साईमत लाईव्ह सोयगाव तालुका प्रतिनिधी गावालगच्या शेतात गेलेल्या अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून तिचे अपहरण करून आरोपीच्या घरात सहा तास डांबून ठेवल्याची घटना पळाशीतांडा ता सोयगाव येथे मंगळवारी रात्री उघडकीस आली. याप्रकरणी पीडितेच्या आईने सोयगाव पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून तीन तरुणांच्या विरुद्ध विविध कलमाखाली गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यांचे विरुद्ध पोक्सो अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे..या घटनेमुळे सोयगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे. पळाशी तांडा ता सोयगाव येथील अल्पवयीन प्रातर्विधी साठी गावालगत असलेल्या शेतात गेली असता,तिघांनी तिचा पाठलाग करून यातील आरोपी शिवाजी इंदल पवार यांच्या घरात पीडितेला डांबून ठेवून झालेला प्रकार कोणालाही सांगितल्यास तुला जिवंत ठार मारण्याची धमकी दिली याप्रकरणी पीडितेच्या…
Author: Saimat
साईमत लाईव्ह सोयगाव तालुका प्रतिनिधी सोयगाव तालुक्यातील जरंडी व कंकराळा मोबाईल व्हॅन द्वारे लोकअदालत शिबिर आयोजित करण्यात आले होते , या शिबिराचे अध्यक्ष सोयगाव न्यायालयाचे न्यायाधीश एस.बी.इंगोले होते तसेच प्रमुख उपस्थिती म्हणुन सोयगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रकाश नाईक,व सोयगाव वकील संघ उपस्थित होते,मान्यवरांचा सत्कार जरंडी ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आला तसेच कंकरळा येथे सरपंच चंदाबाई शिवदास राजपुत यांनी फुलगुच्छ देऊन मान्यवरांचे स्वागत केले केले,तसेच या शिबिरामध्ये गावातील जे प्रकरणं न्यायालयात प्रलंबित आहेत किंवा ज्यांना तडजोड करायची आहेत असे प्रकरणं गावातच निकाली काढण्यात आले,तसेच कायदेविषयक मार्गदर्शन मान्यवरांनी केले यामध्ये तालुक्यातील सर्व वकील संघाचे अध्यक्ष अँड राजेंद्र अ. गिरी,अँड.योगेश जावळे उपाध्यक्ष,अँड, प्रकाश…
साईमत लाईव्ह धानोरा प्रतिनिधी सातपुडा निवासिनी श्रीक्षेत्र मनुदेवी च्या नवरात्रोत्सवाला २६ सोमवार पासुन प्रारंभ झाला आहे. कोरोनाच्या दोन वर्षांच्या महामारी नंतर प्रथमच सातपुडा निवासिनी श्रीक्षेत्र मनुदेवीचा नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. यासाठी मनुदेवी सेवा प्रतिष्ठानचे विश्वस्त मेहनत घेतांना दिसुन येत आहेत. २ ऑक्टो रविवार रोजी सप्तमी व ३ ऑक्टो.सोमवार रोजी अष्टमी असल्याकारणाने मनुदेवीच्या दर्शनासाठी जिल्हाभरातुन लाखो भाविकांची उपस्थिती लाभणार असल्याचे भाकित वर्तविले जात आहे . यासाठी मनुदेवी सेवा प्रतिष्ठानच्या व यावल पोलिस स्टेशनच्यावतीने कडक बंदोबस्तही ठेवण्यात येणार असून नुकतीच २५ रविवार रोजी सकाळी ११ वा. मनुदेवी नवरात्रोत्सवात नियोजन व सोयी सुविधा करीता मनुदेवी मंदिराच्या सभागृहात यावल नायब तहसीलदार…
