Author: Saimat

साईमत लाईव्ह जळगाव प्रतिनिधी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी पोलीस महानिरीक्षक बी. जी. शेखर यांनी पोलीस निरीक्षक किरण कुमार बकाले यांचेसह सहाय्यक फौजदार महाजन यांचे निलंबन केले आहे. आता बकाले यांच्या जागी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे प्रमुख म्हणून पाचोरा पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक किसनराव नजन पाटील यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. याबाबतचे आदेश पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी काढले आहेत. पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी आदेशात म्हटले आहे की, पोलीस निरीक्षक किसनराव लक्ष्मण नजन पाटील पाचोरा पोलीस ठाणे हे वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा जळगाव या पदाचा अतिरिक्त कार्यभार वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा जळगाव या पदाचे नियमित नेमणुक…

Read More

साईमत लाईव्ह बुलढाणा प्रतिनिधी : अंगावर खाकी वर्दी घालण्याचे स्वप्न बाळगून चिकाटीने मेहनत करणाऱ्या दोन तरुणांचे स्वप्न नियतीने त्यांच्यापासून अत्यंत क्रूरपणे हिरावून घेतलं आहे. पोलीस भरतीसाठी पहाटे लवकर उठून व्यायाम करणाऱ्या तरुणांसोबत अतिशय धक्कादायक घटना घडली आहे. पोलीस (police) भरतीची तयारी करणाऱ्या दोन तरुणांना बसचा धक्का लागून झालेल्या अपघातात त्यांचे दोन्ही हात अक्षरशः तुटून पडले आहेत. सदर घटनेने तरुणांचे पोलीस भरतीचे स्वप्न अपूर्ण राहणार असेच दिसत आहे. बुलढाणा जिल्ह्यातील (Buldhana district) मलकापूर पिंपळगाव देवी मार्गावर सकाळी ही घटना घडली आहे. सदर तरुण हे रस्त्याच्या कडेला पोलीस भरतीसाठी व्यायाम करत होते. यादरम्यान, ही घटना घडली आहे. सदर घटनेने मोठी खळबळ उडाली असून, तरुणांना धक्का…

Read More

साईमत लाईव्ह यावल प्रतिनिधी अपंगांसाठी सभागृह बांधकाम मंजूर प्लॅन इस्टिमेट प्रमाणे न करता आणि अपूर्ण असताना तसेच इतर काही कामे प्रत्यक्ष जागेवर न होता फक्त कागदोपत्री करून संबंधित ठेकेदारांना संपूर्ण कामाची बिले अदा केल्याचा गैरप्रकार,भ्रष्टाचार आणि यावल पंचायत समिती तपासणी संशयास्पद असल्याची घटना यावल तालुक्यातील डोंगर कठोरे ग्रामपंचायत मध्ये घडल्याची तक्रार खुद्द ग्रामपंचायत सदस्यांने केल्याने ग्रामपंचायतच्या संपूर्ण कारभाराची चौकशी झाल्यास ग्रामपंचायतचा मोठा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आल्याशिवाय राहणार नाही असे डोंगर कठोरा ग्रामस्थांमध्ये बोलले जात आहे. ग्रामपंचायतच्या वसुली निधी मधून गावातील अपंग बांधवाना आतापर्यंत कोणताच लाभ दिला गेला नाही.अपंग बांधवांवर ग्रामपंचायतीने आता पर्यंत कोणत्या योजनेतून किती निधी खर्च केला आहे किंवा…

Read More

साईमत लाईव्ह मुक्ताईनगर प्रतिनिधी मुक्ताईनगर शहरात दिवसाढवळ्या मध्यप्रदेशातून लाखो रुपयाचा गुटखा येत असतो. मुक्ताईनगर शहरामध्ये एक लाखो रुपयाचा गुटखा तस्करी करणारी गाडी पत्रकार व नागरिकांनी पकडून, त्यासंदर्भातील पोलीस निरीक्षकांना माहिती देऊनसुद्धा घटनास्थळी येण्यास पोलीस प्रशासन असमर्थ ठरल्याचे वास्तव समोर येत असून गाडीमालक फरार करण्यात, पोलीस प्रशासनाचे असे वागण्याचे नेमके कारण काय, या प्रकरणाला आर्थिक हितसंबंधाची किनार असल्याची खमंग चर्चा मुक्ताईनगर शहरवासियांमध्ये चांगलीच रंगली आहे. काल सायंकाळच्या सुमारास नागरिक व पत्रकारांनी गुटख्याची गाडी पकडली असतांना मुक्ताईनगर पोलीस निरीक्षक यांना फोन लावूनसुद्धा घटनास्थळी एक तासापर्यंत कुठले कर्मचारी पोहचू शकले नाही. गुटखा तस्करांकडून आमची वरपर्यंत लाईन असल्याची भाषा वापरली गेली तर गुटख्याची गाडी…

Read More

साईमत लाईव्ह जळगाव प्रतिनिधी बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडियाच्या राज्य शासकीय कंत्राटदार कमिटीवर जळगावचे बांधकाम व्यावसायिक अभिषेक कौल यांची निवड नुकतीच करण्यात आली आहे. बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडियाच्या राज्य शासकीय कंत्राटदार कमिटीचे अध्यक्ष दत्तात्रय मुळे यांनी अभिषेक कौल यांना पाठवलेल्या नियुक्तीपत्रात म्हटले आहे की , बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडियाच्या सोलापुरात मे महिन्यात झालेल्या बैठकीत महाराष्ट्र राज्य शासकीय कंत्राटदार कमिटीच्या स्थापनेबाबत चर्चा करण्यात आली होती . त्या बैठकीतील चर्चेनुसार हा निर्णय घेण्यात आला असून जळगावचे  बांधकाम व्यावसायिक अभिषेक कौल यांची बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडियाच्या राज्य शासकीय कंत्राटदार कमिटीवर सदस्य म्हणून सन 2022-23 या कालावधीसाठी निवड करण्यात आली आहे . जळगावचे  बांधकाम व्यावसायिक…

