पोटच्या मुली सोबत  बापानेच केले अश्लील चाळे

0
6

साईमत लाईव्ह  पाचोरा प्रतिनिधी

तालुक्यातील एका नराधम बापाने आपल्या पोटच्या अल्पवयीन मुलीसोबत अश्लील चाळे केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून , बाप लेकीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. याप्रकरणी पाचोरा पोलीस  ठाण्यात  पीडित मुलीच्या आईच्या तक्रारी वरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान , त्या नराधम बापाला पोलिसांनी अटक केली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, नराधम बाप आपल्या १५ वर्षीय मुलीला मोबाईलमध्ये अश्लील व्हिडीओ दाखवायचा. तसेच तिच्यासोबत अश्लील चाळे करायचा. हा किळसवाणा प्रकार मागील तीन वर्षापासून पासून सुरु होता. नराधम बाप मुलीला तुझ्या आईला घराबाहेर काढेन, अशी धमकी द्यायचा. त्यामुळे मुलगी अन्याय सहन करत होती. मात्र मागील काही दिवसांपासून हे प्रकार वाढल्यामुळे त्या १५ वर्षीय अल्पवयीन  पीडित मुलीने शेवटी आईला सर्व प्रकार सांगितला. त्यानंतर आईने मुलीच्या मामांना म्हणजेच आपल्या भावांना सर्व प्रकार सांगितल्याने मंगळवारी रात्री याबाबत पाचोरा पोलीस  ठाण्यात  गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी तत्काळ ” त्या ” नराधम बापाला बेड्या ठोकत ताब्यात घेतले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here