साईमत लाईव्ह जळगाव प्रतिनिधी प्रत्येक माध्यमांची स्वतंत्र अशी भाषा आहे. माध्यमात प्रादेशिक भाषेचा प्रभाव वाढत असल्याने ती अधिक लोकाभिमुख होत आहे. प्रादेशिक बोली भाषेचा प्रभावीपणे वापर माध्यमातील आशयात होत असल्याने सामान्यांचे प्रतिबिंब हे माध्यमांमध्ये उमटत असते. परिणामी माध्यमांची भाषा ही प्रदेश आणि काळानुरूप बदलत असल्याचा सूर वक्त्यांच्या मनोगतातून उमटला. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील जनसंवाद आणि पत्रकारिता विभागातर्फे मंगळवार दि. २७ रोजी ’माध्यमांची भाषा : काल आज आणि उद्या’ या विषयावर वेबसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. वेबसंवादात प्रमुख वक्ते म्हणून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या जनसंवाद विभागाचे माजी विभागप्रमुख तथा सवांद माध्यमतज्ज्ञ डॉ.श्रीपाद भालचंद्र जोशी, आकाशवाणी आणि दूरदर्शन केंद्राचे…
साईमत लाईव्ह जळगाव प्रतिनिधी सर्व सामान्य जनतेमध्ये माहिती अधिकाराबाबत जनजागृती होण्यासाठी. २८ सप्टेंबर-आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिन म्हणून साजरा करणे बाबत शासन निर्देश दिले असून महाराष्ट्र शासनाने याबाबत वेळोवेळी शासन निर्णय निर्गमित केलेले आहेत त्या अनुषंगाने आज २८ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता जळगाव मनपाच्या दुसर्या मजल्यावरील सरदार वल्लभभाई पटेल सभागृहात कार्यतक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी ‘‘माहिती अधिकार‘‘ या विषयावर जळगाव महापालिकेच्या आयुक्त डॉ. विद्या गायकवाड या मार्गदर्शन करणार आहेत.त्यांचे समवेत उपायुक्त (आस्थापना) चंद्रकांत वानखेडे, जळगाव महापालिकेतील सर्व विभाग प्रमुख यांना व त्यांचे अधिनस्त असलेल्या कर्मचारी वर्गास मार्गदर्शन व संबोधन करणार आहेत तसेच संबंधित विभाग प्रमुख यांनी आपापल्या स्तरावर सर्वसामान्य…
साईमत लाईव्ह पाळधी प्रतिनिधी विवरे-भवरखेडे ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी शोभाताई प्रकाश माळी यांची निवड झाली आणि ग्रामपंचायत सदस्यपदी सुनिता उगलाल पाटील, रूपाली किरण पाटील, रेखाबाई विजय सूर्यवंशी, भारतीबाई राजू भिल, शोभाबाई दिलीप माळी, धनराज योगराज माळी, देविदास महादू पवार, अजय तानकु बाम्हणे यांची निवड झाली. महाराष्ट्राचे पाणीपुरवठा व स्वछता मंत्री तथा पालकमंत्री जळगाव व बुलढाणा जिल्हा ना. गुलाबराव पाटील यांचे विवरे-भवरखेडा गावांवर विशेष प्रेम असून मंत्रीमहोदयांच्या प्रयत्नांनी विवरे-भवरखेडा गावांना पाणीपुरवठा योजना मंजूर आहे तसेच धरणगाव ते भवरखेडा रस्ता पीएमजेएसवाय योजनेतून मंजूर झाला आहे. विवरे येथे २५१५ अंतर्गत १० लाख रुपयांचे पेव्हर ब्लॉक मंजूर आहे. विवरे गावाला एमआरजीएस अंतर्गत २५ लाख कॉंक्रीटीकरण…
साईमत लाईव्ह चोपडा प्रतिनिधी येथील भारतीय जैन संघटना व आनंद सुपर शॉपी यांच्या संयुक्त विद्यमाने आनंदराज पॅलेस येथे आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण व गुणवंत विद्यार्थ्यांच्या सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी विधानसभाध्यक्ष अरुणभाई गुजराथी हे होते. तर व्यासपीठावर महावीर पतसंस्थेचे चेअरमन प्रा. शांतीलाल बोथरा, जैन समाजाचे संघपती सुभाषचंद बरडिया, आनंद सुपर शॉपीचे संचालक व जैन दादावाडीचे संचालक डॉ. निर्मल टाटिया, भारतीय जैन संघटनेचे राज्य कार्यकारिणी सदस्य प्रा.डॉ.सुरेश अलीझाड, चोपडा पीपल्स बँकेचे संचालक नेमीचंद कोचर, भारतीय जैन संघटनेचे अध्यक्ष निर्मल बोरा व महिला अध्यक्ष सपना टाटिया आदींची उपस्थिती होती. गुणांची कदर करा गुणांच्या सन्मान करा गुणवाल्यांना पुढे पाठवण्याचे समाजाने…
