सामान्य माणसाला जगणे मुष्किल झाले असतांना म्हणे ‘आमचे सामान्यांचे सरकार’

0
13

साईमत लाईव्ह पाचोरा प्रतिनिधी

केंद्र व राज्य सरकार सर्व स्तरावर अपयशी ठरले आहे. दिवसेंदिवस महागाई गगनाला भिडत आहे. जीवनावश्‍यक वस्तूंच्या किंमतीने सीमा ओलांडली आहे. त्यामुळे सामान्य माणसाला जगणे मुश्‍कील झाले आहे, असे चित्र असतांनाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणतात की, ‘आमचे सरकार सर्वसामान्यांचे आहे. महाराष्ट्रात येऊ घातलेला वेदांत प्रकल्प गुजरातकडे वळविण्यात आला असला तरी राज्य सरकारातील प्रमुख नेते मुग गिळून बसले आहेत. महाराष्ट्राचे खच्चीकरण करण्याचे डावपेच आखले जात असून राज्यातील जनतेने आता जागरूक होऊन आगामी निवडणुकांमध्ये अशा सत्ताधाऱ्यांना धडा शिकविला पाहिजे, असे आवाहन विरोधी पक्षनेते तथा माजी उपमुख्यमंत्री अजिदादा पवार यांनी येथील राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात केले. शिंदे व फडणवीस सरकारच्या  धोरणावर त्यांनी हल्लाबोल केला.

मेळाव्यास मार्गदर्शन करतांना त्यांनी विविध प्रश्‍नांचा आढावा घेत पक्षकार्यकर्त्यांनी पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी वाहून घेण्याचे आवाहन करतांना आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पक्षाला विजयी करण्याचा संकल्प करावा तसेच राज्यातील गद्दारांना धडा शिकविण्यासाठी जनतेत जनजागृती करावी, असे आवाहनही ना. पवार यांनी केले.

महागाई आकाशाला भिडत आहे. पेट्रोल, डिझेलच्या किंमती दिवसेंदिवस भडकत आहे. गॅस सिलेंडरच्या किंमती हजाराच्या पुढे गेल्या आहेत. अतिवृष्टीमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. आणि युवकांच्या हाताला काम नसल्यामुळे ते दिशाहीन होऊ लागले आहेत. अशी परिस्थिती असतांनाही मुख्यमंत्री शिंदे आमचे सर्वसामान्यांचे सरकार असल्याचा डांगोरा पिटत आहेत. मंत्रीमंडळ विस्तारानंतर प्रत्येक जिल्ह्याला पालकमंत्री मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र पालकमंत्र्यांची नियुक्ती करण्यातही हे सरकार कमी पडले असून त्यामुळे जिल्ह्यातील विकास कामे ठप्प झाली आहेत. लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार असल्याने आचारसंहीता लागू होईल व ही विकासकामे रखडली जातील. ज्या सरकारला काम करण्याची मुळात इच्छा नाही ते सर्वसामान्यांचे भले कसे करणार, असा प्रश्‍न उपस्थित करून त्यांना उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र विकास आघाडी सरकारने केलेल्या भरीव कामगिरीचा आढावा घेतला.

राज्यातील सरकार कसे पाडण्यात आले हे स्पष्ट करून शिवाजी महारांजांच्या महाराष्ट्रामध्ये गद्दारी चालणार नाही हे जनेतेने  आगामी निवडणुकीत गद्दारी करणाऱ्यांना दाखवून द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले. महाराष्ट्रातील एकाही समाजाबद्दल वेडेवाकडे बोलण्याचा अधिकार कोणालाही नाही. पोलिस अधिकारी बकाले यांनी ज्या पध्‌दतीने मराठा समाजाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले ती बाब निषेधार्ह आहे. त्यांना केवळ निलंबित न करता त्यांना आजन्म आठवण राहील अशी कारवाई केली पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
पाचोरा शहरात अजितदादा पवार यांचे आगमन होताच त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.माजी आमदार दिलीप वाघ,संजय वाघ, भूषण वाघ यांनी पुष्पगुच्छ देवून केले.ना.अजितदादांच्या स्वागतासाठी राष्ट्रवादी कांॅग्रेस पक्ष सर्व पदाधिकारी यांनी महादेवचे  बांबरुडपासून चारशे-पाचशे मोटरसायकलवर  झेंडे लावून  रॅली काढण्यात आली.ठिकठिकाणी फटाके फोडून ढोलताश्‍याच्या गजरात फुलांच्या पाकळ्यांची उधळण झाली. शहरात स्वागताचे शुभेच्छा फलक  लावण्यात आले होते.सुरुवातीला पाचोरा तालुका शिक्षण संस्था संचलित गो .स.े हायस्कूलमध्ये जिजाई रंगमंचचे उद्घाटन विरोधी पक्ष नेते तथा माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी   माजी पालकमंत्री सतीशअण्णा पाटील, माजीमंत्री गुलाबराव देवकर, माजी विधानसभा सभापती अरुणभाई गुजराथी, विधानपरिषदेचे आमदार तथा माजीमंत्री एकनाथराव खडसे,माजी आमदार दिलीप वाघ, संजय वाघ, नगरसेवक भूषण वाघ, संस्थेचे सचिव ॲड. महेश देशमुख, संजय एरंडे, प्रमोद सोनार, विधानसभा क्षेत्रप्रमुख नितीन तायडे, शिशिकांत चदिले, रोहित वाणी, योगेश कुमावत, गोपी पाटील आदींची उपस्थिती होती. ना. अजित पवार यांंनी  अभिमन्यू पाटील  यांचा शाल श्रीफळ देऊन वाढदिवस साजरा केला. त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने रंजित पाटील सर यांनी  हायस्कूलमध्ये जिजाई रंगमंच उभारले होते. त्याचे उद्घाटन ना.  अजितदादा पवार यांच्या हस्ते करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here