धक्कादायक कुत्र्याने मटन खाल्ले; बापाने विवाहित मुलीची गोळी झाडून केली हत्या

0
1

साईमत लाईव्ह तुळजापूर प्रतिनिधी

कुत्र्याने मटन खाल्ल्याच्या काराणावरून जन्मदात्या पित्याने गोळी घालून मुलीचा खून केल्याची घटना तुळजापूर तालुक्यातील कार्ला येथे घडली. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तुळजापूर तालुक्यातील कार्ला येथील काजल मनोज शिंदे (वय २२) हिचा विवाह झाला असून ती आपल्या पतीसह आई वडिलांकडे राहत होती. काजलचे वडील गणेश भोसले व आई मिराबाई या दोघांनी कुत्र्याने मटन खाल्ल्याच्या कारणावरून काजल हीला शिवीगाळ केली. वडील गणेश भोसले यांचा राग अनावर झाल्याने त्यांनी मुलगी काजलवर रिव्हाल्वर मधून गोळी झाडली. ती थेट छातीवर लागल्याने काजल गंभीर जखमी झाली. कुटुंबातील विशाल जयराम भोसले याने काजल हिला उस्मानाबाद जिल्हा रुग्णालयात घेऊन जात असताना काजल ही मयत झाली. या दरम्यान, तुळजापूर उपविभागीय पोलिस उपअधीक्षक सई भोरे-पाटील, नळदुर्ग पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सिध्देश्वर गोरे यांनी भेट दिली. दरम्यान, गणेश भोसले व मिराबाई भोसले या दोघांनी जावाई मनोज सुनील शिंदे (रा. कार्ला) यालाही ठार मारण्याची धमकी दिली आहे. मयत काजलचे पती मनोज शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नळदुर्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here