Read More

साईमत लाईव्ह पाचोरा प्रतिनिधी केंद्र व राज्य सरकार सर्व स्तरावर अपयशी ठरले आहे. दिवसेंदिवस महागाई गगनाला भिडत आहे. जीवनावश्‍यक वस्तूंच्या किंमतीने सीमा ओलांडली आहे. त्यामुळे सामान्य माणसाला जगणे मुश्‍कील झाले आहे, असे चित्र असतांनाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणतात की, ‘आमचे सरकार सर्वसामान्यांचे आहे. महाराष्ट्रात येऊ घातलेला वेदांत प्रकल्प गुजरातकडे वळविण्यात आला असला तरी राज्य सरकारातील प्रमुख नेते मुग गिळून बसले आहेत. महाराष्ट्राचे खच्चीकरण करण्याचे डावपेच आखले जात असून राज्यातील जनतेने आता जागरूक होऊन आगामी निवडणुकांमध्ये अशा सत्ताधाऱ्यांना धडा शिकविला पाहिजे, असे आवाहन विरोधी पक्षनेते तथा माजी उपमुख्यमंत्री अजिदादा पवार यांनी येथील राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात केले. शिंदे व फडणवीस सरकारच्या…

Read More

साईमत लाईव्ह औरंगाबाद प्रतिनिधी  औरंगाबाद: चक्क पोलीस कर्मचाऱ्यानेच शहरात व्यवहारासाठी आलेल्या एका सराफा व्यापाऱ्याला लुटल्याचा प्रकार समोर आला आहे. साथीदाराच्या मदतीने पोलीस कर्मचाऱ्याने रोकड आणि दागिने असा जवळपास २१ लाखांचा ऐवज लुटला आहे. याप्रकरणी सिडको एमआयडीसी पोलीस ठाण्यात या कर्मचाऱ्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संतोष वाघ ( सोयगाव पोलीस ठाणे), रामचंद्र दहिवाळ (रा. शेंद्रा औरंगाबाद)  आरोपींचे नावे आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, सोयगाव पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत कर्मचारी संतोष वाघ आणि रामचंद्र दहिवाळ मित्र आहेत. रामचंद्र दहिवाळ याने सराफा व्यापारी असलेले अशोक जगन्नाथ विसपुते (वय- 53 वर्षे, रा.प्लॉट नं.13, सेंट्रल बैंक कॉलनी, पिंप्राळा, जळगाव) यांना दागिने खरेदीच्या व्यवहाराच्यानिमित्ताने…

Read More

साईमत लाईव्ह प्रतिनिधी: देशातील सर्वात मोठी तिसरी बँक आणि सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाने (State Bank of India) ग्राहकांना झटका दिला. बँकाने बेस रेट (Base Rate)वाढवला आहे. त्यामुळे ईएमआय (EMI) वाढणार आहे अथवा ग्राहकांना ईएमआय तोच ठेवण्यासाठी कर्ज कालावधी वाढवावा लागणार आहे. एसबीआयने बेंचमार्क प्राईम लेंडिंग रेटमध्ये (BPLR) 70 आधार अंकांची म्हणजे 0.7 टक्क्यांची वाढ केली आहे. त्यामुळे बेस रेटमध्ये ही 70 आधार अंकांची वाढ झाली. BPLR आता वार्षिक 13.45 टक्के तर बेस रेट 8.70 टक्के असेल. यापूर्वी 15 जून 2022 रोजी हे दर वाढवण्यात आले होते. फ्लोटिंग दराने कर्ज घेणाऱ्या ग्राहकांना याचा फटका बसणार आहे. त्यांच्या कर्जावरील हप्ता वाढेल. वाढलेल्या व्याजदराची रक्कम त्यांच्या…

Read More

साईमत लाईव्ह जळगाव प्रतिनिधी : पाचोरा येथील कार्यक्रमात एकनाथ खडसे  यांनी शिंदे गटावर आणि भाजपवर जोरदार हल्ला चढवला आहे. “पतीव्रताच नसेल तर दागिने घालून काय फायदा?” असे ते म्हणाले आहेत. यावेळी अजित पवार हेसुद्धा कार्यक्रमाला उपस्थित होते. पाचोरा हा मतदारसंघ आपल्यालाच जिंकायचा आहे. महाराष्ट्राला अजित पवार यांच्यासारखे खंबीर नेतृत्वच हवे, असेही ते म्हणाले. यावेळी त्यांनी शिंदे गटाचा समाचार घेतला. “बाळासाहेबांच्या पुण्याईवर निवडून आलात आणि त्यांच्या कुटुंबीयांवर तुम्ही टीका करत आहात. २०० कोटी आणले काय आणि ५०० कोटी आणले काय, त्याला काय अर्थ आहे? तुम्ही २०० कोटीच काय ६०० कोटी आणले असतील; पण तत्त्व आणि सत्त्व शिल्लक राहिले नाही. पतीव्रताच नसेल…

Read More