ग्रा.पं. सदस्या सुनिता सोनवणे यांचा राजनीमा साकेगावात विकास कामे ठप्प

0
13

साईमत लाईव्ह साकेगाव, ता. भुसावळ : वार्ताहर

साकेगावात ग्रा.पं.च्या भ्रष्टाचाराची प्रकरणे पुढे येत असतांना व या संदर्भात जि.प. मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांकडे रितसर तक्रार केली जात असतांना, विकासकामे होत नसल्याचा आरोप करीत वार्ड क्र. १ मधील ग्रा.पं. सदस्या सुनिता सुभाष सोनवणे यांनी सदस्यपदाचा राजीनामा दिला आहे.

साकेगाव ग्रा.पं. सार्वत्रिक निवडणुकीत २०२१ मध्ये ग्रामविकास पॅनेलच्या माद्यमातून सुनिता सुभाष सोनवणे या वार्ड क्र. १ मधून विजयी झाल्या होत्या. त्यांना वार्डात विकासाची कामे होतील, अशी अपेक्षा होती मात्र पदरी निराशा पडल्यामुळे त्यांनी सरपंच योगिता सोनवणे यांच्याकडे आज रोजी राजीनामा सादर केला आहे.  याच्या प्रती गटविकास अधिकारी व जि.प. सिईओ यांना पाठविण्यात आल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here