साईमत लाईव्ह धानोरा ता.चोपडा ः वार्ताहर शेतकर्याच्या गावाबाहेर खळ्यात बांधलेल्या बैलावर बिबट्याने हल्ला चढवून यात बैल ठार झाला ही घटना पुनगाव ता. चोपडा येथे शनिवारी रात्री निवृत्ती जगन्नाथ सोनवणे यांच्या खळ्यात घडली. यात शेतकर्याचे ५० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. आतापर्यंत बिबट्याने सहा वेळा या परिसरात हल्ला करून आठ जनावरे ठार केल्यामुळे परिसरात घबराटीचे वातावरण पसरले असून वन विभागाने तात्काळ बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे. तसेच गुरुवारी रात्री विकास लक्ष्मण खांजोडे (कोळन्हावी शिवार) यांच्या बकरीवर हल्ला करून बिबट्याने ठार केली होती.बिबट्याने शनिवारी रात्री बैलावर हल्ला करून त्याला ठार केले. ही घटना रविवारी सकाळी शेतकरी निवृत्ती सोनवणे खळ्यात गेले…
Author: Saimat
साईमत लाईव्ह साकेगाव, ता. भुसावळ : वार्ताहर साकेगावात ग्रा.पं.च्या भ्रष्टाचाराची प्रकरणे पुढे येत असतांना व या संदर्भात जि.प. मुख्य कार्यकारी अधिकार्यांकडे रितसर तक्रार केली जात असतांना, विकासकामे होत नसल्याचा आरोप करीत वार्ड क्र. १ मधील ग्रा.पं. सदस्या सुनिता सुभाष सोनवणे यांनी सदस्यपदाचा राजीनामा दिला आहे. साकेगाव ग्रा.पं. सार्वत्रिक निवडणुकीत २०२१ मध्ये ग्रामविकास पॅनेलच्या माद्यमातून सुनिता सुभाष सोनवणे या वार्ड क्र. १ मधून विजयी झाल्या होत्या. त्यांना वार्डात विकासाची कामे होतील, अशी अपेक्षा होती मात्र पदरी निराशा पडल्यामुळे त्यांनी सरपंच योगिता सोनवणे यांच्याकडे आज रोजी राजीनामा सादर केला आहे. याच्या प्रती गटविकास अधिकारी व जि.प. सिईओ यांना पाठविण्यात आल्या आहेत.
साईमत लाईव्ह पारोळा प्रतिनिधी माजी पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी पूर्णपणे सोडून महाराष्ट्राच्या राजकारणाची आणखीनच अधोगती करण्याचा व राजकीय प्रदूषण वाढवण्याचा चंग बांधलेला दिसतोय.. एकनाथजी, रामदासभाईंना आवरा! असे आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख हर्षल माने यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केले आहे. ते पारोळा येथील धिक्कार सभेत बोलत होते. रामदास कदम यांच्या ‘‘ त्या ‘‘ वक्तव्याचा निषेध व्यक्त करतांना शिवसेना जिल्हाप्रमुख हर्षल माने पुढे म्हणाले की, रामदास कदम यांनी माजी मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या संदर्भात जी पातळी सोडून भाषा वापरली, त्याचा सार्वत्रिक निषेध होणे आवश्यक आहे. टीका करताना अर्वाच्यपणा किती करायचा याला काही मर्यादा असतात हा माणूस महाराष्ट्राचा मंत्री होता आणि…
साईमत लाईव्ह मुंबई प्रतिनिधी गेल्या सरकारने राज्यातील गरजू व गरीब लोकांसाठी जी शिवभोजन थाळी योजना अमलात आणली होती ती आता बंद होण्यण्याच्या मार्गावर आहे. शिंदे फडणवीस सरकारला या योजनेत गैरव्यहार असल्याचा संशय आहे. त्यामुळे हि योजना बंद होण्याची शक्यता आहे. हि योजना बंद झाल्यास राज्यातील गरजवंतांना चांगलाच मोठा फटका बसेल. कोरोना काळात या थाळीची किंमत ५ रुपये होती तर आता त्याची किंमत १० रुपये करण्यात आली. या योजनेमुळे गोर गरिबांना मोठा आधार मिळत होता. शिंदे फडणवीस सरकार सत्तेत येताच महाविकास सरकारने राबवलेल्या योजनांना स्थगिती अथवा त्या बंद करण्यात येत आहेत. हाच पाढा शिवभोजन थाळी योजनेचा सुद्धा वाचण्यात आला आहे. महाविकास…
