साईमत लाईव्ह मुंबई प्रतिनिधी
देवेंद्र फडणवीस गुलाबजाम सारखे गोड गोड आणि गुळगुळीत बोलतात. अशा शब्दात शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपमा केली आहे.
एका वृत्तसंस्थेशी बोलताना सुषमा अंधारे यांनी अनेक दिग्गज नेत्यांची उपमा दिवाळी फराळाशी केली आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे मेथीच्या लाडूसारखे राजकारणात पौष्टिक आहेत. तर उद्धव ठाकरे हे चौकोनी नानकटाई सारखे गोड आहेत, असं अंधारे म्हणाले.
शंकरपाळे पाहिल्यानंतर मला राज ठाकरे यांची आठवण येते. देवेंद्र फडणवीस गुलाबजाम सारखे गोड गोड आणि गुळगुळीत बोलतात. धनंजय मुंडे यांना त्यांनी बाहेरून कडक आणि आतून नरम असलेल्या अनारशाची उपमा दिली.
तर राजकारणातले रॉकेट शंकरपाळे गुलाब जामून यासह अन्य फराळाचे पदार्थ आणि फटाके यांची तुलना अनेक राजकारण्यांशी सुषमा अंधारे यांनी केली.
फटाक्याची लढ म्हणजे शिवसैनिक असून तुडतुड करणाऱ्या छोटे फटाके म्हणजे नारायण राणेंची दोन मुलं असल्याचं म्हणत त्यांनी फटाक्यातल्या झाडाची उपमा दिली. तर शिवसेना सोडून गेलेल्या अनेक मंत्री आणि आमदारांना कावळा ब्रँडच्या फटाक्यांची उपमा सुषमा अंधारे यांनी दिली.