Author: Saimat

साईमत लाईव्ह जळगाव प्रतिनिधी राज्यस्तरीय चौथी मॉडर्न पेंटाथलॉन स्पर्धा व मिनी ऑलम्पिक पात्रता स्पर्धा बालेवाडी क्रीडा संकुल येथे नुकतीच झाली. या स्पर्धेत प्रथम धावणे नंतर शूटिंग व जलतरण असे तीन प्रकार होते. या स्पर्धेत पोलीस जलतरण तलाव येथील आठ जलतरणपटू यांनी भाग घेऊन यश मिळवले. स्पर्धेसाठी निवड झालेले 19 वर्षाखालील मुले :- तलाह सिद्दिकी चौथ्या स्थानी, अमेय नगरकर पाचव्या स्थानी, हर्षवर्धन महाजन आठव्या स्थानी, आयान शेख नव्या स्थानी., 19 वर्षाखालील मुली :- धनश्री जाधव पाचव्या स्थानी.,17 वर्षाखालील मुले :- ओम चौधरी तृतीय स्थानी ., 17 वर्षाखालील मुली :- लाजरी खाचणे चौथ्या स्थान, जानवी महाजन पाचव्या स्थानी. सर्व जलतरणपटू यांची पुढील…

Read More

साईमत लाईव्ह सोयगाव प्रतिनिधी सोयगाव  पोलीस ठाणे सोयगावच्या वतीने संत गाडगेबाबा महाराज यांची पुण्यतिथीनिमित्त पोलीस बांधवांच्या वतीने श्रमदान करून सोयगाव पोलीस ठाणे व परिसराची स्वच्छता करून संत गाडगेबाबा महाराज यांना अभिवादन करण्यात आले यावेळी सोयगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक अनमोल केदार,पोलीस उपनिरीक्षक पंडित यांच्यासह सर्व पोलीस अंमलदार व होमगार्ड यांनी उत्स्फूर्तपणे श्रमदान करून सोयगाव पोलीस ठाणे तसेच परिसरात श्रमदान करून संत गाडगेबाबा महाराज यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन केले.

Read More

साईमत लाईव्ह बोदवड प्रतिनिधी : तालुक्यातील पाच ग्रामपंचायत निवडणुकांच्या मतमोजणीत लोकनियुक्त सरपंच म्हणून निवड जाहीर झाल्या आहे त्या पैकी कोल्हाडी ग्रामपंचायतीवर कॉंग्रेस ने आपला झेंडा फडकवला आहे. पुंजाजी दशरथ पाटिल हे विजयी.धोंडखेडा लोकनियुक्त सरपंच साठी वैशाली सागर दांडग़े राष्ट्रवादी .चिचखेड़ अक्काबाई नंदू पाटील विजयी राष्ट्रवादी.नीमखेड़ रमेश सुखदेव सुरंगे राष्ट्रवादी. या आधी वडजी येथे अलकाबाई विश्वास खाचणे,राष्ट्रवादी या बिनविरोध झाल्या होत्या.

Read More

साईमत लाईव्ह जळगाव प्रतिनिधी आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण शिबिराच्या माध्यमातून राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांना एनडीआरएफच्या तज्ज्ञांकडून मिळणार्‍या प्रशिक्षणाचा फायदा समाजाला होणार असून भविष्यात आपत्ती आली तर उद्भवणार्‍या आव्हानाचा मुकाबला करण्यासाठी ही युवा शक्ती सज्ज राहील असा विश्वास महाराष्ट्राचे राज्यपाल तथा कुलपती भगत सिंह कोश्यारी यांनी व्यक्त केला. कवयित्री बहिणाबाईचौधरी उत्तर महाराष्ट्रविद्यापीठात आज सोमवार दिनांक १९ डिसेंबर पासून सुरू झालेल्या राज्यस्तरीय आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण शिबिराच्या उदघाटन समारंभात श्री. कोश्यारी यांनी दुरदृश्य प्रणालीव्दारे मार्गदर्शन केले. यावेळी कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी, प्र-कुलगुरू प्रा. एस. टी. इंगळे, जिल्हाधिकारी अमन मित्तल, रासेयोचे राज्य संपर्क अधिकारी डॉ. प्रशांतकुमार वानंजे, एनडीआरएफचे असिस्टंट कमांडर निखिल मुधोळकर, आव्हान शिबिराच्या…

