विवरे ग्रामपंचायतीवर शिंदे गटाचा झेंडा

0
10

साईमत लाईव्ह पाळधी  प्रतिनिधी

विवरे-भवरखेडे ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी शोभाताई प्रकाश माळी यांची निवड झाली आणि ग्रामपंचायत सदस्यपदी सुनिता उगलाल पाटील, रूपाली किरण पाटील, रेखाबाई विजय सूर्यवंशी, भारतीबाई राजू भिल, शोभाबाई दिलीप माळी, धनराज योगराज माळी, देविदास महादू पवार, अजय तानकु बाम्हणे यांची निवड झाली.

महाराष्ट्राचे पाणीपुरवठा व स्वछता मंत्री तथा पालकमंत्री जळगाव व बुलढाणा जिल्हा ना. गुलाबराव पाटील यांचे विवरे-भवरखेडा गावांवर विशेष प्रेम असून मंत्रीमहोदयांच्या प्रयत्नांनी विवरे-भवरखेडा गावांना पाणीपुरवठा योजना मंजूर आहे तसेच धरणगाव ते भवरखेडा रस्ता पीएमजेएसवाय योजनेतून मंजूर झाला आहे. विवरे येथे २५१५ अंतर्गत १० लाख रुपयांचे पेव्हर  ब्लॉक मंजूर आहे.  विवरे गावाला एमआरजीएस अंतर्गत २५ लाख कॉंक्रीटीकरण आणि भवरखेडा गावाला एमआरजीएस अंतर्गत २५ लाख कॉंक्रिटिकरण मंजूर आहे.  विवरे गावाला दहा लाख रुपये महादेव मंदिराजवळ सभामंडपसाठी मंजूर आहेत,अशी माहिती जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव गुलाबराव पाटील यांनी दिली.

या गावाला पावसाळयात येण्याजाण्यासाठी नाल्याला जास्त पाणी आल्यास संपर्क तुटत होता. यासाठी मागील काळात मंत्रीमहोदयांनी पूल बांधला यामुळे ग्रामस्थांचा प्रवास सुखकर होत आहे. त्याचेच फलित म्हणून या ग्रामपंचायतवर शिंदे गटाची एकहाती सत्ता आली, असे प्रतिपादन माजी सरपंच उगलाल पाटील यांनी केले. यावेळी भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी भगवान महाजन, भानू आबा आनोरे उपसरपंच, किरण पाटील माजी सरपंच, ग्रामपंचायत सदस्य उगलाल पाटील, प्रशांत पाटील, सोपान पाटील, शशिकांत महाराज, संजय भामरे, विवरे येथील भैया माळी, दिलीप माळी, मोतीलाल पाटील, शशिकांत माळी, आबासाहेब पाटील व मान्यवर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here