साईमत लाईव्ह सोयगाव तालुका प्रतिनिधी विजय चौधरी शिक्षक दिन,मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन,स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव यांच्या निमित्त सोयगांव शिक्षक भारती यांनी शिक्षक,पालक,विद्यार्थी यांच्या मोफत आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या मोफत आरोग्य तपासणी शिबीराचे उद्घाटन सोयगांव तालुक्याचे तहसीलदार मा.रमेश जशवंत यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी तहसीलदार रमेश जशवंत यांनी शिक्षक भारती,सोयगांव यांचे कार्य हे कौतुकास्पद असल्याचे उद्गार काढले.यावेळी सोयगांव नगराध्यक्षा आशाबी तडवी,शिक्षण विस्तार अधिकारी सचिन पाटील,प्रशाला सोयगांव मुख्याध्यापक गिरिष जगताप,सोयगांव केंद्र प्रमुख फिरोज तडवी,नितीन राजपूत केंद्र प्रमुख बनोटी,गोपाल पाटील केंद्र प्रमुख जरंडी,विकास पवार मुख्याध्यापक बनोटी,रामदास फुसे,अनिल ठाकूर,समाजसेेवक राजेंद्र दुतोंडे,नगरसेवक गजानन कुडके,राजू माळी,योगेश बोखारे मान्यवर प्रमुुख अतिथी म्हणूून उपस्थित होते.या शिबीरास जळगांव…
नवी दिल्ली: आर्थिक वाढीसोबतच देशात जास्तीत जास्त रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. बेरोजगारी संपवण्यासाठी केंद्राकडून अनेक योजनाही राबवल्या जात आहेत. यासाठी आता अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) लवकरच मोठे पाऊल उचलू शकतात. रोजगाराच्या परिस्थितीचा आणि आर्थिक क्षेत्रातील बहुप्रतीक्षित नोकऱ्यांसाठी मासिक भरती योजनेचा (Monthly Recruitment Plan) आढावा घेण्यासाठी अर्थ मंत्रालयाने बुधवारी राज्यांद्वारे संचालित बँक प्रमुखांची बैठक बोलावली आहे. (now there will be recruitment in banks every month there will be bumper vacancy on some important posts) 28% अधिक बँक शाखा मार्च 2021 मध्ये संपलेल्या 10 वर्षांमध्ये सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या शाखांची संख्या 28 टक्क्यांनी वाढली आहे. मार्च 2021 च्या…
साईमत लाईव्ह तुळजापूर प्रतिनिधी कुत्र्याने मटन खाल्ल्याच्या काराणावरून जन्मदात्या पित्याने गोळी घालून मुलीचा खून केल्याची घटना तुळजापूर तालुक्यातील कार्ला येथे घडली. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तुळजापूर तालुक्यातील कार्ला येथील काजल मनोज शिंदे (वय २२) हिचा विवाह झाला असून ती आपल्या पतीसह आई वडिलांकडे राहत होती. काजलचे वडील गणेश भोसले व आई मिराबाई या दोघांनी कुत्र्याने मटन खाल्ल्याच्या कारणावरून काजल हीला शिवीगाळ केली. वडील गणेश भोसले यांचा राग अनावर झाल्याने त्यांनी मुलगी काजलवर रिव्हाल्वर मधून गोळी झाडली. ती थेट छातीवर लागल्याने काजल गंभीर जखमी झाली. कुटुंबातील विशाल जयराम भोसले याने काजल हिला उस्मानाबाद जिल्हा रुग्णालयात घेऊन…
