साईमत लाईव्ह जळगाव प्रतिनिधी
मुस्लिम समाजाचे ज्येष्ठ पत्रकार तथा धर्म गुरू मुफ्ती हारून नदवी यांची व्हाईस ऑफ मीडिया च्या उर्दू भाषिक सेल च्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली, ही नियुक्ती व्हाईस ऑफ मीडिया चे संस्थापक अध्यक्ष, संपादक संदीप काळे यांनी केली आहे.
शहरातील ईकरा महाविद्यालयाच्या मैदानावर झालेल्या एका सामाजिक कार्यक्रमात मुफ्ती हारून नदवी यांना मान्यवरांच्या उपस्थितीत सदर नियुक्तीपत्र देण्यात आले.
मुस्लिम समाजाच्या जमाते उलेमा या संघटने तर्फे व्यसनमुक्ती आणि वाढत्या आत्महत्या रोखण्या संदर्भात एक मोहीम सुरू करण्यात आली आहे, त्याची सविस्तर माहिती देण्यासह प्रबोधनाचा कार्यक्रम घेण्यात आला होता, त्यावेळी त्यांना हे नियुक्तीपत्र देण्यात आले.प्रारंभी व्हाईस ऑफ मीडियाचे जिल्हाध्यक्ष सुरेश उज्जैनवाल यांनी संघटनेचा उद्देश विषद करून मुफ्ती हारून नदवी यांनी अल्पावधीत पत्रकारितेच्या विशेषतः उर्दू क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीमुळे त्यांना संघटनेने राष्ट्रीय स्तरावर काम करण्यासाठी निवडल्याचे सांगितले.
कार्यक्रमास जिल्हाधिकारी अभिजित राऊत, माजी उपमहापौर तथा ईकरा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष करीम सालार, माजी चित्रपट अभिनेते आरिफ खान, निवृत्त जिल्हा न्यायाधीश मंजूर नदीम, मुफ्ती अतिक रेहमान, फारूक शेख, एजाज मलिक आदी मान्यवर उपस्थित होते. जमाते उलेमा तर्फे राबविण्यात येणार्या जन जागृती मोहिमे चे कौतुक ही मान्यवरांनी या प्रसंगी केले.