शिवभोजनवर आता या सरकार ची टांगती तलवार ; बंद होण्याच्या मार्गावर

0
1

साईमत लाईव्ह मुंबई प्रतिनिधी

गेल्या सरकारने राज्यातील गरजू व गरीब लोकांसाठी जी शिवभोजन थाळी योजना अमलात आणली होती ती आता बंद होण्यण्याच्या मार्गावर आहे. शिंदे फडणवीस सरकारला या योजनेत गैरव्यहार असल्याचा संशय आहे. त्यामुळे हि योजना बंद होण्याची शक्यता आहे. हि योजना बंद झाल्यास राज्यातील गरजवंतांना चांगलाच मोठा फटका बसेल. कोरोना काळात या थाळीची किंमत ५ रुपये होती तर आता त्याची किंमत १० रुपये करण्यात आली. या योजनेमुळे गोर गरिबांना मोठा आधार मिळत होता.

शिंदे फडणवीस सरकार सत्तेत येताच महाविकास सरकारने राबवलेल्या योजनांना स्थगिती अथवा त्या बंद करण्यात येत आहेत. हाच पाढा शिवभोजन थाळी योजनेचा सुद्धा वाचण्यात आला आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पुढाकाराने ही शिवभोजन थाळी सुरू करण्यात आली होती. राज्यात एक लाख 88 हजार 463 एवढ्या थाळ्यांची विक्री होत असते. शिवभोजन थाळीसाठी विविध ठिकाणी केंद्र सुरू करण्यात आली आहेत. ही केंद्र चालवणाऱ्यांना राज्य सरकारकडून विविध मदत दिली जाते.  दरम्यान, शिवभोजन थाळी योजनेत गैरव्यवहार झाल्याचा शिंदे सरकारला संशय आहे. आता या योजनेचा आढावा घेतल्यानंतर ही योजना चालू करायची की बंद करायची याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

दरम्यान, सध्या राज्यात एक लाख 88 हजार 463 एवढ्या थाळ्यांची विक्री होते. याची संख्या दोन लाखांपर्यंत नेण्यासाठी ठाकरे सरकारने प्रस्ताव आणला होता. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर हा प्रस्ताव शिंदे सरकारसमोर आला. मात्र, त्यावर शिंदे सरकारने यावर अद्याप निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे मंत्रीमंडळ बैठकीत काय निर्णय होणार याकडे सर्वांच लक्ष लागले आहे.

शिवभोजन थाळी योजना 

गरिबांना, गरजूंनाा सहज व अत्यल्प दरात भोजन उपलब्ध करण्यासाठी राज्यातील जिल्ह्याच्या ठिकाणी, तालुक्याच्या ठिकाणी केंद्र सुरू करण्यात आले होते. शिवभोजन थाळी केंद्र  स्वयंसेवी संस्था, महिला बचतगट, हॉटेल चालक आदींना चालवण्यासाठी देण्यात आली आहेत. राज्य सरकारकडून शिवभोजन केंद्र चालकांना अनुदान दिले जात होते. ग्रामीण भागातील केंद्रचालकांना एका थाळीमागे 50 रुपये आणि शहरी भागातील थाळी चालकांना 35 रुपये अनुदान देण्यात येत होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here