Read More

साईमत लाईव्ह तुळजापूर प्रतिनिधी मानेवाडी:- तुळजापूर तालुक्यातील ४८ ग्रामपंचायतसाठी रविवारी दि. १८ रोजी पार पडलेल्या निवडणुकीमध्ये मौजे मानेवाडी गावचा समावेश होता. या निवडणुकीमध्ये जय मल्हार ग्रामविकास पॅनलने दणदणीत विजय मिळवला आहे. या निवडणुकीत जय मल्हार ग्रामविकास पॅनेलने ८ जागेपैकी ४ जागेवर विजय मिळवला आहे. तर संत मारुती महाराज ग्रामविकास पॅनल ४ जागेवर समाधान मानावे लागले आहे. यामध्ये जय मल्हार ग्रामविकास पॅनलचे सरपंच पदाच्या विजयी उमेदवार नेहरू दशरथ बंडगर, तर सदस्य पदासाठी विजयी उमेदवार बालाजी बापूराव लकडे, शहाजी ज्ञानोबा हक्के, सुवर्णा लहू सगट, यांचा समावेश आहे. संत मारुती महाराज ग्रामविकास पॅनलमध्ये अर्चना भीमराव टकले, रेखा चंदू देवकर, बिरु धोंडिबा माने, शांताबाई…

Read More

साईमत लाईव्ह सोयगाव प्रतिनिधी सोयगाव तालुक्यातील कंकराळा ग्रामपंचायतीच्या सरपंच सह सर्व सदस्यांची बिनविरोध निवड करण्यात आली . यामध्ये कृषिमंत्री अब्दुल सत्तार साहेब यांचे विश्वासू व युवा नेते कुणाल राजपुत यांच्या विकासकामांच्या जोरावर बिनविरोध निवड झाली.  बिनविरोध निवड झाल्यामध्ये लोकनियुक्त सरपंच किशोर सोनवणे , ग्रामपंचायत सदस्य कुणाल राजपुत , रत्नाबाई ढाकरे , गोरख पवार , सुनिता उबाळे , शाम जैस्वाल , निर्मला सोनवणे , सारीका हिवराळे यांचा समावेश आहे , यावेळी पत्रकारांशी बोलतांना कुणाल राजपुत यांनी सांगितले की, “आजचा निर्णय ऐतिहासिक असुन विकासाचा विजय झाला”. यादरम्यान सर्व विजयी उमेदवारांचे सत्कार कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या जनसंपर्क कार्यालय सोयगाव येथे करण्यात आले ,…

Read More

साईमत लाईव्ह मुक्ताईनगर प्रतिनिधी जळगाव जिलह्यातील मुक्ताईनगर व बोदवड तालुक्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आमदार एकनाथ खडसे यांनी आपला गड राखला आहे. बोदवड तालुक्यात चार ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकला आहे. तर एक ग्रामपंचायतीवर कॉंग्रेसची सत्ता आली आहे. दुसरीकडे भाजप-शिंदे गटाला एकही ग्रामपंचायत मिळाली नाही, तर मुक्ताईनगरातील कुऱ्हा ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीने वर्चस्व प्रस्थापित केले. तर उंचदा ग्रामपंचायतीत राष्ट्रवादीचे सर्व नऊ उमेदवार निवडून आले आहेत. मात्र सरपंच पदाचे उमेदवार शिंदे-भाजप गटाच्या पाठींब्यावर निवडून आले आहेत.जळगाव जिल्ह्यात माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी मुक्ताईनगर-बोदवड मतदार संघातील ग्रामपंचायीच्या निवडणुकीसाठी जोरदार मोर्चेबांधणी केली होती. या ठिकाणी मुक्ताईनगर तालुक्यातील दोन तर बोदवड तालुक्यातील पाच ग्रामपंचायतीच्या निवडणूका होत्या. खडसे यांच्या…

