतूंच्या कार्यावर नियंत्रण ठेवण्यातही कॅल्शियम महत्वाची भूमिका बजावते. त्यामुळे, शरीरासाठी आवश्यक प्रमाणात कॅल्शियम देणाऱ्या पदार्थांचे नियमित सेवन करणे गरजेचे आहे. विशेषकरून महिलांना आणि मुलांना त्याची जास्त गरज असते. ही गरज दूध किंवा त्यापासून निर्मित पदार्थांपासून भागवता येते, असा समज आहे. ते बरोबरही आहे. परंतु, डाळींच्या सेवनातूनही आपल्याला मोठ्या प्रमाणात कॅल्शियम मिळते.

या डाळीच्या सालीत दुधापेक्षा अधिक कॅल्शियम

एका अभ्यासानुसार, तूर डाळीतून मोठ्या प्रमाणातून कॅल्शियम मिळते. इंटरनॅशनल क्रॉप्स रिसर्च इन्स्टिट्यूट फॉर द सेमी एरिड ट्रॉपिक्स (ICRISAT) ने यावर संशोधन केले आहे. तूर डाळीच्या बियांच्या सालीमध्ये दुधाच्या तुलनेत ६ पट अधिक कॅल्शियम असते. त्यामुळे, ऑस्टियोपोरोसिस आणि रिकेट्सवर उपचारासाठी खाद्य आणि औषधी बनवणाऱ्या कंपन्या त्यास प्रधान्य देतात, असे इन्स्टिट्यूटने सांगितले.

१०० मिलीलिटर दुधात केवळ..

तूर डाळीच्या सालीमध्ये दुधापेक्षा अधिक कॅल्शियम असते. हे कॅल्शियम बेबी फूड आणि मिनरल सप्लिमेंटसाठी महत्वाचे ठरू शकते. केवळ १०० ग्राम तूर डाळीच्या बियाण्यांच्या सालीत ६५२ मिलीग्राम कॅल्शियम असते, तर १०० मिलीलिटर दुधात केवळ १२० मिलीग्राम कॅल्शियम असते. तूर डाळीच्या सालीत कॅल्शियमचे प्रमाण अधिक आहे, असे इंटरनॅशनल क्रॉप्स रिसर्च इन्स्टिट्यूटने आपल्या अभ्यातून सांगितले.

तुरीची डाळ ही कॅल्शियमचे चांगले स्त्रोत

डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, शरीराला दररोज ८०० ते १ हजार मिलीग्राम कॅल्शियमची गरज असते. त्या पार्श्वभूमीवर तुरीची डाळ ही कॅल्शियमचे चांगले स्त्रोत असल्याचे अभ्यासातून समजत आहे. शरीरात कॅल्शियमची कमतरता झाल्यास अशक्तपणा, थकवा, बधीरपणा आणि इतर व्याधी होऊ शकतात. त्यामुळे, आरोग्य चांगले राखण्यासाठी योग्य प्रमाणात कॅल्शियमचे सेवन करणे गरजेचे आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here