दामू वाकोडेची महाराष्ट्र केसरीच्या कुस्ती स्पर्धेसाठी निवड

0
1

साईमत लाईव्ह कजगावं प्रतिनिधी

कजगाव ता भडगाव येथील पैलवान दामू सहदेव वाकोडे याने महाराष्ट्र केसरीच्या कुस्ती स्पर्धेसाठी जिल्हा पातळीवर विजय मिळवला त्याबद्दल ग्रामस्थांनी त्यांचे अभिनंदन व कौतुक केले.

दामू वाकोडे हा कुस्तिगिर मल्ल अनेक दिवसांपासून कुस्त्यांचे आखाडे गाजवत असतो त्याने आता पर्यंत अनेक ठिकाणी विजय मिळवला शालेय स्तरावरील अनेक कुस्त्या त्याने जिंकल्या आहेत. तसेच यापूर्वी अनेक मानाच्या कुस्त्या त्याने जिंकून विजयश्री खेचून आणला आहे. आता त्याने महाराष्ट्र केसरी ची तयारी चालू केली आहे त्यात त्याने महाराष्ट्र केसरी कुस्तीच्या निवड स्पर्धेत यश मिळवले व जिल्ह्यातून त्याची व अन्य स्पर्धकांची निवड झाली आहे. त्यामुळे आता दामू वाकोडे हा महाराष्ट्र केसरीच्या तयारीला लागला असून त्याच्या निवडीबद्दल त्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

बस्थानक परीसरात त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी जय बजरंग व्यामशाळेचे अध्यक्ष जेष्ठ पहिलवान पोपट महाजन सुनील वाकोडे शकील पहिलवान हर्षल महाजन पप्पू बोरसे भैय्या महाजन राज वाकोडे वैभव बोरसे कल्पेश जाधव जगदीश भोई सागर बैरागी तेजस येवले सुदाम बोरसे मनीष गुजराथी गोपाल भोई महेंद्र पाटील व असंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.

“”:गावात अनेक ठिकाणी सत्कार

दरम्यान त्याने मिळवलेल्या यशाबद्दल गावात अनेक ठिकाणी त्यांचा सत्कार केला गेला असून, यावेळी माजी सरपंच मनोज धाडीवाल माजी ग्रा प सदस्य अनिल महाजन अण्णा बोरसे चेतन पवार अक्षय मालचे समाधान पवार वेदांत रोकडे सारंग महाजन अर्जुन वाकोडे किरण सोनवणे दिनेश धाडीवाल दिनेश टेलर भारत वाघ संजय पाटील जितू वाकोडे व ग्रामस्थ उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here