Read More

साईमत लाईव्ह कजगाव प्रतिनिधी कजगाव ता भडगाव येथील ग्रापंचायतचा निकाल मोठा धक्कायक लागला असून एकतर्फी परिवर्तन घडले आहे संपूर्ण तालुक्यात मोठ्या चर्चेत असलेल्या ग्रामपंचायत चा निकाल अपेक्षेपेक्षा धक्कादायक लागला असून रघुनाथ विठ्ठल महाजन यांनी प्रतिस्पर्धी उमेदवार दिनेश सुमेरसिंग पाटील यांना तब्बल एक हजाराच्या मतधिक्याने पराभवाची धूळ चारली आहे तर सदस्य पदासाठी ही आघाडी घेतली लोकनियुक्त सरपंच पदासाठी दिनेश पाटील व रघुनाथ महाजन यांच्यात ही काटेकीटक्कर पाहायला मिळाली यात विद्यमान सरपंचपती दिनेश सुमेरसिंग पाटील यांचे लोकसन्मान पॅनल व रघुनाथ विठ्ठल महाजन यांचे परिवर्तन पॅनल ची सरळ लढत झाली यात रघुनाथ महाजन यांच्या पॅनलचे सतरा पैकी तब्बल तेरा जागांवर विजय मिळवला तर…

Read More

साईमत लाईव्ह जामनेर प्रतिनिधी तालुक्यातील ग्रामपंचायत निकालानंतर टहाकळी ग्रामपंचायत निवडणूक निकालाच्या पार्श्‍वभूमीवर दोन गट आपसात भिडल्याने तुफान दगडफेक झाली. या दगडफेकीत एका भाजपा कार्यकर्त्याचा मृत्यु झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. राज्यात ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल लागत असतांना तालुक्यातील टहाकळी येथे जालेल्या निवडणुकीच्या निकालानंतर दोन गट आपसात भिडले. दोन्ही गटांकडून शाब्दीक वादानंतर तुफान दगडफेक करण्यात आली. या दगडफेकीत दोन्ही गट भाजपाचे असल्याचे समजते. तर या घटनेत टहाकळी खुर्द येथील धनराज माळी (वय 30) असे मृत झालेल्ेया कार्यकर्त्याचे नाव असून चार ते पाच कार्यकर्ते जखमी असल्याचे वृत्त आहे.

Read More

साईमत लाईव्ह चाळीसगाव प्रतिनिधी जिल्ह्याचे लक्ष लागून असलेल्या व जळगाव लोकसभेचे लोकप्रिय खासदार उन्मेशदादा पाटील यांचे मूळ गाव असलेल्या दरेगाव ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचे युवा कार्यकर्ते गिरीश पाटील यांचा दणदणीत विजय झाल्याने दरेगाव ग्रामपंचायतीवर भाजपाचा झेंडा फडकला आहे. चाळीसगाव तालुक्यात सुमारे 14 ग्रामपंचायतीच्या निवडणुका पार पडल्या तालुक्यातील बहुसंख्य ग्रामपंचायतीवर भारतीय जनता पार्टीचे लोकनियुक्त सरपंच निवडून आल्याने पुन्हा एकदा चाळीसगाव तालुका हा भाजपाचा बालेकिल्ला ठरला आहे.. खासदार उन्मेशदादा पाटील यांचे मुळगाव दरेगाव ता. चाळीसगाव या ग्रामपंचायतीवर भारतीय जनता पार्टीचे तरुण तडफदार उमेदवार गिरीश पाटील यांनी राजेंद्र साबळे यांचा एकतर्फी पराभव करीत ग्रामपंचायतीवर भाजपचा झेंडा फडकविला आहे. वैशाली राठोड, बबन गायकवाड,…

Read More