साईमत लाईव्ह यावल प्रतिनिधी शहरासह तालुक्यात पवित्र असा दुर्गोत्सव साजरा करताना अनेक ठिकाणी दुर्गोत्सव मंडळाजवळ सट्टा,पत्ता क्लब आणि बनावट देशी,गावठी,पन्नीची दारू सर्रासपणे खुलेआम विक्री होत आहे.यामुळे दुर्गादेवी आणि पोलिसांच्या आशीर्वादाने अवैध धंदे सुरू असल्याने पोलिसांनी अवैध धंदे चालकांना परवानगी दिली आहे का ?याबाबत समाजात तालुक्यात बोलले जात आहे. काल दि.२७ रोजी रात्री एका दुर्गोत्सव मंडळाजवळ पत्त्याचा क्लब सुरू असताना दुसर्या बाजूला त्याच ठिकाणी मद्यप्राशन करणार्या काही तरुणांनी दुर्गा देवीच्या आणि म्हसोबाच्या साक्षीने रात्री नऊ ते दहा वाजेच्या दरम्यान एका मुलीची छेड़खानी केली.त्यामुळे सट्टा,पत्ता आणि बनावट देशी व गावठी,पन्नी दारू सर्रासपणे खुलेआम आणि तेही ठराविक ठिकाणी विक्री होत असल्याने यांना पोलिसांनी…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) या संघटनेला केंद्र सरकारने बेकायदेशीर संघटना घोषित केले आहे. पुढील पाच वर्षांसाठी ही संघटना आणि त्यांच्याशी संलग्न संस्थांना हा निर्णय लागू असेल असे केंद्राने म्हटले आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने पीएफआयची स्थापना करणारे काही सदस्य हे स्टूडंट्स इस्लामिक मुव्हमेंट ऑफ इंडिया म्हणजेच ‘सीमी’चे सदस्य असल्याची माहिती दिली आहे. या संघटनेचे जमात-उल-मुजाहिद्दीन बांगलादेश (जेएमबी) या संघटनेशी संबंध असल्याची माहितीही समोर आली आहे. या दोन्ही बंदी घालण्यात आलेल्या दहशतवादी संघटना आहे. रिहॅब इंडिया फाऊंडेशन, कॅम्पस फ्रण्ट ऑफ इंडिया, ऑल इंडिया इमाम्स काऊन्सिल, नॅशनल कॉनफ्रडेशन ऑफ ह्युमन राइट ऑर्गनायझेशन, नॅशनल वुमन्स फ्रण्ट, ज्युनियर फ्रण्ट, एम्पॉवर इंडिया…
साईमत लाईव्ह एरंडोल प्रतिनिधी बामसेफ, भारत मुक्ती मोर्चा, बहुजन क्रांती मोर्चा आणि सहयोगी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने एरंडोल येथे आज रोजी एकदिवसीय जिल्हास्तरीय प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हास्तरीय शिबिराचे उद्घाटन प्रा.डॉ. भरत शिरसाठ यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रविंद्र लाळगे यांनी केले. तत्पूर्वी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेस माल्यार्पण करण्यात आले. शिबिर प्रबोधन प्रसंगी स्वातंत्र्याची दोन आंदोलने, आधुनिक भारत, वर्तमान भारत, समाज व्यवस्था, शासन व्यवस्था, दुसरी गोलमेज परिषद, अश्या विविध विषयांवर प्रबोधन करण्यात आले. दरम्यान, काही संघटना असफल का ठरल्या यावर भाष्य करताना राष्ट्रीय आदिवासी कर्मचारी संघाचे राष्ट्रीय महासचिव घनश्याम अलामे म्हणाले की, निरूद्देश काम, साधनांचा अभाव,…