भरधाव रेल्वेच्या धडकेत कंत्राटदाराचा मृत्यू

0
1

साईमत लाईव्ह मलकापूर प्रतिनिधी

मलकापूर येथील रेल्वे लाईनचे काम करणारा ३२ वर्षीय खासगी कंत्राटदाराचा रेल्वेच्या धडकेत मृत्यू झाल्याची घटना समोर आली. सकाळी कि.मी ४९२/३२ बाय १५ च्या मध्यभागी मेन डाऊन लाइनच्या बाजूला मलकापूर येथे घडली.
मृत पावलेला खासगी ठेकेदार सुनील उद्रास कंगाले (रा. भातोडीया खुर्द, जिल्हा छिंदवाडा) हा सकाळी मलकापूर रेल्वेलाईन येथे काम करत असताना माघुन येणारी भरधाव रेल्वेचा आवाज आला नाही. त्यामुळे रेल्वे क्रमांक १२८७८(गरीब रथ) या धावत्या गाडीची धडक लागून गंभीर जखमी होऊन तो जागीच मरण पावला. याची माहिती शेगाव रेल्वे पोलिसांनी मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी व पंचनामा केला. मृतदेह हा मलकापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनाकरिता पाठविला. घटनेचा प्राथमिक तपास हे. कॉ. राठोड, हे. कॉ. देवकर यांनी केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here