साईमत लाईव्ह सोयगाव तालुका प्रतिनिधी तालुक्यातील गोंदेगाव येथील वरठाण ते गोंदेगाव रस्त्यावर चौफुली येथील लोकसहभागातून या चौकाचे दि.१५/९/२२ रोजी वार शनिवारी गोंदेगाव येथील प्रथम नागरिक कर्तबगार महिला सरंपच सौ.वनमाला शरद निकम व सर्व ग्रामपंचायत सदस्य यांच्या शुभहस्ते धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौक गोंदेगाव असे नामकरण, दिमाखदार सोहळा संपन्न झाला. ठरल्याप्रमाणे नामकरण करण्यात आले.यावेळी सर्व शिवशंभू भक्तांनी भगव्या शिवमय शुभेच्छा दिला. यावेळी सरंपच सौ.वनमाला शरद निकम यांनी सर्वाचे आभार मानले. आज पार पडलेल्या सोहळ्यात सर्व शिवशंभू भक्तांनी दिलेल्या प्रतिसाद खूप अनमोल आहे. गावातील लहान,मोठे, यांच्या उपस्थितीत उदघाटन सोहळा संपन्न झाला.यावेळी गावातील शिवभक्तांनी लोकसहभागातून हा सोहळा संपन्न झाला. यावेळी सर्व ग्रामपंचायत संचालक…
साईमत लाईव्ह जळगाव प्रतिनिधी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे हे आज जळगाव जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांनी पदभार स्विकारल्यानंतर ज्या झपाट्याने निर्णय घेण्याचा सपाटा लावला आहे. तो बघता जळगाव जिल्ह्यातील जनतेच्या अपेक्षा त्यांच्याकडून उंचावल्या आहेत. जळगाव, धुळे व नंदुरबार या जिल्ह्यांचा जलद गतीने सर्वांगिण विकास करण्यासाठी विभागीय आयुक्त (महसूल) कार्यकक्षेत बदल करण्याची आवश्यकता निर्माण झाली असून नव्याने महसूल प्रादेशिक विभाग जळगावची निर्मिती करण्यात यावी, अशी अपेक्षा जनतेतून व्यक्त केली जात आहे. याशिवाय जिल्ह्यातील 600 कोटींच्या विकास कामांना दिलेली स्थगिती त्वरित उठविण्यात यावी. तसेच जळगाव शहरातील रस्त्यांची निर्मिती व दुरूस्तीसाठी तसेच खड्डेमुक्त जळगावसाठी 150 कोटीच्या निधीची आवश्यकता आहे, तरी मुख्यमंत्र्यांनी मनपाला हा…
साईमत लाईव्ह जळगाव प्रतिनिधी : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आज (२०सप्टेंबर) मुक्ताईनगर येथे दौरा आहे. त्यांच्या स्वागतासाठी आमदार चंद्रकांत पाटील यांच्यावतीने बॅनरबाजी करण्यात आली आहे. कार्यकर्त्यांचा मेळवा घेऊन ते संवाद साधणार आहेत. शिंदे हे त्यांच्या समर्थाकांना भेटून तिथली स्थानिक राजकीय समीकरणे जाणून घेणार आहेत. तसेच पुढील आगामी निवडणुकांसाठी राजकीय समीकरणे काय असायला हवीत यांच्याबद्दल ते कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. स्थानिक निवडणूक जिंकण्याची रणनीती काय असणार, याबाबत स्थानिक नेत्यांशी बातचीत करणार आहेत. त्यांचा हा दौरा राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या बालेकिल्ल्यात असल्यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मुख्यमंत्री शिंदे हे सत्तांतरानंतर पहिल्यांदाच जळगाव जिल्ह्यात येत असल्यामुळे त्यांच्या स्वागतासाठी शिंदे गटाचे…