साईमत लाईव्ह सोयगाव तालुका प्रतिनिधी
महिलांचा सन्मान हे मराठा प्रतिष्ठानचे आद्य कर्तव्य आहे.महिलांची भाऊबीज हा मराठा प्रतिष्ठानचा स्तुत्य उपक्रम आहे असे मत संस्थापक अध्यक्ष सोपान गव्हांडे यांनी गुरुवारी रात्री मराठा प्रतिष्ठानच्या नारी सन्मान सोहळ्यात व्यक्त केले.उमारविहिरे,निमखेडी, तिखी या तीन गावातील महिलांना मराठा प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित नारी सन्मान सोहळ्यात दोन हजार पाचशे साड्यांचे वितरण तहसीलदार रमेश जसवंत, अध्यक्ष सोपान गव्हांडे, एकपात्री प्रयोगकार प्रवीण माळी,यांच्या हस्ते उमर विहिरे गावात करण्यात आले.
तहसिल दार रमेश जसवंत, अध्यक्ष सोपान गव्हांडे, नायब तहसीलदार गोरखनाथ सुरे,सरपंच घोसला गणेश माळी, सरपंच उमर विहिरे कविता बाई पवार,माजी उपसभापती चंद्रकांत बावस्कर, प्रवीण माळी आदींची प्रमुख उपस्थिती होती या नारी सन्मान सोहळ्यात भाऊबीज निमित्ताने महिलांचा सन्मान करण्यात येऊन दोन हजार पाचशे महिलांना साड्या वितरण करण्यात आले यावेळी एकपात्री प्रयोगकार प्रवीण माळी यांचा एकपात्री नाट्य प्रयोग सादर करण्यात आला. कार्यक्रमासाठी मराठा प्रतिष्ठानचे प्रमोद वाघ,ज्ञानेश्वर युवरे,गणेश गवळी,समाधान गव्हांडे, आप्पा वाघ,अमोल बोरसे,समाधान घुले,दिनेश पाटील,नवल पाटील,सोनू तडवी,शंकर पाटील,गजानन पवार,समाधान बावस्कर,अमोल बावस्कर,नाना शिंदे,परमेश्वर शिंदे,छोटू शिंदे,सुरेश गायकवाड, आदींनी पुढाकार घेतला होता.. आभार समाधान गव्हांडे यांनी केले.